वैद्यनाथ कारखान्याच्या पाण्याचा शेतीला फायदाच, व्हिडीओतून दावा
बीड : परळीच्या पांगरी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना शेतकऱ्यांच्या मुळावर उठल्याचं वृत्त टीव्ही 9 मराठीने दिल्यानंतर यावर ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी स्पष्टीकरण दिलं. कारखान्याच्या वेस्टेज पाण्यामुळे अनेक गावांचे जगणेच मुश्किल झाल्याचा दावा त्यांनी फेटाळला आहे. शिवाय कारखान्यातील पाण्यामुळे परिसरातील शेतीला फायदा होत असल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. कारखान्याचं पाणी शेतामध्ये सोडल्यामुळे शेतीला फायदा […]
बीड : परळीच्या पांगरी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना शेतकऱ्यांच्या मुळावर उठल्याचं वृत्त टीव्ही 9 मराठीने दिल्यानंतर यावर ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी स्पष्टीकरण दिलं. कारखान्याच्या वेस्टेज पाण्यामुळे अनेक गावांचे जगणेच मुश्किल झाल्याचा दावा त्यांनी फेटाळला आहे. शिवाय कारखान्यातील पाण्यामुळे परिसरातील शेतीला फायदा होत असल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. कारखान्याचं पाणी शेतामध्ये सोडल्यामुळे शेतीला फायदा होत असल्याचा दावा या व्हिडीओतून करण्यात येतोय.
परळी तालुक्यातील पांगरी येथे वैद्यनाथ सहकारी कारखाना आहे. परिसरातील बेरोजगारांच्या हाताला काम मिळावे, त्यांचे संसार सुरुळीत चालावे म्हणून दिवंगत केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांनी या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची उभारणी केली. मात्र सध्या हा कारखाना इथल्या नागरिकांच्या मुळावर उठल्याचा आरोप होतोय. इथल्या ढिसाळ नियोजनामुळे परिसरातील हजारो एक्कर शेती बाधित झाली आहे. कारखान्याच्या बाजूलाच दुषित पाण्याचा निचरा केला जातो. मात्र नियोजन व्यवस्थित नसल्याने हे दूषित पाणी हातपंप, बोरवेल आणि विहिरीत मिसळले आहे. त्यामुळे या परिसरातील जनजीवन विस्कळीत झाल्याचा आरोप करण्यात आलाय.
या प्रकारावर टीव्ही 9 मराठीने पंकजा मुंडे यांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला. पण याबद्दल अजून कोणतीही तक्रार नसून तुमच्याकडे माहिती कुठून आली, तुमचे सूत्र सांगा, अशी विचारणा त्यांनी केली. शिवाय टीव्ही 9 मराठीवर खटला दाखल करण्याची धमकीही दिली.
संबंधित बातमी :
EXCLUSIVE : पंकजा मुंडेंच्या कारखान्यामुळे हजारो एकर शेती उद्ध्वस्त