अजित दादा महायुतीतून बाहेर पडा… प्रकाश आंबेडकरांची मोठी ऑफर, विधानसभेपूर्वीच फटाके फुटणार?

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठी ऑफर दिली आहे. अजित पवार तुम्ही महायुतीतून बाहेर पडावं. त्यांचं राजकारण आम्ही रिइस्टॅब्लिश करु, अशी ऑफरच प्रकाश आंबेडकर यांनी देवून टाकली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वीच महाराष्ट्राच्या राजकारणात फटाके फुटतात का? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

अजित दादा महायुतीतून बाहेर पडा... प्रकाश आंबेडकरांची मोठी ऑफर, विधानसभेपूर्वीच फटाके फुटणार?
प्रकाश आंबेडकर यांची अजित पवार यांना खुली ऑफर
Follow us
| Updated on: Jul 16, 2024 | 5:26 PM

महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी काळात अतिशय मोठ्या घडामोडी घडणार आहेत. कारण आगामी काळात राज्यात विधानसभेची निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी प्रत्येक पक्षाकडून जोरदार तयारी केली जात आहे. प्रत्येक पक्षाच्या गोटात जोरदार हालचाली सुरु आहेत. असं असताना आता वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठी राजकीय ऑफर दिली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी अजित पवार यांना महायुतीतून बाहेर पडण्याचा सल्ला दिला आहेत. तसेच आपल्या वंचित बहुजन आघाडी पक्षासोबत मैत्री करण्याची ऑफर प्रकाश आंबेडकर यांनी अजित पवार यांना दिली आहे. आपण अजित पवार यांना पुन्हा त्यांचं राजकीय वर्चस्व निर्माण करुन देऊ, असं आश्वासन आणि ऑफर प्रकाश आंबेडकर यांच्याकडून देण्यात आली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वीच महाराष्ट्राच्या राजकारणात फटाके फुटणार का? हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.

“आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आम्ही नेहमीचा मार्ग अवलंबला आहे. आम्ही स्वबळावर लढणार आहोत. अजित पवारांचा गट ते आम्हाला वापरत आहेत, असं म्हणत आहे. वंचितकडे जातो असं सांगत आहेत. आम्हाला थांबवायचं असेल तर सीट वाढवा असं सांगत आहे. अजित पवार यांनी बाहेर पडावं. त्यांचं राजकारण आम्ही रिइस्टॅब्लिश करतो”, अशी ऑफरच प्रकाश आंबेडकर यांनी देवून टाकली आहे. अजित पवार गटाने ही ऑफर स्वीकारली तर महाराष्ट्राच्या राजकारणात नवं राजकीय समीकरण निर्माण होऊ शकतं. पण हे कितपत शक्य आहे? ते आगामी काळात स्पष्ट होईल. दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांच्या या ऑफरवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून काय प्रतिक्रिया देण्यात येते ते देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

‘राजकीय पक्षांनी संवेदनशील विषयांवर बोललं पाहिजे’

प्रकाश आंबेडकर यांनी आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर सविस्तर भूमिका मांडली. “राजकीय पक्षांनी मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण या संवेदनशील विषयावर बोललं पाहिजे. दंगल होईपर्यंत वाट पाहू नये. परिस्थिती स्फोटक आहे. एवढं सांगतो. तोडगा काढणारे राजकीय पक्ष आहेत आणि विधानसभा आहे. निवडणुका जवळ आहेत. त्यामुळे प्रत्येकजण आपली पोळी भाजण्याचं काम करत आहे. एनसीपी, काँग्रेस आणि ठाकरे गट आणि भाजप हे श्रीमंत मराठ्यांचे पक्ष आहे. म्हणून ते भूमिका टाळत आहेत”, अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली.

“राजकीय पक्षांनी भूमिका घेतल्या तर लोकांसमोर परिस्थिती जाते. जे पक्ष भूमिका घेत नाहीत, ते आपल्या बाजूने नाही असं ओबीसींचं मत होत आहे. हे सर्व लोक श्रीमंत मराठ्यांच्या बाजूने आहेत, असं ओबीसींना वाटतंय. हा धोका आहे. दुसरीकडे जरांगे म्हणत आहेत की, आमच्या अपेक्षा पूर्ण झालेल्या नाही. त्यामुळे राजकीय पक्ष जोपर्यंत भूमिका घेत नाही तोपर्यंत कोणतंही सरकार निर्णय घेणार नाही”, असं मत प्रकाश आंबेडकर यांनी मांडलं.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.