Bhandara Fire |”अखेर दिवस उजाडल्यावर दुःखद बातमी आली आणि आईच्या पायाखालची जमीन सरकली”
भंडाऱ्यातील रावणवाडी येथील वंदना सिडाम यांना मुलगी गेल्याच्या बातमीनं धक्का बसला, त्यांना प्राथमिक रुग्णालयात दाखल केले आहे. ( Vandana Sidam Bhandara Fire)
भंडारा: भंंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता नवजात केयर युनिटमध्ये ( SNCU ) शुक्रवारी मध्य रात्री लागलेल्या आगीमुळे १० नवजात बालकांचा आगीत होरपळून मृत्यू झाला आहे. तर, 7 बालकांना वाचवण्यात यश आले आहे. रावणवाडी येथील वंदना सिडाम यांच्या मुलीचा देखील होरपळून मृत्यू झाला आहे. शुक्रवारचा दिवस उजाडताच वंदना सिडाम यांच्या पायाखालची जमीन कोसळळी. वंदना सिडाम यांनी बाळ कुठंय अशी विचारणा केल्यावर त्यांना बाळाचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं. (Vandana Sidam lost his daughter in Bhandara fire incident)
भंडारा जिल्ह्यातील रावणवाडी येथील वंदना सिडाम यांची प्रसूती ३ जानेवारीला पहेला येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात झाली होती. मात्र, त्यांच्या मुलीचे वजन कमी असल्याने बाळाला जिल्हा रुग्णालयात हलवण्याचा सल्ला डाक्टरांनी दिला होता. मात्र, वंदना सिडाम यांचे पती हा पुणे येथे नोकरीला असल्याने सासू सासऱ्यानं बाळाला भंडारा सामान्य रुग्णालयात दाखल केले होते. बाळ अतिशय नाजूक असल्याने त्याला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते.
बाळाच्या मृत्यूच्या धक्क्यानं वंदना सिडाम यांना धक्का
रात्रीच्या सुमारास जेव्हा रुग्णालयात आग लागली असताना बाळाच्या आईला याची माहिती सुद्धा देण्यात आली नव्हती. पण, वंदना सिडाम यांनी माझं बाळ कुठे आहे, याची विचारणा केली असताना त्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली होती. अखेर दिवस उजाडताच तुमच्या बाळाचा मृत्यू झाला असल्याची बातमी वंदना सिडाम यांना देण्यात आली. बाळाचा मृत्यू झाल्याच्या धक्क्यानं वंदना सिडाम पूर्णतः खचल्या. हा धक्का इतका मोठा होता कि वंदना सिडाम यांची प्रकृती खालावली असल्याने त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे, ही घटना दुर्देवी असून जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाही व्हावी अशी मागणी वंदना सिडाम यांनी केली आहे.
दरम्यान, महेश वैद्य मंडळ अधिकारी यांनी मृत बालकाच्या कुटंबाना शासनानं दिलेल्या सानुग्रह अनुदानाचं वाटप करण्याचे काम सुरु असल्यांचं सांगितले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज भंडारा जिल्ह्यातील भोजापूर येथे मृत बालकाच्या कुटुंबीयांची भेट घेतली. भंडारा जिल्हा रुग्णालयाला भेट देत त्यांनी घटनेची मुळापर्यंत जाऊन चौकशी करण्यात येणार असल्याची घोषणा केली.
‘टीव्ही 9 मराठी इम्पॅक्ट: भंडारा दुर्घटना चौकशी समितीच्या अध्यक्षपदावरून डॉ.साधना तायडेंना हटवले, मुख्यमंत्र्यांची माहितीhttps://t.co/n1R5L2vJCX#Bhandara | #BhandaraHospitalfire | #bhandarafire| #uddhavThackeray | @ShivSena | @OfficeofUT | @NANA_PATOLE
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 10, 2021
संबंधित बातम्या:
Bhandara fire | भंडारा दुर्घटनेची सखोल चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई करणार: मुख्यमंत्री
(Vandana Sidam lost his daughter in Bhandara fire incident)