Vande Bharat Train : वंदेभारतने प्रवास करताना ही चूक कधी करु नका, अन्यथा होईल तुरुंगवास

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोरखपूर ते लखनऊ आणि जोधपूर ते अहमदाबाद ( साबरमती ) या दोन नव्या वंदेभारत एक्सप्रेसना 7 जुलै रोजी गोरखपूर येथून हिरवा झेंडा दाखविला.

Vande Bharat Train : वंदेभारतने प्रवास करताना ही चूक कधी करु नका, अन्यथा होईल तुरुंगवास
vande bharat Image Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Jul 12, 2023 | 9:01 PM

मुंबई : वंदेभारत एक्सप्रेसने रेल्वे प्रवाशांना आरामदायी आणि वेगवान प्रवासाचे नवे दालन उपलब्ध केले आहे. वंदेभारतही ( Vande Bharat Express ) देशांतर्गत तयार करण्यात आलेली विना इंजिनाची ( Engineless Train ) पहिली सेमी हायस्पीड ट्रेन ( Semi Hi Speed Train ) असून या ट्रेनचा वेग ही या ट्रेनची खासीयत आहे. परंतू या ट्रेनचा आणि इतर भारतीय ट्रेनच्या प्रवासात एक फरक आहे. या ट्रेनचे नियम थोडे वेगळे आहेत. ते जर पाळले नाहीत तर तुम्हाला अटक होऊ शकते आणि तुरुंगातही जावे लागू शकते. का ते पाहा….

वंदेभारत एक्सप्रेस आता 25 राज्यांमध्ये धावत आहे. नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोरखपूर ते लखनऊ आणि जोधपूर ते अहमदाबाद ( साबरमती ) या दोन नव्या वंदेभारत एक्सप्रेसना 7 जुलै रोजी गोरखपूर येथून हिरवा झेंडा दाखविला. आतापर्यंत देशात 25 वंदेभारत सुरु करण्यात आल्या आहेत. पहिली वंदेभारत नवी दिल्ली ते वाराणसी या मार्गावर 18 फेब्रुवारी 2019 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून सुरु करण्यात आली होती.

काही वंदेभारतचा क्षमतेपेक्षा कमी वेगाने प्रवास

यातील बहुतांशी वंदेभारत एक्सप्रेसना चांगला प्रतिसाद मिळत आहे. या वंदेभारतपैकी काही वंदेभारत तिच्या पूर्ण वेग क्षमतेमध्ये चालविण्यात अडचण येत आहे. कारण अनेक ठीकाणी रुळांच्या कार्यक्षमतेत वाढ झालेली नाही. नुकतीच कोकण मार्गावर सुरु केलेली सीएसएमटी ते मडगांव ( गोवा ) वंदेभारत अत्यंत कमी वेगाने चालविण्यात येत आहे. प्रवाशांच्या वेळेत फारसी बचत होत नसल्याचे समोर आले आहे.

महाराष्ट्रातील पाच वंदेभारत पाहा

मुंबईत मुंबई सेंट्रल ( ट्रेन क्र. 20901) ते गांधीनगर मार्गावर पहिली वंदेभारत सुरु करण्यात आली होती. त्यानंतर नागपूर ( ट्रेन क्र. 20826) ते बिलासपुर मार्गावर वंदेभारत सुरु झाली. त्यानंतर मुंबई ( ट्रेन क्र. 22223) ते साईनगर शिर्डी आणि मुंबई ( ट्रेन क्र. 22225) ते सोलापूर अशा दोन वंदेभारत एकाच दिवशी सुरु करण्यात आल्या होत्या. त्यानंतर मुंबई ( ट्रेन क्र. 22229) ते मडगाव ( गोवा ) ही वंदेभारत कोकण मार्गावर सुरु करण्यात आली.

वंदेभारतने प्रवास करताना या गोष्टी ध्यानात घ्या

-कन्फर्म तिकीट प्रवाशांनाच प्रवासाची अनुमती

– वंदेभारतमध्ये कोणतीच सवलत नाही, पाचवर्षांच्या वरील मुलास पूर्ण तिकीट लागेल

– रेल्वे कर्मचाऱ्यांना त्यांच्या सुविधा पासवर राजधानी आणि शताब्दी सारख्याच सुविधा मिळतील

– सुरक्षेसाठी प्रत्येक कोचमध्ये एक सुरक्षारक्षक तैनात असेल

– अस्वच्छता केल्यास प्रवाशाला पाचशे रुपयांचा दंड किंवा दंड आणि तुरुंगवास दोन्ही शिक्षा एकत्र होतील.

Non Stop LIVE Update
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन.
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.