कोकण रेल्वेच्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी, या नव्या ट्रेनचे डब्बे वाढणार

कोकण मार्गावर कोकणासाठी कमी आणि दक्षिणेकडील राज्यासाठी अधिक ट्रेन चालविण्यात येत असतात. कोकणात जाण्यासाठी मोजक्याच तीन चार गाड्या फायद्याच्या आहेत.

कोकण रेल्वेच्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी, या नव्या ट्रेनचे डब्बे वाढणार
konkan railwayImage Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Jul 20, 2023 | 2:05 PM

मुंबई | 16 जुलै 2023 : कोकण रेल्वेच्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. आता कोकण रेल्वेने कोकणात जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी जादा डब्यांची सोय होणार आहे. यासाठी रेल्वे मंत्रालय लवकरच निर्णय घेण्याची शक्यता आहे. कोकण रेल्वेच्या मार्गावर मोजक्याच गाड्या या कोकणात जाणाऱ्या प्रवाशांच्या फायद्याच्या आहेत. इतर गाड्या या दक्षिणेला जाणाऱ्या प्रवाशांनाच फायदेशीर आहेत. त्यामुळे आता पंतप्रधानांनी नुकत्याच सुरु केलेल्या ट्रेनचे डब्बे वाढविण्यासाठी पत्र लिहिण्यात आल्याचे सूत्रांनी म्हटले आहे.

कोकण मार्गावर कोकणासाठी कमी आणि दक्षिणेकडील राज्यासाठी अधिक ट्रेन चालविण्यात येत असतात. कोकणात जाण्यासाठी मोजक्याच तीन चार गाड्या फायद्याच्या आहेत. त्यात मडगांव ट्रेन क्र.12051 आणि कोकण कन्या ट्रेन क्र. 20111 या दोन गाड्या कोकणातील चाकरमान्यांसाठी खूपच सोयीस्कर असल्याचे प्रवासी बळीराम राणे यांनी सांगितले. आठ डब्यांच्या वंदेभारतला केवळ 560 आसन व्यवस्था आहे. कोकणकन्याचे 2 nd AC चे कणकवलीचे 1355 रू. भाडे आहे. तर मांडवीचे 3rd AC चे 920 रू.आहे. वंदेभारतचे मुंबई ते गोवा एक्झुकेटिव्ह क्लासचे भाडे 2,915 आणि चेअरकारचे भाडे 1,435 रुपये आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 27 जुलैपासून सुरु केलेली वंदेभारत एक्सप्रेस ही गाडी गणेत्सोवानिमित्त लागलीच फुल झाली आहे. ही आलिशान ट्रेन गोव्याला जाणाऱ्या पर्यटकांना हेरुन चालविण्यात येत आहे. या गाडीमुळे कोकणात थांबे दिले असल्याने कोकणातील चाकरमान्यांना देखील ती फायदेशीर आहे. परंतू या ट्रेनला केवळ आठच डब्बे जोडले आहे. त्यामुळे मडगांवसाठी 16 डब्यांच्या वंदेभारतची मागणी मध्य रेल्वेच्या मुंबई डीव्हीजनने केली आहे.

वंदेभारतमुळे होतोय तोटा

सीएसएमटी ते मडगांव वंदेभारत एक्सप्रेस ही नुकतीच 27 जुलैपासून सुरु केलेली ट्रेन केवळ आठ डब्याची आहे. महाराष्ट्राला मिळालेली पाचवी वंदेभारत एक्सप्रेस आहे. आतापर्यंत 25 वंदेभारत एक्सप्रेस सुरु करण्यात आल्या आहेत. मुंबई ते सोलापूर आणि मुंबई ते साईनगर शिर्डी या एक्सप्रेस सोळा डब्यांच्या आहेत. त्यात मुंबई ते सोलापूर वंदेभारत पुण्यालाच रिकामी होत आहे. भोपाळ-जबलपूर, भोपाळ-इंदौर या वंदेभारत देखील प्रवाशांमुळे तोट्यात जात आहेत.

यासाठी वंदेभारत आठ डब्यांच्या केल्या 

मध्य रेल्वेच्या नागपूर ते बिलासपूर मार्गावर सुरु केलेली वंदेभारतही नंतर आठ डब्यांची करण्यात आली. त्यामुळे आता केवळ आठ डब्यांच्या वंदेभारत केवळ फायद्याच्या मार्गावर चालविण्याचा विचार रेल्वे मंत्रालयाने केला आहे. त्यातच 75 वंदेभारत सुरु करण्याचे लक्ष्य चुकल्याने आठ डब्यांच्या वंदेभारत उपयोगी पडणार असल्याची माहीती रेल्वेच्या सूत्रांनी दिली आहे.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.