मुलाचा बाप कोण?, पूजा तडस भर पत्रकार परिषदेत हमसून हमसून रडल्या, सुषमा अंधारे यांचा आधार; भाजपलाही घेरलं

मी राजकारणाच्या पलीकडे जाऊन एका महिलेसोबत उभी राहणार आहे. एका बाळाला दूध प्यायला मिळत नसेल तर हे वाईट आहे. त्या परिस्थितीत मी त्या मायमाऊलीच्या सोबत उभी आहे. आम्हाला अक्रास्ताळेपणा करायचा नाही. भाजपच्या महिलांप्रमाणे अत्यंत सभ्यतेने आणि सुसंस्कृतपणे सांगते की, तुम्ही निवडणूक लढा. पण आपला परिवार रस्त्यावर येणार नाही त्याची काळजी घ्या. पंकज तडसने तिला पत्नी म्हणून आपल्या घरी सन्मानाने न्यावं. विषय संपवावा, इतकं सोपं आहे हे, असं सुषमा अंधारे म्हणाल्या.

मुलाचा बाप कोण?, पूजा तडस भर पत्रकार परिषदेत हमसून हमसून रडल्या, सुषमा अंधारे यांचा आधार; भाजपलाही घेरलं
Follow us
| Updated on: Apr 11, 2024 | 3:53 PM

वर्ध्यातील भाजपचे उमेदवार आणि विद्यमान खासदार रामदास तडस हे चांगलेच अडचणीत आले आहेत. रामदास तडस यांची सून पूजा तडस यांनी तडस कुटुंबीयांवर गंभीर आरोप केले आहेत. माझ्या बाळाचा बाप कोण? असा सवाल करत कुटुंबाने डीएनए चाचणी करायला सांगितल्याचा गंभीर आरोप पूजा तडस यांनी केला. हा आरोप करताना पूजा तडस यांना भर पत्रकार परिषदेत रडू कोसळले. त्या हमसून हमसून रडत होत्या. यावेळी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी त्यांना आधार देत त्यांचं सांत्वन केलं.

भाजप खासदार रामदास तडस यांची सून पूजा तडस आणि ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी नागपुरात पत्रकार परिषद घेतली. यावेळी पूजा तडस यांनी तडस कुटुंबाची पोलखोलच केली. मी यापूर्वीही तडस साहेबांना आणि परिवाराला आधीच बोलली होती की मी तुमच्याकडून कुठल्याही पैशाची मागणी केली नाही. पैशाची आणि इतर कोणतीही मागणी केली नाही. मी फक्त माझा अधिकार मागते आहे. तुम्ही माझ्या मुलाचा डीएनए कर म्हणून डाग लावला. तो डाग मला दूर करायचा आहे. मला माझं अस्तित्व परत करा, असं पूजा तडस म्हणाल्या.

अन् रडू कोसळले

आपल्या होत असलेल्या छळाची कहाणी सांगतानाच पूजा तडस यांचा हुंदका दाटून आला. त्या हमसून हमसून रडू लागल्या. त्यामुळे सुषमा अंधारे जागेवरून उठल्या. त्यांनी पूजा यांना आधार देत त्यांचं सांत्वन केलं. त्यानंतर पूजा तडस यांनी झालेला प्रकार सविस्तर सांगितला.

मी त्यांना ओळखतही नव्हते

यावेळी सुषमा अंधारे यांनी भाजपला चांगलंच धारेवर धरलं. पक्षीय राजकारणाच्या पलिकडे जाऊन बाई म्हणून बाईपणाच्या संवेदना समजून घेण्यासाठी ही पत्रकार परिषद आहे. मी परवा वर्ध्याला प्रचारासाठी आले होते. मला वाटलं असतं तर मी वर्ध्यात राजकारण करू शकले असते. पण तोपर्यंत माझी पूजा यांच्याशी ओळखही नव्हती. गोंदियाला आल्यावर मला त्यांचं प्रकरण कळलं. पूजा तडस म्हणाल्या वर्ध्यात पंतप्रधानांची सभा आहे. त्यापूर्वी मी आत्महत्या करेल. मला हे प्रकरण गंभीर वाटलं. म्हणून मी त्यात लक्ष घातलं, असं सुषमा अंधारे म्हणाल्या.

बाळ काय मिनिटात येतं?

तिला न्याय मिळायला पाहिजे. बाळ काय एका मिनिटात येतं काय ? तिचं बाळ सतरा महिन्याचं आहे. तिच्याकडे दुधाला पैसे नाहीत. ती वारंवार मागणी करते की माझ्या बाळाला दूध मिळालं पाहिजे. न्याय मिळाला पाहिजे. मात्र तिला ज्याप्रमाणे अडवलं, नडवलं जातं ते योग्य नाही. रामदास तडस आणि पंकज तडस यांना माझी विनंती आहे. तुम्ही निवडणूक लढवा. राजकारण करा. पण आधी त्या महिलेला न्याय द्या. तिला न्याय पाहिजे आहे, तो न्याय तिला मिळाला पाहिजे, असं अंधारे म्हणाल्या.

मोदी का परिवार म्हणता, मग…

तुम्ही मोदी का परिवार म्हणता, मग तुम्ही आपल्या परिवाराला का न्याय देऊ शकत नाही? जर हा हनी ट्रॅपचा प्रकार होता तर पहिल्यांदा तीन वर्षांपूर्वी हा प्रकार चालू होता, तेव्हाच त्याची तक्रार का दाखल केली नाही? लग्न का केलं? एक गर्भपातही झाला. बाळ 17 महिन्याचं होईपर्यंत शांत का बसला? हे प्रकरण त्यांनी क्लिष्ट करण्यात अर्थ नाही. त्यांनी वडिलांची निवडणूक पुढे न्यावी. मात्र पत्नीला न्याय द्यावा, असंही सुषमा अंधारे म्हणाल्या.

Non Stop LIVE Update
अजित पवारांचा पवार गटाच्या विजयी उमेदवाराला फोन... दादा काय म्हणाले?
अजित पवारांचा पवार गटाच्या विजयी उमेदवाराला फोन... दादा काय म्हणाले?.
ठाकरे लंडनच्या तयारीत, त्यांनी भांडुपच्या देवानंदला..., राणेंचा पलटवार
ठाकरे लंडनच्या तयारीत, त्यांनी भांडुपच्या देवानंदला..., राणेंचा पलटवार.
'... त्यामुळे दैत्यांचं तेच झाल', मविआच्या पराभवावर कंगना यांचा घणाघात
'... त्यामुळे दैत्यांचं तेच झाल', मविआच्या पराभवावर कंगना यांचा घणाघात.
महायुतीत कोणाला किती मंत्रिपद? मंत्रिपदाच्या फॉर्म्युल्यावर काय चर्चा?
महायुतीत कोणाला किती मंत्रिपद? मंत्रिपदाच्या फॉर्म्युल्यावर काय चर्चा?.
सत्तास्थापनेच्या हालचालींदरम्यान अजित पवार यांची मोठ्या पदावर वर्णी
सत्तास्थापनेच्या हालचालींदरम्यान अजित पवार यांची मोठ्या पदावर वर्णी.
'मला पाडण्यासाठी भाजपकडं भीक मागितली पण..',सत्तारांचा कोणावर हल्लाबोल?
'मला पाडण्यासाठी भाजपकडं भीक मागितली पण..',सत्तारांचा कोणावर हल्लाबोल?.
रणजितसिंह मोहिते पाटलांची भाजपमधून हकालपट्टी करा, कोणाची आक्रमक मागणी?
रणजितसिंह मोहिते पाटलांची भाजपमधून हकालपट्टी करा, कोणाची आक्रमक मागणी?.
पंकजा मुंडेंवर नवनिर्वाचित आमदाराकडून टीका, 'ताईंनी मला धोका...'
पंकजा मुंडेंवर नवनिर्वाचित आमदाराकडून टीका, 'ताईंनी मला धोका...'.
महायुतीला बहुमत, आता मुख्यमंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार?
महायुतीला बहुमत, आता मुख्यमंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार?.
'सुपडासाफ, रात्री 3 पर्यत सभा घेतल्या पण...', भुजबळांची जरांगेंवर टीका
'सुपडासाफ, रात्री 3 पर्यत सभा घेतल्या पण...', भुजबळांची जरांगेंवर टीका.