मुलाच्या वाढदिवसाला 2 लाख 65 हजाराचा केक, वेरणा कारच्या प्रतिकृतीमुळे परिसरात जोरात चर्चा
आतापर्यंत मुलाचे दोन वाढदिवस जोरात साजरे करण्यात आले आहेत. एका शिक्षकाने आपल्या मुलाच्या प्रेमापोटी इतका खर्च केल्यामुळे सगळीकडे त्याची जोरदार चर्चा सुरु आहे.
वसई : हावसेला मोल नसत असं म्हणतात, अशाच एका वसईच्या (Vasai) कामन परिसरातील हौशी बापाने, मुलाच्या प्रेमापोटी वेरणा कारची प्रतिकृती असलेला 221 किलोचा केक कापून आपल्या 2 वर्षाच्या मुलाचा मोठ्या थाटामाटात वाढदिवस साजरा केला आहे. या वाढदिवसाची संपूर्ण वसई तालुक्यात चर्चा होत आहे. इतका महागडा केकं आणि त्यावर हुबेहुब प्रतिकृती असलेली वेरणा कारचे (verna car cake) फोटो सगळीकडे व्हायरल झाले आहे. मुलाचा पहिला वाढदिवस (viral birthday) सुद्धा त्यांनी अनोख्या पद्धतीने साजरा केला होता. मागच्या दोन दिवसांपासून संपुर्ण तालुक्यात जोरात चर्चा सुरु आहे.
वसईच्या कामन येथील नवीत हरिश्चंद्र भोईर हे त्याच परिसरातील खिंडपाडा या जिल्हा परिषद शाळेत शिक्षक आहेत. त्यांना लग्नाच्या 6 वर्षानंतर मुलगा झाला. मात्र जन्मानंतर त्याला इन्फेक्शन झाल्याने तो अनेक दिवस आजारीच होता. भोईर यांनी त्यांच्या मुलाचे नाव रेयांश असे ठेवले असून, 4 मार्च रोजी त्याचा वाढदिवस होता.
पहिल्या वाढदिवसाला रेयांश ला घेऊन हेलिकॉप्टर स्वारी केली होती. तर त्याच्या दुसऱ्या वाढदिवसाला वडिलांची वेरणा कार ही रेयांशला जास्त आवडत असल्याने, वेरणा कारची प्रतिकृती असणारा 2 लाख 65 हजाराचा 221 किलोच केक कापून मोठ्या थाटामाटात वाढदिवस साजरा केला आहे. बँडबाजा, डीजेच्या तालावर वाजतगाजत हा वाढदिवस साजरा करण्यात आला. मुलाला वेरणा कार आवडत असल्याने त्यांच्या प्रेमापोटी हा केक कापला असल्याच्या भावना मुलाच्या वाडीलाने व्यक्त केल्या आहेत.
आतापर्यंत मुलाचे दोन वाढदिवस जोरात साजरे करण्यात आले आहेत. एका शिक्षकाने आपल्या मुलाच्या प्रेमापोटी इतका खर्च केल्यामुळे सगळीकडे त्याची जोरदार चर्चा सुरु आहे. त्याचबरोबर वाढदिवसाचे अनेक फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. वाढदिवसाला वसई तालुक्यातील मान्यवर मंडळी उपस्थित होती.