ठेकेदार कंपनी ब्लॅकलिस्ट, अधिकाऱ्यांवरही कारवाई, रस्त्यावरील खड्ड्यांप्रकरणी वसई-विरार आयुक्तांची थेट कारवाई

वसई-विरार महापालिका आयुक्तांनी रस्त्यांच्या दुरुस्तीत हलगर्जीपणा करणाऱ्या ठेकेदार आणि अधिकाऱ्यांना चांगलाच दणका दिला आहे (Vasai Virar road Potholes).

ठेकेदार कंपनी ब्लॅकलिस्ट, अधिकाऱ्यांवरही कारवाई, रस्त्यावरील खड्ड्यांप्रकरणी वसई-विरार आयुक्तांची थेट कारवाई
Follow us
| Updated on: Sep 06, 2020 | 11:02 AM

वसई-विरार : ऐन पावसाळ्यात निकृष्ट रस्त्यांवर खड्डे पडून नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. वसई-विरारमध्ये देखील अशीच स्थिती पाहायला मिळाली. यानंतर वसई-विरार महापालिका आयुक्तांनी स्वतः रस्त्यांची पाहणी करण्यास सुरुवात केली. यावेळी रस्त्यांची दुरावस्था आणि त्यात झालेला हलगर्जीपणा पाहून त्यांनी ठेकेदार आणि अधिकाऱ्यांना चांगलाच दणका दिला आहे (Vasai Virar road Potholes).

वसई विरार महापालिका क्षेत्रात रस्त्यातील खड्डे दुरुस्तीच्या कामात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवून आयुक्त गंगाथरण डी. यांनी ठेकेदाराला चांगलाच दणका दिलाय. रस्त्यावरील खड्डे बुजवण्याच्या सूचना देऊनही काम न केल्याचं आयुक्तांच्या पाहणीत समोर आलं. त्यानंतर आयुक्त गंगाथरण यांनी 2 इंजिनिअर आणि एका ठेकेदार कंपनीवर कारवाई केली.

वसई विरारमधील रस्ता दुरुस्तीचे काम ठेकेदार कंपनी राठोड भगीरथी अँड कंपनी यांना देण्यात आले होते. त्यांना आयुक्तांकडून रस्त्यातील खड्डे बुजवण्याच्या वारंवार सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, त्यानंतरही आयुक्तांच्या रस्ते पाहणीत खड्ड्यांचे साम्राज्य आढळून आले. बुजावलेल्या खड्ड्यात निकृष्ट दर्जाचे पेव्हरब्लॉक लावल्याचेही उघड झाले. त्यानंतर आयुक्तांनी तात्काळ या प्रकाराची दखल घेत मे. राठोड भगीरथी अँड कंपनी यांना महानगरपालिकेच्या ठेकेदार पॅनलवरुन काढून टाकले. ठेकेदाराविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याच्या सूचनाही आयुक्तांनी संबंधित विभागाला दिल्या आहेत.

संबंधित कामावर लक्ष ठेवणाऱ्या मिलिंद शिरसाट, कनिष्ट अभियंता (ठेका) यांना देखील कामावरुन कमी करण्यात आलंय. एकनाथ ठाकरे, शाखा अभियंता यांना कामात हलगर्जीपणा केल्याबाबत कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. कारवाई झालेले दोन्ही इंजिनिअर आणि ठेका कंपनी वसई विरार महापालिकेच्या प्रभाग समिती डीमध्ये कार्यरत होते.

आयुक्तांच्या कारवाईमुळे कामचुकारपणा करणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांचे धाबे दणाणले आहेत. वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्रातील विविध ठिकाणच्या रस्त्यावर पावसामुळे प्रचंड खड्डे पडले आहेत. आयुक्तांनी महानगरपालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाला खड्ड्यांची दुरुस्ती करण्याचं काम लवकरात लवकर करण्याबाबतच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार संबंधित विभागामार्फत महानगरपालिकेच्या पॅनलवरील ठेकेदारांकडून रस्त्यावरील खड्डे दुरुस्तीचे काम सुरु करण्यात आले.

यानंतर 4 सप्टेंबरला आयुक्तांनी खड्डे दुरुस्तीच्या कामाची पाहणी दौरा केला. त्यावेळी प्रभाग समिती ‘डी’मधील रस्त्यांवरील खड्डे दुरुस्त करणाऱ्या ठेकेदाराकडून जुने आणि निकृष्ट दर्जाचे पेव्हर ब्लॉक वापरले जात असल्याचे आयुक्तांच्या निदर्शनास आले. यापूर्वीच आयुक्तांनी विभागाला आणि ठेकेदारांना रस्त्यावरील खड्डे दुरुस्तीचे काम योग्यरीतीने होत नसल्याबाबत वारंवार सूचना दिल्या होत्या. परंतु तरीही रस्त्यावरील खड्डे दुरुस्तीच्या कामात हलगर्जीपणा झाल्याने ही धडक कारवाही करण्यात आली.

हेही वाचा :

ठाणे, कल्याण, सातारा, वसई-विरारमध्ये पावसामुळे रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य

वसई-विरारमध्ये कामचुकारपणा करणाऱ्या दोन सफाई कर्मचाऱ्यांचे निलंबन

Vasai Virar road Potholes

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.