वसई विरार महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर; त्रिसदस्यीय प्रभाग रचनेमुळे सत्ताधारी बहुजन विकास आघाडीला याचा मोठा फायदा होणार
त्रिसदस्यीय प्रभाग रचनेमुळे सत्ताधारी बहुजन विकास आघाडीला याचा मोठा फायदा होणार असून, मनसे, भाजपा, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी या पक्षांना मात्र आपले सदस्य निवडून आणण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे.मागच्या निवडणुकीत वसई विरार महापालिकेत 115 वार्डा चे 115 नगरसेवक होते.
मुंबई : वसई विरार महापालिकेचा(Vasai Virar Municipal Corporation) 28 जून 2020 ला कार्यकाळ संपल्या नंतर प्रशासका च्या माध्यमातून कामकाज सुरू होते. आता obc आरक्षणासाहित प्रभाग रचनेची सोडत( General Election Released Reservation Announced) पालिका आयुक्त अनिलकुमार पवार यांच्या उपस्थितीत आज विरार च्या भाऊसाहेब वर्तक सभागृहात पार पडली आहे. या आरक्षण सोडतीत बहुजन विकास आघाडी, शिवसेना, भाजपा च्या माजी नगरसेवकांचे प्रभाग सुरक्षित झाले आहेत. त्रिसदस्यीय प्रभाग रचनेमुळे सत्ताधारी बहुजन विकास आघाडीला(Bahujan Vikas Aghadi ) याचा मोठा फायदा होणार असून, मनसे, भाजपा, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी या पक्षांना मात्र आपले सदस्य निवडून आणण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे.मागच्या निवडणुकीत वसई विरार महापालिकेत 115 वार्डा चे 115 नगरसेवक होते.
मागच्या निवडणुकीतील संख्याबळ
- बहुजन विकास आघाडी 107
- बविआ पुरस्कृत अपक्ष 01
- शिवसेना 05
- भाजपा 01
- मनसे 01
- एकूण 11
माजी स्थायी समिती सभापती प्रशांत राऊत यांच्या विरार पूर्व मनवेलपाडा परिसरातील प्रभाग क्र 11, 12, 14 मध्ये obc महिला, sc महिला, आणि सर्वसाधारण असल्याने त्यांना तिन्ही प्रभाग सुरक्षित आहेत. बविआ चे माजी महापौर प्रवीण शेट्टी यांचा प्रभाग 39 असून यात obc सर्वसाधारण, सर्वसाधारण महिला आणि सर्वसाधारण असल्याने त्यांनाही सुरक्षित आहे. बविआ तून शिवसेनेत गेलेले आणि शिंदेच्या बंडखोरी नंतर वसई नालासोपारा विधानसभेचे नवनिर्वाचित जिल्हाप्रमुख झालेले पंकज देशमुख यांनाही दिलासा मिळाला असून प्रभाग क्र 17 मध्ये एक सर्वसाधारण जागा असल्याने त्यांना संधी मिळणार आहे.
शिवसेनेच्या गटनेत्या किरण चेंदवनकर यांचा प्रभाग 36 मध्ये सर्वसाधारण महिला, st महिला, आणि एक सर्वसाधारण असल्याने त्यांनाही दिलासा मिळाला आहे. भाजपाचे एकमेव नगरसेवक किरण भोईर यांचा प्रभाग 29 मध्ये sc पुरुष, सर्वसाधारण महिला, आणि सर्वसाधारण 1 असल्याने त्यांचा मार्ग ही सुखकर आहे. प्रभाग क्रमांक 26 मध्ये 1 obc, 1 सर्वसाधारण महिला आणि 1 सर्वसाधारण सदस्यसंख्या आहे. या प्रभागात बविआ चे माजी नगरसेवक पंकज पाटील आणि मनसे चे एकमेव नगरसेवक प्रफुल पाटील या दोघात रस्सीखेच असणार आहे. पण दोघेही obc आहेत. जर दोघांनी समजोत्याने एकाने obc आणि एकाने सर्वसाधारण मधून निवडणूक लढवली तर दोघांसाठी मार्ग सुखकर असणार आहे.
वसईच्या नवघर माणिकपूर मध्ये 32, 34, 35 37 असे 4 प्रभाग आहेत. या चारही प्रभागात obc महिला, सर्वसाधारण महिला आणि एक सर्वसाधारण अशी सदस्य संख्या आहे. या ठिकाणी माजी उपमहापौर प्रकाश rodriks, माजी महापौर नारायण मानकर यांचे पुत्र माजी नगरसेवक कल्पेश मानकर, संदेश जाधव, माजी सभापती उमा पाटील, भरत गुप्ता हे दिग्गज आहेत. पण या सर्वांसाठी सर्वसाधारण जागेवर मार्ग सोपा आहे. माजी सभापती पंकज ठाकूर, माजी नगरसेवक हार्दिक राऊत, माजी सभापती रमेश घोरखाना, कन्हय्या उर्फ बेटा भोईर, असिफ शेख, या सर्वांचे प्रभाग सुरक्षित आहेत.