Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजीपाला आणि फळांच्या दरांबाबत धोरणात्मक निर्णयासाठी मंत्रालयात बैठक होणार

राज्यातील भाजीपाला आणि फळांच्या कोसळलेल्या दरा बाबत राज्य सरकार धोरणात्मक निर्णय घेणार आहे. याबाबत बुधवारी मंत्रालयात बैठक पार पडणार असल्याची माहिती कृषी व अन्न नागरी पुरवठा राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी दिली आहे. तसंच राज्यात विदर्भ, मराठवाडा भागात अतिवृष्टी होऊन झालेल्या पिकांच्या नुकसानीच्या बाबतीत कृषी विभागाला पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

भाजीपाला आणि फळांच्या दरांबाबत धोरणात्मक निर्णयासाठी मंत्रालयात बैठक होणार
विश्वजित कदम, कृषी राज्यमंत्री
Follow us
| Updated on: Aug 31, 2021 | 10:44 PM

सांगली : राज्यातील विविध बाजारात टोमॅटो रस्त्यावर फेकून दिल्यानं लाल चिखल झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. त्यानंतर अखेर सरकारला जाग आली असून, राज्यातील भाजीपाला आणि फळांच्या कोसळलेल्या दरा बाबत राज्य सरकार धोरणात्मक निर्णय घेणार आहे. याबाबत बुधवारी मंत्रालयात बैठक पार पडणार असल्याची माहिती कृषी व अन्न नागरी पुरवठा राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी दिली आहे. तसंच राज्यात विदर्भ, मराठवाडा भागात अतिवृष्टी होऊन झालेल्या पिकांच्या नुकसानीच्या बाबतीत कृषी विभागाला पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तो अहवाल आल्यानंतर त्या ठिकाणी शेतकऱ्यांना मदतीच्या बाबतही निर्णय घेण्यात येईल, असंही कदम यांनी स्पष्ट केलंय. (Meeting for strategic decision on vegetable and fruit prices -Vishwajit kadam)

त्याचबरोबर पूरग्रस्त शेतकऱ्यांना 2019 च्या पार्श्वभूमीवर मदत देण्याचा तत्वत: निर्णय घेण्यात आल्याची माहितीही विश्वजीत कदम यांनी दिली. राज्यात धान्यपुरवठाच्या बाबतीत पारदर्शकता ठेवण्याबाबत पुरवठादार, ठेकेदारांना कडक सूचना देण्यात आल्या आहेत. धान्य पुरवठयाबाबत जीपीआरएसद्वारे आणि अत्याधुनिक प्रणालीद्वारे नजर ठेवून त्याची कडक अंमलबजावणी होणार आहे. गैरप्रकार झाल्यास पुरवठादार, ठेकेदारावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचंही विश्वजीत कदम यांनी सांगितलं. सांगली जिल्हा काँग्रेस अध्यक्षपदी आमदार विक्रम सावंत यांची निवड झाल्यानंतर त्यांच्या सत्कारानिमित्त सांगली मध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यानंतर पार पडलेल्या पत्रकार परिषदेत कदम बोलत होते.

किसान सभा टोमॅटो दर प्रश्नावर आक्रमक

टोमॅटोचे दर अचानक कोसळल्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. टोमॅटो उत्पादकांना त्यांच्या अडचणीच्या काळात सरकारने तातडीने मदत करावी आणि एकरी किमान 50 हजार रुपयांचे तातडीने अनुदान द्यावे, अशी मागणी किसान सभा आणि समविचारी संघटनांनी केलीय. या मागणीसाठी किसान सभेसह या संघटनांच्या कार्यकर्त्यांनी अकोले येथील समशेरपूर बाजार समितीमध्ये आंदोलन केलं.

शेतकरी नेते अजित नवले म्हणाले, “टोमॅटो दराचा प्रश्न सुटावा यासाठी नेपाळ पाकिस्तान व बांगलादेश या शेजारील राष्ट्रांना टोमॅटोची निर्यात करण्यात येणाऱ्या अडचणी तातडीने सोडवाव्यात. महाराष्ट्राबाहेर इतर राज्यात टोमॅटोची कोठे मागणी आहे याचा तातडीने शोध घ्यावा. या राज्यांना टोमॅटो पुरविण्यासाठी महाराष्ट्राच्या पणन विभागाने तातडीने पावले उचलावीत. कोविड लॉकडाऊनचा परिणाम म्हणून अनेक ठिकाणी टोमॅटो प्रक्रिया उद्योग बंद आहेत. विशेष प्रोत्साहन व सवलती देऊन हे उद्योग तातडीने सुरु करण्याबाबत सरकारने पावले टाकावीत.”

फळांना मागणी, दर स्थिर

नवी मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये 250 गाड्यांची आवक झाली. डेंग्यू आजारामुळे ड्रॅगन फळाला चांगली मागणी असते. या फळाचा आजचा दर 25 ते 30 प्रतिनग असा आहे. शिवाय किवी, पपई, मोसंबी, सफरचंद आणि सीताफळाची आवकही वाढली आहे. श्रावणामुळेही ग्राहकांकडून फळांना पसंती दिली जात आहे. सफरचंदचा हंगाम जोमात असून आवक वाढल्याने त्याची किंमत प्रती किलो 80 ते 100 वरून 60 ते 80 रुपयांवर आली आहे. पावसाळा सुरू झाल्यापासून डेंग्यू आणि मलेरियाचे संशयित रुग्ण आढळू लागले आहेत. या आजारात रुग्णांच्या प्लेटलेट्स कमी होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे डॉक्टर किवी, ड्रॅगन फ्रूट आणि पपई खाण्याचा सल्ला देत असतात. त्यामुळे या फळांना मागणी वाढली असल्याचं व्यापारी हरेश वसनदानी यांनी सांगितलं.

मुंबई एपीएमसी मार्केटमधील आजचे फळांचे बाजारभाव

ड्रॅगन फ्रूट – 25 ते 30 रुपये प्रती नग किवी – 10 रुपये प्रती नग पपई – 20 रुपये प्रति नग सफरचंद – 60 ते 80 रु. प्रति किलो डाळिंब – 50 ते 120 रु. प्रति किलो पेर – 50 ते 100 रुपये किलो

इतर बातम्या :

श्रावण महिन्यासह पावसाळी आजारांमुळे फळांची मागणी वाढली; बाजारभाव मात्र आवाक्यात

पुण्यात विमान प्रवाशांसाठी लवकरच 5 लाख चौरस फुटांचं टर्मिनल, सोयीसुविधा कशा असणार?

Meeting for strategic decision on vegetable and fruit prices – Vishwajit kadam

आमदाराच्या पीएच्या बायकोचा मंगेशकर रुग्णालयात मृत्यू, अहवालात काय?
आमदाराच्या पीएच्या बायकोचा मंगेशकर रुग्णालयात मृत्यू, अहवालात काय?.
हिंदुत्वावरून प्रफुल्ल पटेल अन संजय राऊत भिडले, रंग बदलला vs बाप बदलला
हिंदुत्वावरून प्रफुल्ल पटेल अन संजय राऊत भिडले, रंग बदलला vs बाप बदलला.
'तर बरं झालं असतं', राऊतांच्या 'त्या' टीकेवर प्रफुल्ल पटेलांचा पलटवार
'तर बरं झालं असतं', राऊतांच्या 'त्या' टीकेवर प्रफुल्ल पटेलांचा पलटवार.
पुण्यात गर्भवती महिलेचा मृत्यू, 'दीनानाथ मंगेशकर'च्या पाटीला काळं
पुण्यात गर्भवती महिलेचा मृत्यू, 'दीनानाथ मंगेशकर'च्या पाटीला काळं.
राज्यभरात अवकाळी पावसाचा हैदोस IMD कडून मुंबईसह 'या' जिल्ह्यांना अलर्ट
राज्यभरात अवकाळी पावसाचा हैदोस IMD कडून मुंबईसह 'या' जिल्ह्यांना अलर्ट.
दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाबाहेर शिवसैनिक आक्रमक, घोषणाबाजीसह चिल्लर फेक
दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाबाहेर शिवसैनिक आक्रमक, घोषणाबाजीसह चिल्लर फेक.
महिला मजूरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत अन्..नांदेडमध्ये काय घडलं?
महिला मजूरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत अन्..नांदेडमध्ये काय घडलं?.
'शिंदे, पवार तोंडाला पोपट बांधून फिरतात', संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
'शिंदे, पवार तोंडाला पोपट बांधून फिरतात', संजय राऊत नेमकं काय म्हणाले?.
शरद पवार यांचा बाप...बापाच्याच पाठीत खंजीर; राऊतांच्या निशाण्यावर कोण?
शरद पवार यांचा बाप...बापाच्याच पाठीत खंजीर; राऊतांच्या निशाण्यावर कोण?.
'हा दलाल... माझ्या नादाला लागू नको, नाहीतर नागडा करीन मी...'- राऊत
'हा दलाल... माझ्या नादाला लागू नको, नाहीतर नागडा करीन मी...'- राऊत.