“तुमच्यासारखी पातळी सोडून बोलण्याची परंपरा पवार साहेबांच्या पक्षात नाही”;धर्मवीरच्या वादावरून या नेत्याने राष्ट्रवादीची परंपरा आणि संस्कार सांगितले
तुमच्यासारखी पातळी सोडून बोलण्याची परंपरा शरद पवार यांच्या पक्षात नाही त्यामुळे मी शांत आहे असंही त्यांनी त्यांना सांगितले आहे.
अकोला : विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजीराजे हे धर्मवीर नव्हते तर ते स्वराज्यरक्षक होते असं वक्तव्या केल्यामुळे राज्यातील सामाजिक आणि राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. अजित पवार यांच्या या वक्तव्यावरून भाजप, शिंदे गट विरुद्ध महाविकास आघाडी असा आता सामना रंगला आहे. यावरून शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांच्यावर निशाणा साधला होता.
त्यावेळी त्यांना प्रत्युत्तर देताना अमोल मिटकरी यांनी संभाजीराजे यांच्यावरू चालेल्या वादात आपण भाग घेऊ नये, आणि संभाजीराजे यांच्या सैन्यातील सैन्यांशी आपला संबंध जोडूही नये असा टोलाही त्यांना लगावण्यात आला.
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजीराजे यांच्यावर केलेल्या वक्तव्यावरून गायकवाड आणि मिटकरी वाद आता टोकाला पोहचला आहे.
आमदार संजय गायकवाड यांनी मिटकरी यांच्यावर पातळीसोडून टीका केली होती. त्यावर बोलताना अमोल मिटकरी म्हणाले की, गायकवाड माझ्यापेक्षा वयाने मोठे आहेत. मी त्यांचा आदर करतो. आम्ही शांत आहोत आणि मला शांतच राहू द्या.
तुमच्यासारखी पातळी सोडून बोलण्याची परंपरा शरद पवार यांच्या पक्षात नाही त्यामुळे मी शांत आहे असंही त्यांनी त्यांना सांगितले आहे.
माझे हिंदुत्व हे सर्व धर्म समभावाचं आहे, संभाजीराजे स्वराज्य रक्षक होते आणि आहेत आणि स्वराज्य रक्षक राहतील. त्यामुळे त्यांनी किती पातळी सोडली तरी मला ती पातळी सोडायची नसल्याचा खोचक टोला मिटकरी यांनी संजय गायकवाड यांना लगावला आहे.
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजीराजे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे राज्याभरातून विरोधकांकडून त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल करण्यात येत आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिर्डीत भाजपचा मोर्चा काढून त्यांच्याविरोधात निषेधमोर्चा काढून अजित पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.