Video : मारुतीराया राहिला बाजुलाच, नाशिकच्या धर्मपरिषदेत साधू-महंत एकमेकांवर धावले, एकानं तर माईकची ‘गदा’ केली

नाशिकमधील एका महंतांनी जगतगुरु शंकराचार्य यांना उल्लेख काँग्रेसी असा केला आणि त्यानंतर वादाला तोंड फुटलं. शंकराचार्यांची माफी मागावी, अशी आक्रमक मागणी त्यानंतर लावून धरण्यात आली.

Video : मारुतीराया राहिला बाजुलाच, नाशिकच्या धर्मपरिषदेत साधू-महंत एकमेकांवर धावले, एकानं तर माईकची 'गदा' केली
नाशिक शास्त्रार्थ सभाImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: May 31, 2022 | 3:53 PM

नाशिक : हनुमानाच्या (Hanuman) जन्मस्थळावरुन सुरु झालेल्या वादावर तोडगा काढण्यासाठी नाशिकमध्ये शास्त्रार्थ सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. पण या शास्त्रार्थ सभेत (Shastrartha Sabha) मारुतीराया बाजुलाच राहिला आणि साधु-महंत आपसांत भिडल्याचं चित्र पाहायला मिळालं. नाशिकमधील एका महंतांनी जगद्गुरु शंकराचार्य (Shankaracharya) यांना उल्लेख काँग्रेसी असा केला आणि त्यानंतर वादाला तोंड फुटलं. शंकराचार्यांची माफी मागावी, अशी आक्रमक मागणी त्यानंतर लावून धरण्यात आली. तत्पूर्वी आसनव्यवस्थेवरुनही हे साधू-महंत एकमेकांसमोर उभे ठाकल्याचं पाहायला मिळालं.

आसनव्यवस्थेवरुनही साधू-महंतांमध्ये वाद

कर्नाटकातील किष्किंदा मठाधिपती महंत गोविंददास महाराज यांनी किष्किंदा हेच हनुमानाचे जन्मस्थान असल्याचा दावा केला. त्याचवेळी नाशिकच्या महंतांनी अंजनेरी हेच हनुमानाचं जन्मस्थळ असल्याचं म्हटलंय. त्यावर महंत गोविंददास महाराज हे आपल्या दाव्यावर ठाम राहत त्यांनी नाशिकच्या साधू महंतांना आव्हान दिलं. इतकंच नाही तर ते शास्त्रार्थासाठी नाशिकमध्ये दाखलही झाले. मात्र, आज शास्त्रार्थ सभा सुरु होण्यापूर्वीच सभेतील आसनस्थळावरुन वाद रंगला. आसनव्यवस्थेमध्ये जेष्ठ-कनिष्ठतेनुसार काही महंतांचा अपमान होत असल्याचा आरोप करण्यात आला. महंत गोविंददास यांनी ज्येष्ठ महंतांच्या आसनावर बसू नये यावरुन वादाला सुरुवात झाली. त्यामुळे शास्त्रार्थ सभेत काही काळ तणावर पाहायला मिळाला.

जगद्गुरु शंकराचार्य यांचा काँग्रेसी असा उल्लेख झाल्यानं राडा

शास्त्रार्थ सभा सुरु झाल्यानंतर नाशिकमधील महंतांनी जगद्गुरु शंकराचार्य यांचा काँग्रेसी असा उल्लेख केल्याचा आरोप करण्यात आला. इतकंच नाही तर महंत सुधीरदास महाराज यांनी महंत गोविंददास महाराज यांच्यावर माईकही उगारला. त्यानंतर मात्र, शास्त्रार्थ सभेत मोठा राडा पाहायला मिळाला. जगद्गुरुंचा अपमान केल्याप्रकरणी महंत सुधीरदास यांनी माफी मागावी अशी आक्रमक मागणी करण्यात आलीय. त्यानंतर शास्त्रार्थ सभेत मोठा राजा पाहायला मिळाला.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.