Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : आता अमोल कोल्हेही म्हणतात मैं थकेगा नहीं साला…हातात टायर अंगात फायर, व्हिडिओ पाहाच

आता अमोल कोल्हेंचं एक फायरब्रॅड रुप समोर आलंय. मालिका, चित्रपट, राजकारण आणि आता फिटनेस, अमोल कोल्हेंचं हा फायरब्रॅन्ड फंडा (Amol Kolhe Fitness Video) सर्वांनाच आवडू लागलाय.

Video : आता अमोल कोल्हेही म्हणतात मैं थकेगा नहीं साला…हातात टायर अंगात फायर, व्हिडिओ पाहाच
अमोल कोल्हेंच्या फिटनेसची चर्चाImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Mar 24, 2022 | 2:13 PM

मुंबई : अभिनेता ते खासदार आपण अमोल कोल्हेंना (Amol Kolhe) आजपर्यंत अनेक खडतर भूमिका साकारताना पाहिलंय. मात्र आता अमोल कोल्हेंचं एक फायरब्रॅड रुप समोर आलंय. मालिका, चित्रपट, राजकारण आणि आता फिटनेस, अमोल कोल्हेंचं हा फायरब्रॅन्ड फंडा (Amol Kolhe Fitness Video) सर्वांनाच आवडू लागलाय. अलिकडेच अमोल कोल्हे यांनी इन्स्टाला व्हीडिओ शेअर केला आहे. यात ते टायरसोबत वर्कआऊट करताना दिसत आहेत. या व्हीडिओला त्यांनी (PuShpa) ‘पुष्पा’स्टाईल कॅप्शन दिलं आहे. “यह टायर तो फायर निकला… लेकिन मैं थकेगा नहीं साला… लहानपणी धुळीच्या रस्त्यांवर जुन्या टायरला एका हातातील काठीने बडवत दुसऱ्या हाताने कमरेवरून घरंगळणारी चड्डी सावरताना वाटलं नव्हतं की टायर असा घाम काढेल!”, असं कॅप्शन दिलं आहे. अमोल कोल्हे यांच्या व्हीडिओची आणि त्यांच्या कॅप्शनची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.

कोल्हेंकडून व्हिडिओ इन्टाग्रामवर पोस्ट

View this post on Instagram

A post shared by Dr. Amol Kolhe (@amolrkolhe)

कोल्हेंच्या फिटनेसची चर्चा

हा भला मोठा टायर उचलच अमोल कोल्हे या व्हिडिओत आपला फिटनेस दाखवताना दिसत आहे. हा टायर उचलायला अंगातही तेवढंच फायर पाहिजे, नायतर हे कुणाचंही काम नाही. अंगापेक्षाही जास्त वजनाचा टायर उचलून अमोल कोल्हे फुल्ल जोशमध्ये चालताना दिसत आहे. सध्या सोशल मीडियावर सगळीकडे पुष्पा या चित्रपटाच्या डायलॉगची हवा आहे. अनेक नेत्यांना भुरळ घालणारा हा चित्रपट अमोल कोल्हे यांनाही चांगलाच आवडलाय. म्हणूनच कोल्हे यांनीही या व्हिडिओला तसेच जबरदस्त कॅप्शन दिलंय. त्या व्हिडिओला त्यांच्या चाहत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या कमेंटची तशाच भन्नाट आल्या आहेत. एक युजरने लिहलं आहे, ?❤️‍? Fire Hai Bosss ❤️‍??, कडक caption ????❤️?? म्हणत हे इमोजी पोस्ट केले आहेत. एका युजरन या कॅप्शनला रिअॅक्ट होताना लिहलं आहे, आम्हांला विश्वास आहे तुम्ही थकणारे नाहीत ते ??, अशा भन्नाट कमेंट या पोस्टवर येत आहेत.

हटके स्टाईलनं नेहमीच चर्चेत

याआधीही अमोल कोल्हे आपल्या हटके स्टाईलनं चर्चेत आले होते. त्यांनी बैलगाडा शर्यतीत चक्क घोड्यावरून एन्ट्री मारली होती. या एन्ट्रहीही तेवढीच चर्चा होती. अमोल कोल्हे संसदेत बोलतनाही विरोधकांना अनेक मुद्द्यांवरून धारेवर धरतात. त्यांचा हाच बिनधास्त अंदाज पाहून पंतप्रधान मोदी यांनीही त्यांचं संसदेत कौतुक केले आहे. आता पुन्हा या व्हिडिओची सोशल मीडियावर हवा झालीय.

नारायण राणे, कृपाशंकर सिंहांवरील सोमय्यांच्या आरोपाचं काय झालं? नाना पटोलेंचा खोचक सवाल

Sanjay Raut On Modi: एक पुतीन दिल्लीत बसलेत, ते रोज आमच्यावर मिसाईल सोडताहेत; राऊतांची फटकेबाजी

TOP 9 Headlines | 23 March 2022 | टीव्ही 9 मराठी Alert | एका मिनिटात 9 बातम्या

उदयनराजेंच्या रायगडावर अमित शहांसमोर 'या' 5 मागण्या, म्हणाले...
उदयनराजेंच्या रायगडावर अमित शहांसमोर 'या' 5 मागण्या, म्हणाले....
शिवरायांना अभिवादन करण्यासाठी शाह रोपवेनं किल्ले रायगडावर, बघा व्हिडीओ
शिवरायांना अभिवादन करण्यासाठी शाह रोपवेनं किल्ले रायगडावर, बघा व्हिडीओ.
...म्हणून पुण्यात गर्भवतीचा मृत्यू, तिसऱ्या अहवालातून मोठी माहिती उघड
...म्हणून पुण्यात गर्भवतीचा मृत्यू, तिसऱ्या अहवालातून मोठी माहिती उघड.
शाह रायगड दौऱ्यावर, तटकरेंकडे स्नेहभोजन; पालकमंत्रिपदाचा तिढा सुटणार?
शाह रायगड दौऱ्यावर, तटकरेंकडे स्नेहभोजन; पालकमंत्रिपदाचा तिढा सुटणार?.
'खबर पता चली क्या?',राऊतांकडून बकऱ्याचा फोटो ट्वीट अन् शिंदेंना डिवचलं
'खबर पता चली क्या?',राऊतांकडून बकऱ्याचा फोटो ट्वीट अन् शिंदेंना डिवचलं.
VIDEO हातात खुर्च्या अन् बदडलं, घाटकोपरच्या कबड्डी स्पर्धेत हाणामारी
VIDEO हातात खुर्च्या अन् बदडलं, घाटकोपरच्या कबड्डी स्पर्धेत हाणामारी.
'बांगर बोलतोय', डेंगूच्या रुग्ण अन् बिल 6 लाख...डॉक्टरलाच धरलं धारेवर
'बांगर बोलतोय', डेंगूच्या रुग्ण अन् बिल 6 लाख...डॉक्टरलाच धरलं धारेवर.
भारतात लांब कानाचे कुत्रे कुठे? वाघ्याला फेकून द्या, राजेंचा संताप अन्
भारतात लांब कानाचे कुत्रे कुठे? वाघ्याला फेकून द्या, राजेंचा संताप अन्.
'...तेव्हा कोकणाला काय दिलं?', एकच सवाल अन् राणेंचा ठाकरेंवर हल्लाबोल
'...तेव्हा कोकणाला काय दिलं?', एकच सवाल अन् राणेंचा ठाकरेंवर हल्लाबोल.
मुंबईतील वाहतुकीचे पर्याय अधिक सक्षम होणार! फडणवीसांची मुंबईसाठी घोषणा
मुंबईतील वाहतुकीचे पर्याय अधिक सक्षम होणार! फडणवीसांची मुंबईसाठी घोषणा.