Video : कल्याण रेल्वे स्थानकावर पॉईंट मनच्या प्रसंगावधानामुळे प्रवाशाला जीवदान
एक्सप्रेसमध्ये एक प्रवासी चढत होता. त्यावेळी त्याचा तोल गेला. त्यावेळी तो प्रवासी प्लॅटफॉर्म आणि रेल्वेच्या गॅपमध्ये पडला. त्यावेळी अचानक रेल्वे सुरु झाली. त्यावेळी पॉईंट मन शिवाजी सिंग यांच्या लक्षात ही बाब आली. सिंग यांनी प्रसंगावधान राखत प्रवाशाकडे धाव घेतली आणि प्रवाशाला सुखरुपपणे बाहेर काढलं.
कल्याण : कल्याण रेल्वे स्थानकावरुन देव तारी त्याला कोण मारी या म्हणीचा प्रत्यय आलाय. रविवारी दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास हावडा एक्सप्रेस कल्याण रेल्वे स्थानकावर आली होती. या एक्सप्रेसमध्ये एक प्रवासी चढत होता. त्यावेळी त्याचा तोल गेला. त्यावेळी तो प्रवासी प्लॅटफॉर्म आणि रेल्वेच्या गॅपमध्ये पडला. त्यावेळी अचानक रेल्वे सुरु झाली. त्यावेळी पॉईंट मन शिवाजी सिंग यांच्या लक्षात ही बाब आली. सिंग यांनी प्रसंगावधान राखत प्रवाशाकडे धाव घेतली आणि प्रवाशाला सुखरुपपणे बाहेर काढलं. त्यावेळी अन्य प्रवाशांनी आरडाओरड करत साखळी ओढली. त्यामुळे रेल्वेही तात्काळ थांबल्याने प्रवाशाचा जीव वाचला. (Railway Passengers’ lives were saved at Kalyan railway station due to the attention of Point Man)
लोकोपायलटच्या सतर्कतेमुळे आजोबांचे प्राण वाचले
चार महिन्यांपूर्वी कल्याण रेल्वे स्थानकात लोकोपायलटच्या सतर्कतेमुळे एका वयोवृद्ध व्यक्तीचा जीव वाचला होता. वयोवृद्ध आजोबांचे नाव हरीप्रसाद कर्ण असं होतं. अंघोळीसाठी लागणाऱ्या पाण्याच्या वादातून तसेच दुसऱ्याही मुलाच्या घरी बिनसल्यामुळे या आजोबांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. आत्महत्या करताना या आजोबांना वाचवण्यात यश आलं. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.
घरी वाद झाल्यानंतर ते आजोबा रेल्वेस्थानकावर आले. स्थानकातील फलाट क्रमांक चारवर मुंबई-बनारस एक्स्प्रेस या रेल्वेजवळ ते आले. गाडी सुरु होताच आजोबा ट्रेनसमोर उतरले. हे सगळं काही अचानकपणे घडल्यामुळे लोको पायलट एस. के. प्रधान आणि सहाय्यक लोको पायलट रवी शंकर हे काही काळासाठी गोंधळले. मात्र, त्यांच्याच सर्तकतेमुळे आजोबांचे प्राण वाचले. आजोबा गाडीसमोर आल्याचे पाहून एस.के. प्रधान आणि रवी शंकर यांनी इमर्जन्सी ब्रेक दाबले. परिणामी इंजिनखाली येऊनसुद्धा आजोबा हरीप्रसाद बचावले.
Trespassing railway tracks is dangerous and illegal but still people take the risk. A senior citizen narrowly escaped death after a locomotive train in Mumbai’s Kalyan area applied emergency brakes to save the man as he was crossing the tracks. pic.twitter.com/snEy25APul
— Shivangi Thakur (@thakur_shivangi) July 18, 2021
इतर बातम्या :
फुकट्यांकडून 100 कोटींची वसुली! रेल्वेचा मोठा महसुली तोटा वाचला
‘..तर तुम्हाला तोंड दाखवायला जागा उरणार नाही’, आशिष शेलारांचा नवाब मलिकांना इशारा
Railway Passengers’ lives were saved at Kalyan railway station due to the attention of Point Man