रायगड : कोण म्हणतं या जगात देवदूत नसतो?, याचा साक्षात प्रत्यय वांगणी रेल्वे स्थानकात पाहायला मिळाला आहे (Point Man Rescue A Boy ). येथे एक लहान मुलगा आईच्या हातातून सुटून थेट रेल्वे ट्रॅकवर पडला आणि समोरुन भरधाव वेगाने गाडी येत होती. ही आई जीवाच्या आकांताने मुलाला वाचवण्यासाठी ओरडत होती. तेव्हा रेल्वेचा एक पॉईंटमन देवदितासारखा धावून आला आणि आपल्या जीवाची पर्वा न करता या चिमुकल्याचे प्राण वाचवले (Video Vangni Railway Station Point Man Rescue A Boy Who Fall On Railway Track).
एक आंधळी आई 17 एप्रिलला सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास आपल्या मुलाला घेवून प्लॅटफॉर्मवरुन जात होती. तेवढ्यात तो मुलगा आईच्या हातातून सुटून ट्रॅकवर पडला. त्या माऊलीला हे कळालं की आपला मुलगा ट्रॅकवर पडलाय, पण काहीही दिसत नसल्याने तिला कळेना काय करावं, तेवढ्यात तिला ट्रेनचा आवाज आला. तेव्हा ही आई जीवाच्या आकांताने आपल्या मुलाला वाचविण्यासाठी आरडाओरड करु लागली. याचवेळी विरुद्ध बाजुच्या प्लॅटफॉर्मवर असलेल्या वागंणी स्टेशनवरील पॉईंटमन मयुर शेळके यांनी सर्व प्रकार पाहिला आणि प्रसंगावधान राकत त्याने थेट ट्रॅकवर उडी घेतली.
भरधान येणाऱ्या मेलसमोर धावत त्यांनी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता त्या मुलाचे आणि मुलाचे प्राण वाचविले. मयुर शेळके या पॉईंटमनच्या धाडसामुळे ट्रॅकवर पडलेल्या छोट्या मुलाचे प्राण वाचले आहेत. मयुर यांच्या धाडसाचा हा सर्व प्रकार तिथल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.
अंध मातेच्या मदतीला देवदूताप्रमाणे धावून आलेल्या या युवकाचे करावे तेवढे कौतुक थोडेच आहे. या जगात जीवावर उदार होऊन लोकांची मदत करण्याची भावना शिल्लक आहे, हेच हा व्हीडिओ पाहून कळतं!
मित्रा, हॅट्स ऑफ तुझ्या शौर्याला.#Raigad #CCTV @TV9Marathi https://t.co/715ZSDUSh0— Dhananjay Munde (@dhananjay_munde) April 19, 2021
Video Vangni Railway Station Point Man Rescue A Boy Who Fall On Railway Track
संबंधित बातम्या :
लहान मुलांना सांभाळा, दोन्ही फुप्फुसात न्युमोनाईटीस, औरंगाबादेत कोरोनाग्रस्त बालिकेचा मृत्यू
VIDEO: महिलांना अश्लिल व्हीडिओ पाठवणाऱ्या विकृत तरुणाला मनसेच्या कार्यकर्त्यांकडून चोप