Vidhan Parishad Election : चमत्कार कसा घडतो हे सोमवारी कळेलच, अजित पवारांचं भाजपला खुलं आव्हान

आमचा एवढ्या वर्षाचा अनुभव लक्षात घेता आम्हाला थोडीशी मते तरी मिळतील ना असा टोलाही अजित पवार यांनी पत्रकांरानी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना लगावला.

Vidhan Parishad Election : चमत्कार कसा घडतो हे सोमवारी कळेलच, अजित पवारांचं भाजपला खुलं आव्हान
Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 18, 2022 | 6:50 PM

मुंबई : सध्या विधान परिषदेसाठी (Vidhan Parishad Election) रोज नवे दावे प्रतिदावे सर्वच राजकीय पक्षांकडून करण्यात येत आहेत. भाजप नेत्यांनी आपल्या सर्व उमेदवारांच्या विजयाचा दावा केलाय. त्यासाठी भाजप नेते (BJP) हे सतत अपक्ष आमदार आणि छोठ्या पक्षांच्या संपर्कात आहे. तर दुसरीकडे विधानपरिषद निवडणूकीत चमत्कार होईल की नाही आणि चमत्कार कसा घडेल हे उभा महाराष्ट्र सोमवारी पाहिलच ना अशा शब्दात विधानपरिषदेच्या निवडणूकीतील रणनीतीवर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज माध्यमांशी बोलताना भाष्य केले. उस्मानाबादमधील भाजपच्या पदाधिकार्‍यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्यावेळी अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. आमचा एवढ्या वर्षाचा अनुभव लक्षात घेता आम्हाला थोडीशी मते तरी मिळतील ना असा टोलाही अजित पवार यांनी पत्रकांरानी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना लगावला.

आम्ही निवडणुकीत एकजुटीने लढू

विधानपरिषद निवडणूकीत आम्ही सगळेजण मनापासून प्रयत्न करत आहोत. सेनेकडे दोन निवडून आणू शकतात एवढी मते आहेत. आमच्या दोघांना न्यायालयाने परवानगी दिली नाही त्यामुळे आमच्याकडे ५१ आमदारांची संख्या आहे. एखादं मत राज्यसभेसारखं बाद ठरवलं जाऊ शकतं त्यामुळे ती खबरदारी घेतली जात आहे. कोटा जास्त देण्याचा प्रयत्न करणार आहोत. सेनेचे दोन्ही उमेदवार व्यवस्थित निवडून येतील. शिवसेनेने अपक्ष आमदारांना मंत्री केले आहेत ते सेनेकडेच जातील. एक – दोन आकडे आमच्या उमेदवारांना घेतले तर तीन – चार आकडे कुणाला द्यायचे हे ठरायचे आहे. महाविकास आघाडीत एकजूट असून अपक्षांना आम्ही फोन केला होता त्याबाबत मुख्यमंत्र्यांना माहिती दिली होती. ज्यांना फोन केला होता त्यांनी मुख्यमंत्री सांगतील त्याप्रमाणे आम्ही मतदान करु असे सांगितले आहे असेही अजित पवार म्हणाले.

कमी पडणाऱ्या मतांचं नियोजन सुरू

केंद्रीय यंत्रणांकडून कॉल केले जात आहेत याबद्दल आमच्या आमदारांनी आम्हाला अद्याप सांगितले नाही असेही अजित पवार यांनी कॉंग्रेसच्या आमदारांना करण्यात आलेल्या कॉलवर बोलताना स्पष्टीकरण दिले. आमदार निवडून देत असताना आपापला कोटा आहे. परंतु आम्हाला संख्या कमी पडतेय त्याचे नियोजन सुरू आहे. बविआच्या नेत्यांना सर्वचजण जाऊन भेटले आहेत मात्र स्वतंत्र विचाराचे लोक आहेत त्यांना कोण भेटत असतील आणि मतदान करा सांगत असतील तर त्यात चुकीचे काही नाही. आता मतदानाला आमदारांची संख्या 284 राहिली तर 26 चा कोटा राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे सदसदविवेकबुद्धीचे स्मरण करून अधिकृत उमेदवाराला मत मिळेल व विरोधकांनीही सदसदविवेकबुद्धीचे स्मरण करत आम्हालाच मत द्यावे असेही अजित पवार म्हणाले.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.