अजित पवारांकडून पहिला उमेदवार जाहीर, म्हणाले “पुन्हा निवडून द्या, त्यांना मंत्री…”

यावेळी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’तील लाभार्थीही या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. याच मेळाव्यात अजित पवार यांनी दिलीप मोहिते पाटील यांचे विधानसभेतील कामाचे कौतुक केले.

अजित पवारांकडून पहिला उमेदवार जाहीर, म्हणाले पुन्हा निवडून द्या, त्यांना मंत्री...
Follow us
| Updated on: Sep 12, 2024 | 2:45 PM

Vidhansabha Election 2024 : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक अद्याप जाहीर झालेली नाही. पण सध्या सर्वच पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. यंदाच्या निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी थेट लढत होणार आहे. सध्या या दोन्ही घटक पक्षांच्या बैठका पार पडताना दिसत आहेत. महायुतीचे जागावाटप जाहीर झालेले नसताना एक एक उमेदवार जाहीर होण्यास सुरुवात झाली आहे. खेड आळंदी विधानसभा मतदारसंघातून कार्यसम्राट आमदार दिलीप मोहिते पाटील यांना पुन्हा निवडून द्या, त्यांना मंत्रिमंडळात काम करण्याची संधी देतो, अशी जाहीर घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. यामुळे अजित पवारांनी अप्रत्यक्षपणे दिलीप मोहिते पाटील यांना उमेदवारी जाहीर केल्याचे बोललं जात आहे.

नुकतंच खेड आळंदी विधानसभा मतदारसंघातील चाकण नगरीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मेळावा पार पडला. यावेळी अजित पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मेळावा चाकण नगरीत पार पडला. या मेळाव्यात तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’तील लाभार्थीही या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. याच मेळाव्यात अजित पवार यांनी दिलीप मोहिते पाटील यांचे विधानसभेतील कामाचे कौतुक केले.

“अपूर्ण राहिलेलं स्वप्न पूर्ण होईल”

“विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीत जागा वाटपाच्या चर्चा सुरु आहेत. अद्याप महायुतीचे जागावाटपाचा फॉर्म्युला ठरलेला नाही. त्यातच आता अजित पवारांकडून एका उमेदवाराची अप्रत्यक्षरित्या घोषणा केली आहे. तसेच विद्यमान कार्यक्रमाट आमदारांना पुन्हा संधी देण्यात यावी, अशी मागणी अजित पवारांनी केली आहे. तसेच खेड आळंदी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार दिलीप मोहिते पाटील यांना पुन्हा संधी द्यावी, अशी जनतेची इच्छा आहे”, असे अजित पवार म्हणाले.

“मी आज उमेदवार जाहीर करणार नाही, नाहीतर आमच्या महायुतीतील लोक म्हणायचे, हा बाबा तर जागाच जाहीर करायला लागलाय. अजून कुठली जागा जाहीर झालेली नाही. पण राष्ट्रवादीला महायुतीच्या वतीने जागा मिळाली, तर सगळ्यांचा कल कार्यसम्राट आमदार दिलीप मोहिते पाटलांना असावा. त्यांना अजून एक संधी द्यावी आणि तुमच्या मनातलं अपूर्ण राहिलेलं स्वप्न पूर्ण होईल. तसेच जी गाडी सरपंचापासून आमदारापर्यंत थांबली ती पुढे जरा दिव्यापर्यंत पोहोचली पाहिजे”, असे अजित पवारांनी म्हटले.

“एकवेळ संधी देऊन मंत्रीपद देऊ”

“जर महायुतीकडून खेडची जागा मिळाली तर दिलीप मोहिते यांना उमेदवार म्हणून एकवेळ संधी देऊन मंत्रीपद देऊ, असेही अजित पवार म्हणाले. मला दिलीप मोहिते पाटील यांचा सरपंच ते आमदारापर्यंतचा प्रवास माहिती आहे. त्यामुळे सगळ्यांची इच्छा आहे की ते आमदाराच्या पुढे जावं. तुम्ही उद्याच्याला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये चांगल्या मताधिक्यांनी त्यांना निवडून द्या. महायुतीचे उमेदवाराचे तिकीट वाटप ज्यावेळेस होईल आणि ही जागा राष्ट्रवादीला जर आली दिलीप मोहिते पाटील यांना मी निश्चित संधी देईन”, असे अजित पवारांनी सांगितले.

खरंच कौतुकाची बाब

“कार्यसम्राट असणं अन आक्रमक असणं यात फरक आहे. दिलीप मोहिते पाटील हे आक्रमक आहेत. त्यांचा आक्रमकपणा त्यांच्या पत्नी कसा नियंत्रणात आणत असतील, हे खरंच कौतुकाची बाब आहे. म्हणून मी सुरेखा ताईंना मानतो”, असेही गंमतीत अजित पवार म्हणाले.

MSRTC Viral Video : 'मी कसं चढू?', व्हायरल होणाऱ्या एसटीच वास्तव काय?
MSRTC Viral Video : 'मी कसं चढू?', व्हायरल होणाऱ्या एसटीच वास्तव काय?.
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख.
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले.
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?.
वाल्मिक कराडला मकोका अन् सुरेश धस म्हणाले...'त्यांना शिक्षा होणार'
वाल्मिक कराडला मकोका अन् सुरेश धस म्हणाले...'त्यांना शिक्षा होणार'.
वाल्मिक कराडवर मकोका अन् परळी बदं, समर्थक उतरले रस्त्यावर अन्...
वाल्मिक कराडवर मकोका अन् परळी बदं, समर्थक उतरले रस्त्यावर अन्....
Walmik Karad BIG Breaking : मोठी बातमी, वाल्मिक कराडवर अखेर मकोका
Walmik Karad BIG Breaking : मोठी बातमी, वाल्मिक कराडवर अखेर मकोका.
मविआ राहिली की संपली?; शरद पवारांचं उत्तर अन् शाहंबद्दलही गौप्यस्फोट
मविआ राहिली की संपली?; शरद पवारांचं उत्तर अन् शाहंबद्दलही गौप्यस्फोट.
'मी आता विधानसभा लढणार नाही', शिवसेनेच्या माजी मंत्र्यांची मोठी घोषणा
'मी आता विधानसभा लढणार नाही', शिवसेनेच्या माजी मंत्र्यांची मोठी घोषणा.
बीड हत्या प्रकरणाचा तपास करणारे 'हे' अधिकारी बदलले, नवे अधिकारी कोण?
बीड हत्या प्रकरणाचा तपास करणारे 'हे' अधिकारी बदलले, नवे अधिकारी कोण?.