Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आदित्य ठाकरेविरुद्ध रिंगणात उतरणार का? अमित ठाकरे स्पष्टच म्हणाले “मी तयार…”

राज ठाकरे यांनी उद्या सकाळी 9 वाजता एक महत्त्वाची बैठक बोलवली आहे. राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी ही बैठक होणार आहे. या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकांबद्दल चर्चा होणार आहे.

आदित्य ठाकरेविरुद्ध रिंगणात उतरणार का? अमित ठाकरे स्पष्टच म्हणाले मी तयार...
Follow us
| Updated on: Sep 22, 2024 | 9:24 PM

Amit Thackeray Vs Aaditya Thackeray : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीला अवघे काही महिने शिल्लक आहेत. त्यातच आता सर्वच पक्षांकडून मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सध्या अॅक्शन मोडवर आले आहेत. आता राज ठाकरे यांनी एक महत्त्वाची बैठक बोलवली आहे. या बैठकीत विधानसभा निवडणूक, जागावाटप आणि मतदारसंघांबद्दल चर्चा होण्याची शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राज ठाकरे यांनी उद्या सकाळी 9 वाजता एक महत्त्वाची बैठक बोलवली आहे. या बैठकीला पक्षातील महत्त्वाचे नेते, सरचिटणीस आणि पदाधिकारी उपस्थित असणार आहेत. राज ठाकरे यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडणार आहे. राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी ही बैठक होणार आहे. या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकांबद्दल चर्चा होणार आहे. तसेच याच बैठकीत राज ठाकरे यांचे सुपूत्र आणि मनसे नेते अमित ठाकरे यांच्या उमेदवारीसंदर्भातही चर्चा होण्याची शक्यता आहे.

गेल्या काही दिवसांपासून अमित ठाकरे हे वरळी विधानसभा मतदारसंघातून लढणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. आता यावर अमित ठाकरे यांनी स्वत: भाष्य केले आहे. “मी कुठून ही आणि कोणाबरोबर ही निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्यास तयार आहे. वरळी हा विषय आमच्या पक्षाच्या बैठकीतील विषय होता. तो कसा बाहेर आला, याची मला माहिती नाही. माझा पक्ष मला जिथून लढण्यास सांगेन आणि ज्याच्या विरोधात लढण्यास सांगेन, तेथून मी लढण्यास तयार आहे. तसेच पक्षाला जेथे माझी गरज असेल तेथून मी विधानसभा लढवण्यास तयार आहे”, अशी प्रतिक्रिया मनसे नेते अमित ठाकरे यांनी केली. त्यामुळे आता वरळी विधानसभा मतदारसंघातून अमित ठाकरे विरुद्ध आदित्य ठाकरे अशी लढत होणार का? याकडे लोकांचे लक्ष लागले आहे.

राज ठाकरेंकडून उमेदवार जाहीर

राज ठाकरे यांनी आतापर्यंत मनसेचे अनेक उमेदवार जाहीर केले आहेत. राज ठाकरेंनी विदर्भ, मराठवाडा आणि सोलापूरचा दौरा केला होता. या दौऱ्यावेळी त्यांनी सात उमेदवार जाहीर केले आहेत. शिवाय, त्यांनी स्वबळावर लढणार असल्याचीही घोषणा केली आहे.

मनसेच्या उमेदवारांची यादी

1. शिवडी, मुंबई – बाळा नांदगावकर 2. पंढरपूर – दिलीप धोत्रे 3. लातूर ग्रामीण – संतोष नागरगोजे 4. हिंगोली विधानसभा – बंडू कुटे 5. चंद्रपूर – मनदीप रोडे 6. राजुरा – सचिन भोयर 7. वणी – राजू उंबरकर

मिटकरींचा राणेंना टोला, शिवरायांच्या मुस्लिम सरदारांची यादी केली ट्विट
मिटकरींचा राणेंना टोला, शिवरायांच्या मुस्लिम सरदारांची यादी केली ट्विट.
बीड पोलिसांच्या वर्दीवर आता आडनाव दिसणार नाही! कारण...
बीड पोलिसांच्या वर्दीवर आता आडनाव दिसणार नाही! कारण....
पुरस्कार विजेत्या शेतकऱ्यानं मृत्यूला कवटाळल, 3 पानांची सुसाईड नोट अन्
पुरस्कार विजेत्या शेतकऱ्यानं मृत्यूला कवटाळल, 3 पानांची सुसाईड नोट अन्.
बारावीच्या 175 उत्तरपत्रिका शिक्षिकेच्याच घरी जळाल्या, व्हिडीओ व्हायरल
बारावीच्या 175 उत्तरपत्रिका शिक्षिकेच्याच घरी जळाल्या, व्हिडीओ व्हायरल.
'..गरज काय? औरंगजेबाची कबर नष्ट करा', शिवसेनेच्या खासदाराची मोठी मागणी
'..गरज काय? औरंगजेबाची कबर नष्ट करा', शिवसेनेच्या खासदाराची मोठी मागणी.
VIDEO : धक्कादायक! गावातील विहिरीत डोकं नसलेला मृतदेह पाहिला अन्...
VIDEO : धक्कादायक! गावातील विहिरीत डोकं नसलेला मृतदेह पाहिला अन्....
'जनतेच्या मनातील...', धंगेकरांच्या समर्थकांनी भाजपच्या रासनेंना डिवचलं
'जनतेच्या मनातील...', धंगेकरांच्या समर्थकांनी भाजपच्या रासनेंना डिवचलं.
'लाडकी बहीण'मुळे कडकी, रामदास कदमांची कबुली, 'योजना बंद केली तर...'
'लाडकी बहीण'मुळे कडकी, रामदास कदमांची कबुली, 'योजना बंद केली तर...'.
'लाडक्या बहिणीं'ना 2100 रूपये मिळणार की नाही? आदिती तटकरेंनी सांगितलं
'लाडक्या बहिणीं'ना 2100 रूपये मिळणार की नाही? आदिती तटकरेंनी सांगितलं.
'खोक्या' पूर्ण फसला, प्रयागराजमधून 'पॅक', थेट विमानानं मुंबईत आणणार
'खोक्या' पूर्ण फसला, प्रयागराजमधून 'पॅक', थेट विमानानं मुंबईत आणणार.