महाराष्ट्रातील असं एक गाव तेथील लोक सापाला मानतात कुटुंबातील सदस्य, गावात सर्वत्र सापच साप, मुलं शाळेत देखील जातात घेऊन

हत्ती, घोडा, ससा, कुत्रं, माजंर असे अनेक प्राणी आपण घरात पाळतो. मात्र साप हे नाव ऐकताच भल्या-भल्यांची भीतीनं गाळण उडते. मात्र महाराष्ट्रात असंही एक गाव आहे, जिथे आजही घरात साप पाळले जातात.

महाराष्ट्रातील असं एक गाव तेथील लोक सापाला मानतात कुटुंबातील सदस्य, गावात सर्वत्र सापच साप, मुलं शाळेत देखील जातात घेऊन
Follow us
| Updated on: Nov 28, 2024 | 9:14 PM

हत्ती, घोडा, ससा, कुत्रं, माजंर असे अनेक प्राणी आपण घरात पाळतो. मात्र साप हे नाव ऐकताच भल्या-भल्यांची भीतीनं गाळण उडते.जर साप तुमच्या घराच्या परिसरात जरी दिसला तरी तुम्हाला भीती वाटते. तुम्ही एकतर सर्प मित्रांना बोलावतात, किंवा त्याला मारतात. पण तुम्हाला तुमच्या परिसरात देखील साप नको असतो. मात्र तुम्हाला माहिती आहे का? की भारतात असं देखील एक गाव आहे, ज्या गावात सापच साप दिसून येतात.या गावात राहणाऱ्या नागरिकांच्या स्वयंपाक घरापासून ते बेडरूमपर्यंत आणि हॉलमध्ये अशा सर्व ठिकाणी सापांचा वावर असतो. ते देखील भारतातील ज्या चार प्रमुख विषारी जाती आहे. त्यापैकी एक असलेल्या नाग या प्रजातीचे साप या ठिकाणी मोठ्या संख्येनं आढळतात. नवं घर बांधत असतानाच येथील नागरिक सापासाठी देखील एक खास बीळ तयार करून घेतात. येथील लोक सापांबरोबर एखाद्या कुटुंबातील सदस्या सारखे राहातात. तुम्हाला माहिती आहे का या गावाचं नाव? जाणून घेऊयात या गावाबद्दल

भारत विविधतेने नटलेला देश आहे. भारतात विपूल प्रमाणात नैसर्गिक साधन संपदेसोबतच प्राणी संपदा देखील आढळते. भारतामध्ये सापाच्या असंख्य जाती आहेत. हिंदू धर्मात नागाला देव मानलं जातं.नागपंचमीला नागाची पूजा केली जाते. महाराष्ट्रात असं एक गाव आहे, जिथे नाग पाळले जातात, घराचं बांधकाम करताना तिथे सापासाठी बीळ देखील तयार करून घेतलं जातं. आपल्या आजूबाजूला असलेला सापाचा वावर येथील लोकांना सामान्य वाटतो. स्वंयपाक घरापासून ते बेडरूमपर्यंत या गावात सर्वत्र साप आढळून येतात.या गावाचं नाव आहे शेतफल, हे गाव महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात येते. या गावाचं अंतर पुण्यापासून 200 कीलोमीटर इतकं आहे.

सर्वजण नागपंचमीला सापांची पूजा करतात. मात्र शेतफळमधील ग्रामस्थ वर्षभर नागांची पूजा करत असतात. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या गातील लोक सापाला आपल्या कुटुंबातील एखाद्या सदस्याप्रमाणे मानतात. या गावात सापं फक्त बिळातच राहत नाहीत तर घरात सर्वत्र या सापांचा वावर असतो. सापासाठी प्रत्येक घरात एक विशिष्ट जागा असते तिला देवस्थानम नावानं ओळखलं जातं, येथील लोक सापांना देव मानतात. तुम्ही जर कधी या गावात गेलात तर प्रत्येक गल्लीमध्ये लहान मुलं सापांशी खेळताना तुम्हाला दिसतील. घरातच नाही तर मुलं शाळेत देखील सापाला घेऊन जातात. त्यांच्यासोबतच अभ्यास करतात.

'जिसका EVM उसकी...', संजय राऊत यांचं सूचक ट्वीट, नेमकं काय म्हटलं?
'जिसका EVM उसकी...', संजय राऊत यांचं सूचक ट्वीट, नेमकं काय म्हटलं?.
'दादा मुख्यमंत्री झाले तर मी स्वतः त्यांचं अभिनंदन करेन' - रोहित पवार
'दादा मुख्यमंत्री झाले तर मी स्वतः त्यांचं अभिनंदन करेन' - रोहित पवार.
एक दिवस असा येईल की ठाकरे रात्री २..., शिवसेनेच्या नेत्याची भविष्यवाणी
एक दिवस असा येईल की ठाकरे रात्री २..., शिवसेनेच्या नेत्याची भविष्यवाणी.
दादा मुख्यमंत्री झाले तर चांगलं..भुजबळांचा CM म्हणून फडणवीसांना विरोध?
दादा मुख्यमंत्री झाले तर चांगलं..भुजबळांचा CM म्हणून फडणवीसांना विरोध?.
'...म्हणून फडणवीसांना टार्गेट केलं जातंय', भुजबळांचा जरांगेंवर निशाणा
'...म्हणून फडणवीसांना टार्गेट केलं जातंय', भुजबळांचा जरांगेंवर निशाणा.
'... तर राजकीय संन्यास घेईल', शहाजी बापू पाटील नेमकं काय म्हणाले?
'... तर राजकीय संन्यास घेईल', शहाजी बापू पाटील नेमकं काय म्हणाले?.
कडूंनी काढली राणा दाम्पत्यांची औकात; म्हणाले, मला पाडण्याची त्यांची...
कडूंनी काढली राणा दाम्पत्यांची औकात; म्हणाले, मला पाडण्याची त्यांची....
'..यापुढे त्यांनी बाळासाहेबांचं नाव घेऊ नये', राऊतांचा शिंदेंवर घणाघात
'..यापुढे त्यांनी बाळासाहेबांचं नाव घेऊ नये', राऊतांचा शिंदेंवर घणाघात.
मुंबईकरांनो काळजी घ्या, हवेची गुणवत्ता खालावली, बघा कितीवर पोहोचला AQI
मुंबईकरांनो काळजी घ्या, हवेची गुणवत्ता खालावली, बघा कितीवर पोहोचला AQI.
हे अत्यंत दुर्देवी.., दादांच्या मुलानं राष्ट्रवादीच्या आमदाराला सुनावल
हे अत्यंत दुर्देवी.., दादांच्या मुलानं राष्ट्रवादीच्या आमदाराला सुनावल.