नागपूर-तुळजापूर मार्गावर गावकऱ्यांचा रास्ता रोको, जाळपोळ; सुनील डिवरे यांच्या आरोपींना अटक करण्याची मागणी
सुनील डिवरे यांच्या हत्तेनंतर लोकं संतप्त झालेत. नागपूर-तुळजापूर मार्गावर गावकऱ्यांनी रास्ता रोको करून आंदोलन सुरू केलंय. टायरची जाळपोळ करण्यात आली.
यवतमाळ : यवतमाळ बाजार समिती संचालक शिवसेनेचे सुनील डिवरे (Sunil Deore of Shiv Sena) यांच्या हत्येनंतर भांब राजा गाव आणि परिसरातील लोक संतप्त झालेत. नागपूर-तुळजापूर मार्गावर (Nagpur-Tuljapur route) गावकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन सुरू केलंय. टायरची जाळपोळ करण्यात आली. सर्व आरोपीना तात्काळ अटक करण्याच्या मागणी हे आंदोलन करण्यात आलंय. काल रात्री शिवसेनेचे बाजार समिती संचालक सुनील डिवरे यांची 4 ते 5 जणांनी गोळ्या झाडून हत्या केली. यात पोलिसांनी 4 जणांना अटक केली आहे. माजी मंत्री आमदार संजय राठोड (MLA Sanjay Rathore) शवविच्छेदन गृहाजवळ दाखल झाले. त्यांनी सुनील डिवरे यांच्या कुटुंबियांशी बातचित केली. मुख्य आरोपीला अटक करा, अशी मागणी करण्यात आली. ज्याच्याकडे कट रचला त्याला अटक करा, या मागणीसाठी गावकरी संपत्प झालेत.
भांब राजा गावातील घराजवळ गोळीबार
जोपर्यंत सर्व आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत माघार घेणार नाही, अशी भूमिका काल सायंकाळी 7.30 च्या सुमारास घेण्यात आली होती. सुनील डिवरे हे त्यांच्या घरी असताना त्यांच्यावर घरासमोर अचानकपणे अज्ञात व्यक्तीने गोळीबार केला. यात सुनील डिवरे यांच्या छातीत आणि पोटांत दोन गोळ्या लागल्याची माहिती आहे. सुनील डिवरे यांच्या डोक्यावर आणि हातावर सुध्दा धारदार शस्त्राने सुध्दा वार करण्यात आले. यात त्यांचा मृत्यू झाला. भांब राजा गावातील घरासमोर गोळीबार झाल्याने गावात तणावाचे वातावरण आहे.
कोण होते सुनील डिवरे?
सुनील डिवरे सध्या यवतमाळ कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये संचालक होते. शिवाय ते मागील वेळी भांब राजा ग्रामपंचायतमध्ये सरपंच होते. यंदा त्यांची पत्नी अनुप्रिया डिवरे या सरपंच आहेत. यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये नातलग आणि परिचित व्यक्तीनी मोठी गर्दी होती. या घटनेमुळं परिसरात तणावाचे वातावरण आहे.