Vinayak Raut | ‘जनाबची भूमिका Devendra Fadnavis यांनी किती वेळा बजावली? मदरश्यात गेले, त्यांची टोपी घातली हे सर्वांनी पाहिलं’
भाजपाचे (BJP) हिंदुत्व (Hindutva) बेगडी आहे. जनाबची भूमिका यापूर्वी फडणवीस यांनी किती वेळा बजावली, मदरश्यात गेले, त्यांची टोपी घातली हे सर्वांनी बघितले आहे, अशी टीका शिवसेना खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी केली आहे.
भाजपाचे (BJP) हिंदुत्व (Hindutva) बेगडी आहे. मुसलमानांशिवाय हिंदुत्व पुरे होऊ शकत नाही, असे वक्तव्य मोहन भागवत यांनी केले आहे. जनाबची भूमिका यापूर्वी फडणवीस यांनी किती वेळा बजावली, मदरश्यात गेले, त्यांची टोपी घातली हे सर्वांनी बघितले आहे, अशी टीका शिवसेना खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी केली आहे. आज शिवसंपर्क अभियान मुख्यमंत्री यांनी संबोधित केले. त्या बैठकीत राऊत सहभागी झाले होते. ते म्हणाले, की राज्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी जे निर्णय घेतले ते पोहचवण्याचे काम आम्ही करत आहोत. एमआयएम भाजपाचेच पिल्लू आहे. आघाडी अस्थिर करण्यासाठी हा डाव आहे, मात्र भाजपाच्या कट कारस्थानाला यश येणार नाही. आम्ही हिंदुत्व भाजपाकडून विकत घेतलेले नाही, असे राऊत म्हणाले. तसेच औरंगजेबाच्या कबरीवर नतमस्तक झालेल्या अशा घाणेरड्या एमआयएमला कधीही आम्ही स्वीकारणार नाही, असेही ते म्हणाले.