महाराष्ट्रात नेमकं चाललंय काय? कुठे हत्या, तर कुठे बापाकडूनच मुलींवर अत्याचार, तर कुठे प्राणघातक हल्ला…
विरार आणि नालासोपाऱ्यात घडलेल्या अनेक धक्कादायक घटनांनी परिसर हादरला आहे. विरारमध्ये प्राणघातक हल्ला, तिहेरी हत्याकांड आणि बापाचा मुलींवर झालेला लैंगिक अत्याचार या घटनांमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावर एका 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार झाला. दत्तात्रय गाडे असे या आरोपीचे नाव आहे. बस स्थानकावर घडलेल्या या प्रकरणानंतर आरोपी अजूनही पोलिसांना सापडला नाही. सकाळी 5.30 वाजता ही घटना घडली. या घटनेनंतर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यानंतर आता मुंबईजवळ असलेल्या वसई, विरार आणि नालासोपाऱ्यात अनेक धक्कादायक घटना समोर आल्या आहेत.
प्रियकराकडून प्रेयसीवर धारदार हत्याराने वार
विरारमध्ये प्रेम प्रकरणातून प्रियकराने प्रेयसीवर धारदार हत्याराने वार केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. या प्राणघातक हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर खाजगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. ही तरुणी मेडिकल स्टोअरमध्ये फार्मासिस्ट म्हणून काम करत होती. काल 26 फेब्रुवारी रोजी दुपारी 3.30 च्या सुमारास ही घटना घडली आहे. या हल्ल्यात मुलीच्या हातावर आणि मनगटावर चाकूने वार करण्यात आले. तसेच रागाच्या भरात मारलेल्या लाथेमुळे त्या तरुणीचा जबडा फॅक्चर झाला आहे.
भाविका भालचंद्र गावड असे असे प्राणघातक हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणीचे नाव आहे. तर अक्षय जनार्धन पाटील असे हल्ला करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. ही तरुणी विरारच्या रामभजन मेडिकल स्टोअर्समध्ये फार्मासिस्ट म्हणून गेल्या 4 महिन्यापासून काम करीत होती. तिचे विरार पूर्वेच्या गास कोपरी गावात राहणारा तरुण अक्षय जनार्दन पाटील याचे गावात राहणाऱ्या २३ वर्षीय भाविका भालचंद्र गावडसोबत 11 वर्षापासून प्रेमसंबध होते. अक्षय आणि भाविकाचे या डिसेंबरमध्ये लग्न ही ठरलं होतं. माञ भाविका दुस-या मुलाशी व्हॉटसअपवर बोलत असते, या रागातून आणि संशयातून अक्षयने हे कृत्य केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
विरारमध्ये तिहेरी हत्याकांड
तसेच विरारमध्ये तिहेरी हत्याकांड झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विरार पश्चिम या ठिकाणी राहणाऱ्या एका इसमाने आपल्या पत्नीसह ५ वर्षीय चिमुकलीचा गळा आवळून खून करून स्वतः आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आर्थिक विवंचनेतून त्याने हे कृत्य केलं असावं, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. उदयकुमार काजवा ५२, वीणा उदयकुमार काजवा ४२, शिवालिका उदयकुमार ५ अशी त्यांची नावे आहेत.
विरारच्या ग्लोबल सिटी येथे ते भाड्याने राहत होते. वीणाचा पहिल्या पतीचा मुलगा वेदांत हा शाळेत गेला होता. मुलगा काल शाळेतून आल्यावर त्याने आई वडिलांना खूप कॉल केले. पण त्यांनी एकही फोन कॉल उचलला नाही. त्यामुळे त्या मुलाला वाटले की आई वडील मला एकट्याला सोडून निघून गेले. मात्र सोसायटीमध्ये मुलाने सुरक्षा रक्षकांना सांगितल्यानंतर सुरक्षारक्षकाने दरवाजा ठोठावला. मात्र आतून कोणताही प्रतिसाद आला नाही. मग त्यांनी खात्री करण्यासाठी चावी बनवणाऱ्या चावी वाल्याला बोलावून दरवाजा उघडला. पण आतून साखळी लावली होती. ही साखळी उघडल्यावर आतमध्ये उदयकुमार याने गळफास घेतल्याचे दिसले. त्यासोबतच खाली दोघांचे मृतदेह असल्याचे दिसले. त्यामुळे घाबरलेल्या सुरक्षारक्षकांनी तात्काळ पोलिसांना फोन करून माहिती दिली. पोलिसांनी आल्यानंतर सदर घटनास्थळाचा पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहेत. आर्थिक विवंचनेतून ही आत्महत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
नालासोपाऱ्यात बापाकडून 3 सख्ख्या मुलींवर लैंगिक अत्याचार
तर दुसरीकडे नालासोपाऱ्यात बाप-मुलीच्या पवित्र नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. जगातील सर्वात श्रेष्ठ असे बाप आणि मुलीचे पवित्र नाते आहे. मुलीवर कितीही मोठे संकट आले तर तिने बापाच्या खांद्यावर मान टाकली की तिचे सर्व दुःख नाहीसे होतात. पण याच पवित्र नात्याला नालासोपाऱ्यात काळिमा फासली आहे. सख्या बापाने ३ सख्ख्या मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. या मुलींनी नालासोपारा पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे.
आरोपी वासनांध विकृत बाप हा कुख्यात गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आहे. त्याच्यावर खंडणी, गोळीबार, हत्या, सुपारी घेऊन हत्या, दरोडा, चोरी असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. 2017 पासून हा विकृत वासनांध बापाने आपल्याच मुली, पत्नी यांना दहशतीखाली ठेवून पोटाच्या तीन मुलीवर अत्याचार केले आहेत. या विकृताला 5 मुली, पत्नी आणि एक मुलगा आहे. आईला ही घटना माहीत झाल्यानंतर तिला ही गंभीरपणे मारहाण केली आहे.
शेवटी अशा विकृत व्यक्तींच्या तावडीतून सुटण्यासाठी आईने आपल्या मुलींना घेऊन विरार नालासोपारा गाठले. सर्व घटना नातेवाईकाला सांगितल्यावर काल नालासोपारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक केले आहे. या अत्याचाराला तसेच हत्येसारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी आहे. बुधवारी नालासोपारा पोलिसांनी मुलींचे जबाब नोंदवून गुन्हा दाखल केला. तसेच आरोपी पित्याला अटक केली.
लग्नाचा तगादा लावल्याने हत्या
उत्तरप्रदेशातील बेपत्ता मुलीच्या हत्येचा दोन महिन्यानंतर शोध लावण्यात विरार क्राईम ब्रॅंच युनिट तीनच्या पथकाला यश आले आहे. प्रिया शंभुनाथ सिंग (वय 25) असे हत्या तरुणीचे नाव आहे. तर अमित सिंग (वय 28 ) असे आरोपीचे नाव आहे. प्रिया ही उत्तरप्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यातील राहणारी आहे. तर आरोपी हा वसईतील राहणारा आहे. या दोघांचे मागच्या अनेक दिवसांपासून प्रेमसंबंध जुळलेले होते. हे दोघेही लग्न करणार होते, मात्र मुलाच्या घरच्यांचा विरोध असल्याने आरोपी हा लग्नाला टाळाटाळ करीत होता.
मुलगी लग्नाचा तगादा लावत असल्याने प्रियकर तरुणाने तिला 25 डिसेंबरला वसईत बोलावून, फिरायला नेण्याच्या बहाणा केला. तो तिला वसईच्या पोमन महाजन पाडा या ठिकाणी घेऊन गेला आणि तिची निर्घृणपणे हत्या केली. यानंतर दृश्यम सिनेमातील सिने स्टाईलने ती दिल्लीला गेली असे भासवण्यासाठी तिचा मोबाईल राजधानी एक्स्प्रेसमध्ये ठेवून आरोपी फरार झाला होता.
उत्तरप्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यातील एम्स पोलीस ठाण्यात या मुलीची मिसिंग दाखल होती. याचा तपास करण्यासाठी यूपी पोलीस मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयच्या गुन्हे शाखेत आले होते. त्यांनी या सर्व प्रकरणाचे गांभीर्य ओळखून अवघ्या 24 तासात विरार क्राईम बरंच युनिट तीनच्या पथकाने आरोपीचा शोध घेऊन गुन्ह्याचा उलगडा केला.