मी माघार घ्यायला तयार, पण माझी अट… विशाल पाटील यांचं मोठं विधान; काँग्रेस काय निर्णय घेणार?

सांगलीत पुन्हा मोठा ट्विस्ट आला आहे. काँग्रेस नेते विशाल पाटील यांनी सांगलीत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. विशाल पाटील यांनी पक्षाच्या विरोधातच बंडखोरी केल्याने काँग्रेस काय कारवाई करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तसेच विशाल पाटील अपक्ष लढणार असून त्यांना वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा मिळणार का? याचीही सर्वांना उत्सुकता लागली आहे.

मी माघार घ्यायला तयार, पण माझी अट... विशाल पाटील यांचं मोठं विधान; काँग्रेस काय निर्णय घेणार?
vishal patil Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 16, 2024 | 8:25 PM

काँग्रेस नेते विशाल पाटील यांनी अखेर पक्षाविरुद्ध बंड केलं आहे. विशाल पाटील यांनी सांगली लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला आहे. महाविकास आघाडीत सांगलीची जागा ठाकरे गटाला सोडण्यात आली होती. त्यामुळे विशाल पाटील प्रचंड संतप्त झाले होते. त्यामुळेच त्यांनी सांगलीतून उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवाराची चांगलीच कोंडी होण्याची शक्यता आहे. मात्र, अर्ज भरल्यानंतर विशाल पाटील यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. मी अर्ज मागे घ्यायला तयार आहे, पण माझी अट आहे, असं विशाल पाटील यांनी म्हटलं आहे.

सांगली लोकसभा निवडणुकीतून मी माघार घ्यायला तयार आहे. पण काँग्रेसने या मतदारसंघात काँग्रेसचाच उमेदवार द्यावा, अशी अट विशाल पाटील यांनी महाविकास आघाडीसमोर ठेवली आहे. काही जणांना काँग्रेस आणि घराणी संपावावी, असे वाटत आहे, यामागे कोण आहे? का आहेत? याचा समाचार निवडणुकीनंतर घेतला जाईल, असा इशाराच विशाल पाटील यांनी दिला आहे. विशाल पाटील यांनी आता थेट काँग्रेसच्या कोर्टात चेंडू टाकल्याने काँग्रेस अर्ज मागे घेण्याच्या तारखेपर्यंत काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

मशालवर लढण्याची ऑफर होती

यावेळी त्यांनी ठाकरे गटाने दिलेल्या ऑफरचा गौप्यस्फोट केला. जिल्ह्यातील ठाकरे गटाच्या नेत्यांनी आपल्याशी संपर्क साधला होता. आपल्याला मशाल चिन्हावर लढण्याची ऑफर दिली होती, असा गौप्यस्फोट विशाल पाटील यांनी केला. मला पक्षानेही मशाल चिन्हावर लढायला सांगितलं असतं तरी मी पक्षाच्या विचारधारेशी ठाम आहे, असं त्यांना सांगितलं असतं, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

विधारधारेशी तडजोड नाही

माझ्या उमेदवारीला विरोध म्हणून काँग्रेसची उमेदवारी घालवायची, अशी भूमिका असेल तर मी थांबायला तयार आहे, अशी भूमिका आपण स्पष्ट केली होती. राजकारणात लहानपणापासूनच यायची आपली इच्छा होती. पण पदासाठी मी माझ्या विचारधारेशी कोणत्याही प्रकारचा समझोता करणार नाही, ही देखील आपली भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं.

आपल्यालाच उमेदवारी मिळेल

विश्वजीत कदम यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण काम करत आहोत, हे कोणाला बघवलं नाही, असंही ते म्हणाले. त्याचबरोबर काँग्रेस पक्षाकडून आपल्यालाच उमेदवारी मिळेल, असा विश्वास आज देखील आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.