सत्यजित तांबे यांच्याबाबत कॉंग्रेसच्या युवा नेत्यांचा मोठा गौप्यस्फोट, सत्यजित तांबे यांना कोरा एबी फॉर्म दिला होता?

कोणी उमेदवारी घ्यायची याचा निर्णय तांबे कुटुंबियांनी घ्यायचा होता, कोरा एबी फॉर्म तांबे यांना दिला होता, मग तांबे यांना डावल असं कसं म्हणता असा सवालही केला आहे.

सत्यजित तांबे यांच्याबाबत कॉंग्रेसच्या युवा नेत्यांचा मोठा गौप्यस्फोट, सत्यजित तांबे यांना कोरा एबी फॉर्म दिला होता?
Image Credit source: Google
Follow us
| Updated on: Jan 19, 2023 | 4:05 PM

भूषण पाटील, टीव्ही 9 मराठी, कोल्हापूर : सुरुवातीपासूनच सत्यजित तांबे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून कॉंग्रेसचा एबी फॉर्म माझ्या नावाचा मिळाला नाही अशी भूमिका मांडली आहे. यामध्ये विशेष बाब म्हणजे कॉंग्रेसने सुधीर तांबे यांना एक एबी फॉर्म आणि दूसरा कोरा एबी फॉर्म हा सत्यजित तांबे यांना दिला होता अशी चर्चा असतांनाही सत्यजित तांबे यांनी माझ्या नावाचा एबी फॉर्म आला नाही अशी प्रतिक्रिया माध्यमांना दिली होती. त्यातच आता कॉंग्रेसने सुधीर तांबे यांच्यानंतर सत्यजित तांबे यांचेही निलंबन केले आहे. त्यामुळे तांबे कुटुंबाची अडचण वाढत असतांना आणि कॉंग्रेस पक्षासाठी सोबत फसवणुकीचा आरोप केला जात असतांना कॉंग्रेसचे युवा नेते विश्वजित कदम यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. कोल्हापूर येथे त्यांनी हा गौप्यस्फोट केला असून सत्यजित तांबे यांना कोरा एबी फॉर्म दिल्याचा दावा केला आहे. त्यामुळे सत्यजित तांबे यांची चांगलीच अडचण होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

कॉंग्रेसचे माजी मंत्री तथा आमदार विश्वजीत कदम यांनी सत्यजित तांबे यांच्याबाबत मोठा खुलासा केला आहे, याशिवाय सत्यजित तांबे ना पक्षाने डावलले नाही असंही स्पष्टीकरण दिले आहे.

कोणी उमेदवारी घ्यायची याचा निर्णय तांबे कुटुंबियांनी घ्यायचा होता, कोरा एबी फॉर्म तांबे यांना दिला होता, मग तांबे यांना डावल असं कसं म्हणता असा सवालही कदम यांनी केला आहे.

हे सुद्धा वाचा

वरिष्ठांनी तांबेंच्या बाबतीचा निर्णय घेतला आहे, महाराष्ट्राची राजकीय संस्कृती आम्ही पाहतोय, विरोधी नेता आला तर नमस्कार करायचा नाही का ? आम्ही असे संस्कार पाहिले आहेत असं म्हणत कदम यांनी भाजपाला टोला लगावला आहे.

सत्यजित तांबे यांना कपिल पाटील यांच्या संघटनेने पाठिंबा दिला आहे. पण सत्यजित तांबे यांना भाजपचा छुपा पाठिंबा असल्याची चर्चा सुरुवातीपासूनच कायम आहे.

सत्यजित तांबे यांच्या विरोधात भाजपने उमेदवार न देता सत्यजित तांबे यांना पाठिंबा दर्शविला आहे अशी चर्चा सुरू असतांना तांबे यांनीही यावर प्रतिक्रिया देणं टाळलं आहे.

एकूणच विश्वजित कदम यांनी केलेला दावा पाहता सत्यजित तांबे यांची अडचण अधिक होणार असल्याचे बोललं जात असून तांबे यावर काय बोलतात हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.
शरद पवारांकडून RSS चं कौतुक; 'हातचा मळ असा समज अन् गाफिल राहिलो, पण..'
शरद पवारांकडून RSS चं कौतुक; 'हातचा मळ असा समज अन् गाफिल राहिलो, पण..'.
पवार बाप-लेकीला सोडून दादांचा नवा प्लॅन? सुनील तटकरेंचं प्रपोजल काय?
पवार बाप-लेकीला सोडून दादांचा नवा प्लॅन? सुनील तटकरेंचं प्रपोजल काय?.
चोराकडे न्याय मागत होती,पंकजाही धुतल्या तांदळासारखी नाही,मामीकडून आरोप
चोराकडे न्याय मागत होती,पंकजाही धुतल्या तांदळासारखी नाही,मामीकडून आरोप.
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त.
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट.
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.