गोड शहरातून निघताना अंतःकरण जड, नाशिक पोलीस आयुक्तपद सोडताना विश्वास नांगरे पाटील भावूक

नाशिक पोलीस आयुक्त म्हणून पदभार सोडताना विश्वास नांगरे पाटील यांनी नाशिकच्या जनतेसाठी ऑडिओ मेसेजच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या.

गोड शहरातून निघताना अंतःकरण जड, नाशिक पोलीस आयुक्तपद सोडताना विश्वास नांगरे पाटील भावूक
Follow us
| Updated on: Sep 04, 2020 | 11:22 AM

नाशिक : नाशिकचे मावळते पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील पदमुक्त होऊन मुंबईकडे रवाना झाले. पदभार सोडताना नाशिकच्या जनतेसाठी ऑडिओ मेसेजच्या माध्यमातून त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. गेली दीड वर्ष नाशिकची सेवा करण्याची संधी मिळाली, याबद्दल जनतेचे आभार व्यक्त करताना नांगरे पाटील काहीसे भावूक झाले. (Vishwas Nangare Patil gives charge of Nashik Police Commissioner to Deepak Pandey)

काय आहे ऑडिओ मेसेज?

“नाशिककर नमस्कार, गेली दीड वर्ष आपली सेवा करण्याची संधी मला मिळाली. आज मी पोलीस आयुक्तपदाचा चार्ज दीपक पांडे यांच्याकडे देऊन मुंबईला सहआयुक्त म्हणून पदभार स्वीकारण्यासाठी रवाना होत आहे. गेली दीड वर्ष या प्रगत, सुधारणावादी शहराची सेवा करण्याची संधी मिळाली. या शहराला पौराणिक, ऐतिहासिक असा ठेवा आहे. शिक्षण, शेती, उद्योग, पर्यटन अशा सगळ्या क्षेत्रात नाशिकची घोडदौड मोठ्या वेगाने सुरु आहे. इथे काम करताना इथली माती, इथली माणसं, इथलं पाणी, इथला निसर्ग यांच्या प्रेमात माणूस पडतो. या आल्हाददायक, गोड शहराला सोडून जाताना निश्चित अंतःकरण जड आहे. पण हा ऋणानुबंध कायम राहील. आपल्या संपर्कात राहीन, आपले आशीर्वाद, प्रेम माझ्या पाठीशी राहील, अशी अपेक्षा करतो. कोव्हिड संक्रमण काळ असो, निवडणुका किंवा सण-उत्सव, नाशिककर माझ्या पाठीशी कायम उभे राहिले. नाशिकची जनताच प्रगल्भ आहे, कायद्याचे पालन करणारी आहे. नाशिकरांच्या प्रगतीसाठी, सुरक्षिततेसाठी, आरोग्यासाठी सदैव सुयश चिंतितो. जय हिंद!” -विश्वास नांगरे पाटील

ठाकरे सरकारकडून पोलिस दलात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. राज्यातील 40 हून अधिक वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश जारी करण्यात आले आहेत. नाशिक पोलिस आयुक्तपदाचा कार्यभार सांभाळणाऱ्या विश्वास नांगरे पाटील यांची मुंबईत कायदा आणि सुव्यवस्था विभागाच्या सहआयुक्तपदी नियुक्ती झाली आहे. नांगरे पाटील यांच्या जागी दीपक पांडे यांची वर्णी लागली आहे.

दरम्यान, नाशिकचे नवनियुक्त पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी नांगरे पाटलांकडून पदभार स्वीकारला. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या निधनानंतर राष्ट्रीय दुखवटा जाहीर असल्याने पदभार स्वीकारण्याचा कार्यक्रम रद्द करण्यात आला.

संबंधित बातम्या :

पोलिस दलात मोठे फेरबदल, विश्वास नांगरे पाटील यांची मुंबईत बदली

बदल्या तर होणारच, ‘सामना’च्या अग्रलेखातून विरोधकांच्या टीकेचा समाचार

(Vishwas Nangare Patil gives charge of Nashik Police Commissioner to Deepak Pandey)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.