Video : ‘मी लस घेतली, तुम्हीही घ्या’, व्हिडीओ जारी करत विश्वास नांगरे पाटील यांचं आवाहन

मुंबईचे सहपोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी कोरोनावरची लस घेतली आहे. | IPS Vishwas nangare patil

Video : 'मी लस घेतली, तुम्हीही घ्या', व्हिडीओ जारी करत विश्वास नांगरे पाटील यांचं आवाहन
विश्वास नांगरे पाटील यांनी कोरोनावरची लस घेतली...
Follow us
| Updated on: Feb 21, 2021 | 7:26 AM

मुंबई :  मुंबईचे सहपोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी कोरोनावरची लस घेतली आहे. मुंबईतील के. ई. एम हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांनी लस घेतली. एका व्हिडीओद्वारे त्यांनी ही माहिती दिली आहे. तसंच सर्वसामान्यांना विशेष आवाहनही केलं आहे. (Vishwas Nangare Patil vaccinated Corona Appeal To Public)

के. ई. एम हॉस्पिटलमध्ये जाऊन घेतली लस

मुंबईतील के. ई. एम हॉस्पिटलमध्ये जाऊन नांगरे पाटील यांनी कोरोनावरील लस घेतली. लस घेतल्यानंतर त्यांनी रुग्णालय प्रशासनाचे आभार देखील मानले. कोरोना काळात आरोग्य अधिकाऱ्यांनी केलेल्या कामाचं त्यांनी कौतुक केलं.

विश्वास नांगरे पाटील यांचं आवाहन काय…?

“जय हिंद… मी विश्वास नांगरे पाटील.. मी आज के. ई. एम हॉस्पिटलमध्ये येऊन कोरोनावरची लस घेतली आहे. या लसीमुळे निश्चितपणे फ्रंटलाईनवर काम करणारे पोलिस, आरोग्य कर्मचारी यांना फायदा होणार आहे. मुंबई पोलिसांचे 99 जवान या कोरोना काळात शहीद झाले. आपण सगळ्यांनी मनात कोणतीही किंतु-परंतु न ठेवता लस घ्यावी. जर आपण सुरक्षित असू तर कुटुंब सुरक्षि असेल आणि कुटुंब सुरक्षित असेल तर समाज सुरक्षित असेल. त्यामुळे सगळ्यांनी लस घ्या…”, असं आवाहन नांगरे पाटील यांनी केलं आहे.

मुंबईत पुन्हा कोरोनाचा कहर

मुंबईसोबतच महराष्ट्राच्या इतर अनेक भागात वाढत्या कोरोनाच्या रुग्णसंख्येमुळे मुंबई महापालिका (BMC Raids On Hotels And Bars) अलर्ट झाली आहे. म्हणून दोन दिवसांपासून महापालिकेकडून रेस्टॉरंट्स, बार आणि हॉटेल्सवर धडक कारवाई केली जात आहे. शनिवारी रात्रीच्या सुमारास वांद्रे आणि खार परिसरातल्या पाच रेस्टॉरंन्ट, बार आणि पबवर कारवाई करण्यात आली आहे.

650 जणांवर दंडात्मक कारवाई

यात जवळपास 650 जणांकडून महापालिकेने 1 लाखापेक्षा जास्त दंड वसूल केला आहे. वांद्रे येथील 145 कॅफे अँड बारमध्ये सोशल डिस्टन्सिंगचा नियम पालळा गेला नाही. म्हणून सदर व्यवस्थापनावर संसर्गजन्य रोग प्रतिबंधात्मक कायद्यांतर्गत वांद्रे पोलीस ठाण्यात एच वॉर्डच्या आरोग्य खात्यामार्फत या कॅफे अँड बारवर 188, 269 कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.

त्याचसोबत वांद्र्यातील आयरिश हाऊस, खार स्टेशनजवळील क्वॉर्टर पिलर, थ्री वाईस मंकी आणि यू-टर्न लाऊन्जमध्ये देखील महापालिकेकडून तपासणी करण्यात आली. ज्यात मोठ्या प्रमाणात सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांची पायमल्ली झालेली दिसली आणि विना मास्क असलेले ग्राहक आढळले होते. त्यामुळे त्यांच्यावर मनपाकडून दंडात्मक कारवाई केली गेली आहे.

हे ही वाचा :

वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे बीएमसी अलर्टवर, वांद्र्यात 650 जणांना दंड, 145 कॅफे अँड बारवर गुन्हे

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.