नववर्षात पदवीधर आमदार निवडणुकीचा उडणार राजकीय धुराळा, नाशिकसह पाच जागांसाठी निवडणूक, 30 जानेवारीला होणार मतदान

नवीन वर्षात राजकीय वातावरण तापणार असून पदवीधर मतदार संघातील निवडणूक आखाड्यात कोण कोण उतरणार याकडे लक्ष लागून आहे.

नववर्षात पदवीधर आमदार निवडणुकीचा उडणार राजकीय धुराळा, नाशिकसह पाच जागांसाठी निवडणूक, 30 जानेवारीला होणार मतदान
Image Credit source: Google
Follow us
| Updated on: Dec 31, 2022 | 10:25 AM

नाशिक : राज्यात सत्तांतर झाल्यानंतर पहिल्यांदाच विधानपरिषदेच्या काही जागांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. त्यामध्ये नाशिकसह अन्य पाच ठिकाणच्या पदवीधर विधानपरिषदेच्या जागेची निवडणूक पार पडणार आहे. नव्या वर्षातच ही निवडणूक होणार असल्याने वर्षाच्या सुरुवातीलाच निवडणुकीचा रानसंग्राम बघायला मिळणार आहे. नाशिकसह नागपूर, अमरावती, औरंगाबाद आणि कोकण विभागातील पदवीधर आमदार निवडले जाणार आहे. यापूर्वी नाशिकमधून सुधीर तांबे, औरंगाबादमधून विक्रम काळे, अमरावतीमधून डॉ. रणजीत पाटील, नागपूर मधून नागोराव गाणार आणि कोकणातून बाळाराम पाटील यापूर्वी निवडून आले असून प्रतिनिधित्व करत आहे. पहिल्यांदाच शिंदे-फडवणीस आणि महाविकास आघाडी असा सामना यानिमित्ताने बघायला मिळणार आहे. अत्यंत प्रतिष्ठेची ही निवडणूक होणार आहे. राज्यातील सत्तांतर झाल्यानंतर पहिल्यांदाच हा थेट सामना होणार असल्याने सर्वच राजकीय पक्ष आपले प्रभाल्य दाखवणार आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने याबाबत निवडणूक प्रक्रिया जाहीर केली आहे. यामध्ये 5 जागांसाठी ही निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे.

पाच जानेवारीला अधिसूचना जारी होणार असून 12 जानेवारी पर्यन्त उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत असणार आहे.

हे सुद्धा वाचा

30 जानेवारीला सकाळी आठ ते दुपारी चार वाजेपर्यंत मतदार प्रक्रिया पार पडणार आहे. आणि फेब्रुवारी महिन्यात दोन तारखेला मतमोजणी होणार आहे.

याबाबतची आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. 13 जानेवारीला उमेदवारी अर्ज छाननी होणार आहे. यामध्ये 16 जानेवारी पर्यन्त माघार घेता येणार आहे.

नाशिक जिल्ह्यात 66 हजार 709 मतदार संख्या असून लवकरच मतदान यादी जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय येथे प्रसिद्ध केली जाणार आहे.

एकूणच राज्यात पुन्हा राजकीय वातावरण तापणार असून निवडणुकीच्या आखाड्यात कोण कोण पहिलवान असणार आणि कोण बाजी मारणार हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.