ZP and Panchayat Samiti Election 2022 : कोल्हापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांचे प्रभाग रचना वादाच्या भोवऱ्यात; पहिल्याच दिवशी दाखल झाल्या 15 तक्रारी
प्रभाग रचनेवरून शिवसेनेचे माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर हल्ला चढवला होता. तसेच त्यांनी भौगोलिक संलग्नता टाळून राजकीय दबावाखाली चुकीच्या पद्धतीने प्रभाग रचना केल्याचा आरोप केला होता.
कोल्हापूर : कोल्हापूर (Kolhapur) जिल्हा परिषदेच्या 76 आणि 152 पंचायत समित्यांच्या मतदारसंघाची प्रारुप रचना जाहीर करण्यात आली आहे. नव्या प्रारुप रचनेनुसार झेडपीचे 9, तर पंचायत समित्यांच्या 18 मतदारसंघांची (constituency) वाढ झाली आहे. नव्या प्रारुप रचनेत काही गावांची अवस्था ही मला नाही तर घाल कुत्र्याला अशी झाली आहे. तर या गावांचे तुकडे पाडण्यात आली आहेत. नव्या प्रारुप रचनेत करवीर तालुक्यामध्ये 2 मतदारसंघ वाढले आहेत. तर गगनबावडा, भुदरगड, आजरा आणि गडहिंग्लज या तालुक्यामध्ये कोणताही बदल झालेला नाही. बाकी 7 तालुक्यांमध्ये झेडपीचा एक गट वाढला आहे, तर पंचायत समित्यांमध्ये 18 मतदारसंघांची वाढ झाली आहे. मात्र कोल्हापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांचे प्रभाग रचना आता वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. पहिल्याच दिवशी 15 तक्रारी दाखल झाल्या आहेत. तर भौगोलिक संलग्नता न राहता राजकीय दबावातून प्रभाग रचना झाल्याचा आरोप शिवसेनेचे माजी आमदार चंद्रदीप नरके (former MLA of Shiv Sena Chandradeep Narke) यांनी केला आहे.
महाविकास आघाडीच्या नेत्यांवर हल्लाबोल
जिल्हा परिषदेच्या 76 आणि 152 पंचायत समित्यांच्या मतदारसंघाची प्रारुप रचना जाहीर करण्यात आली आहे. नव्या प्रारुप रचनेनुसार झेडपीचे 9, तर पंचायत समित्यांच्या 18 मतदारसंघांची वाढ झाली आहे. नव्या प्रारुप रचनेतनंतर वादाला तोंड फुटले आहे. तर याच्याआधीच प्रभाग रचनेवरून शिवसेनेचे माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर हल्ला चढवला होता. तसेच त्यांनी भौगोलिक संलग्नता टाळून राजकीय दबावाखाली चुकीच्या पद्धतीने प्रभाग रचना केल्याचा आरोप केला होता. तर आता त्यांनी त्याचा पुर्रोच्चार करताना, चुकीचा प्रभाग रचने विरोधात न्यायालयात धाव घेण्याचा नरके यांचा इशारा दिला आहे. तसेच पैशाच्या जोरावर जिल्ह्याचे राजकारण चुकीच्या दिशेला नेले जात असल्याचं नरके म्हटलं आहे. तर नरके यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर हल्लाबोल केला.
सुनावणी 15 जूनला विभागीय आयुक्त समोर
नव्याने जाहीर झालेली प्रारुप रचना जिल्हाधिकारी कार्यालय, तहसिलदार कार्यालय तसेच ग्रामपंचायत आदी ठिकाणी पाहता येणार आहे. 2 ते 8 जून या कालावधीत हरकती स्वीकारल्या जाणार आहेत. 21 जूनपर्यंत आलेल्या हरकतींवर सुनावणी घेऊन त्या पूर्ण केल्या जातील. याबाबतचा अहवाल विभागीय आयुक्तांना 22 जुनला सादर करण्यात आला आहे . ही सर्व प्रक्रिया झाल्यानंतर 27 जुनला अंतिम प्रभाग रचना जाहीर केली जाणार आहे. मात्र काल 3 जून रोजी पहिल्याच दिवशी प्रभाग रचनेवरून 15 तक्रारी दाखल झाल्या. ज्यात हातकणंगले तालुक्यातील सर्वाधिक तक्रारी आहेत. तर यांची सुनावणी 15 जूनला विभागीय आयुक्त समोर होणार आहे.
गोपनीयतेचा भंग
दरम्यान प्रभाग रचनेवरून जिल्ह्यात आधीच वादंग उठले होते. राजकीय आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात होत्या. दरम्यान फेब्रुवारी महिन्यात प्रभाग रचनेचा आरखाडा हा व्हायरल झाला होत्या त्याच वेळी नरके यांनी गोपनीयतेचा भंग झाल्याचे म्हटलं होतं. तसेच निवडणूक आयोगाकडे तक्रार देखील केली होती. पण तक्रार दाखल करूनही त्यावर कोणतीच प्रतिक्रीया आयोगाने दिली नसल्याने ते आक्रमक झाले होते. तसेच याप्रकरणी प्रसंगी न्यायालयात दाद मागू असेही ते म्हणाले होते.