कोरोनाचे नियम मोडताय, दंड न भरल्यास प्रशासन थेट मालमत्तेवर बोजा चढवणार
कोरोना नियमांचं उल्लंघन केल्यानं आकारण्यात आलेला दंड न भरल्यास सातबारा, प्रॉपर्टी कार्ड, नगरपालिकेचे प्रॉपर्टी कार्ड, नमुना आठ अ यावर बोजा चढवण्यात येणार आहे. Wardha covid rules violation fine
वर्धा: सध्या कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचं उल्लंघन करणाऱ्याना दंड आकारण्यात येत आहे. पण अनेक जण दंड भरत नाहीत. त्यामुळं वादाचे प्रसंगही निर्माण होतात. आता दंड वसूल करण्यासाठी दंड न भरणाऱ्याच्या संपत्तीवर बोजा चढवला जाणार आहे. त्यापूर्वी दंड भरण्यासंदर्भात आठ दिवसांची नोटीस दिली जाणार आहे. (Wardha Administration started to impose covid rules violation fine on property of peoples)
कोरोना नियमांंचं उल्लंघन करणाऱ्यांकडून वाद
कोविड प्रतिबंधात्मक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या अनेक दुकान मालक, मंगल कार्यालय तसच वैयक्तिकरित्या अनेकांना दंड आकारण्यात आला आहे. पण अनेक ठिकाणी पथकांशी वाद घातले जातात. अनेक जण दंड भरण्यास नकार देतात. अशावेळी दंडाची नोंद घेऊन पथकं परत जातात. हा दंड वसूल करण्यासाठी दंड न भरलेल्यांची माहिती काढत प्रथम आठ दिवसांची नोटीस दिली जाणार आहे.. त्यानंतरही दंड न भरल्यास सातबारा, प्रॉपर्टी कार्ड, नगरपालिकेचे प्रॉपर्टी कार्ड, नमुना आठ अ यावर बोजा चढवण्यात येणार आहे. तशा सूचना यंत्रणेला देण्यात आल्या आहेत. येत्या दोन दिवसांत या निर्णयाची अंमलबजावणी सुरू होणार आहे, अशी माहिती उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे यांनी दिली.
कोरोना नियमांचं पालन करण्याचं आवाहन
वर्ध्याच्या रामनगरात एक लग्नसोहळा होता. त्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. दंड न भरल्यास संपत्तीवर त्याची नोंद होईल. लोकांनी नियमांचं पालन करावं, अस आवाहन पोलीस अधिकारी धनाजी जळक यांनी केलं आहे. नागरिकांना कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले जात आहे. उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे तरी सुद्धा दंड न भरणाऱ्यांवर आता प्राशशन कठोर होताना दिसत आहे.
7th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांना बसणार मोठा धक्का, आता DA नंतर TA वाढणार नाही#cutofftravelallowance #DearnessAllowance #govermentemployee #travelallowance #modigovernment https://t.co/8LGRGBPgsy
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 26, 2021
देशात गेल्या 24 तासात 3 लाख 52 हजार 991 नवे रुग्ण
भारत सध्या कोरोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेला सामोरा जात आहे. गेल्या 24 तासांमध्ये देशात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत विक्रमी वाढ नोंदवली गेली आहे. 24 तासात 3 लाख 52 हजार 991 कोरोना रुग्ण आढळून आले तर 2812 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 2 लाख 19 हजार जणांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे.
संबंधित बातम्या:
कोरोनाची दुसरी लाट भयंकर, आता घरातही मास्क लावण्याची वेळ आलीय : केंद्र सरकार
(Wardha Administration started to impose covid rules violation fine on property of peoples)