Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वर्धा जिल्ह्यातील धरणं ओव्हरफ्लो, रब्बी पिकांचाही मार्ग मोकळा

वर्धा शहर आणि गावांसह उद्योग, शेतकर्‍यांकरिता महत्त्वाच्या असलेल्या धाम प्रकल्पाच्या सांडव्यावरून पाणी वाहत आहे. हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने (Wardha Dams overflow) भरल्याने वर्षभरानंतर शेतकर्‍यांना रब्बी हंगामासाठी पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

वर्धा जिल्ह्यातील धरणं ओव्हरफ्लो, रब्बी पिकांचाही मार्ग मोकळा
Follow us
| Updated on: Sep 04, 2019 | 10:42 PM

वर्धा : विदर्भात यावर्षी सुरुवातीला पावसाची दांडी हे चिंता वाढवणारी होती. मात्र ऑगस्ट महिन्यात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने वर्धा जिल्ह्यातील (Wardha Dams overflow) अनेक प्रकल्प तुडूंब भरून वाहत आहेत. त्यामध्ये वर्धा शहर आणि गावांसह उद्योग, शेतकर्‍यांकरिता महत्त्वाच्या असलेल्या धाम प्रकल्पाच्या सांडव्यावरून पाणी वाहत आहे. हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने (Wardha Dams overflow) भरल्याने वर्षभरानंतर शेतकर्‍यांना रब्बी हंगामासाठी पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

वर्धा शहर आणि पिपरी अधिक अकरा गावे, उद्योगांनाही पाणी मिळणार असल्याने संकटाच दूर झाले आहे. एवढंच नव्हे तर जिल्ह्यातील आठ मोठे आणि मध्यम प्रकल्प तर 10 लघु प्रकल्प शंभर टक्के भरले आहेत.

आर्वी तालुक्यात धाम नदीवर निर्मित महाकाळी येथील धाम प्रकल्प जिल्ह्यासाठी महत्त्वाचा मानला जातो. याच धाम नदीवरून शहरासह 11 गावे तसेच एमआयडीसी, रेल्वे, उद्योगांना पाणी पुरवठा होतो.

मागील वर्षी कमी पर्जन्यमान पाहता सप्टेंबर महिनीपासूनच पाणी कपातील सुरुवात झाली. विशेष म्हणजे पिण्याचे पाण्याचा पुरवठा 15 दिवसांनी सुरू होता.

मे आणि जून महिन्याअखेर कोरडा ठाक पडलेल्या प्रकल्पातील मृत जलसाठा उपसा करत वर्धेकरांची तहान भागवण्यात आली.

मागील अनेक वर्षाचा इतिहास पाहता मृत जलसाठा उपयोगात आणण्याची वेळ आली नव्हती. यंदा मात्र हे जलसंकट बाप्पाच्या आगमनासह धाम प्रकल्प ओसंडून वाहू लागला. मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात केवळ 37 टक्के पाणी साठा होता. तोच धाम प्रकल्प यंदा बाप्पा पावल्याने 100 टक्के भरला आहे.

जिल्ह्याच्या 11 मोठे आणि मध्यम प्रकल्पांमध्ये एकूण 63.92 टक्के जलसाठा सध्या आहे. आठ प्रकल्पांमधून पाण्याचा विसर्ग सुरु आहे. त्यात धाम प्रकल्प, पोथरा प्रकल्प, पंचधारा प्रकल्प, डोंगरगाव, मदन उन्नई, लाल नाला, वर्धा कार नदी आणि सुकळीचा लघु प्रकल्पाचा समावेश आहे.

जिल्ह्याच्या सीमेला लागून असलेल्या नांद प्रकल्प आणि वडगाव प्रकल्पामधूनही पाण्याचा विसर्ग सुरु आहे. तर 20 लघू प्रकल्पांपैकी 10 प्रकल्प पूर्ण भरले आहेत. यात धाम मध्यम प्रकल्पाची पूर्ण संचय पातळी 328.66 मीटर आहे. प्रकल्पात 9.950 दशलक्ष घनमीटर संस्थतीत साठा असून 59.485 दशलक्ष घनमीटर साठा उपयुक्त साठा समजला जातो.

यावर्षी प्रकल्पात पूर्ण क्षमतेने पाणी साठा झाला आहे. त्यामुळे सर्वांना पाणी मिळेल. त्याकरिता आवश्यक नियोजन करण्यात येणार असल्याचंही सांगण्यात आलंय.

मागील उन्हाळ्यात पाणी कपात करावी लागली होती. प्रकल्प ओसंडून वाहत असल्याने यावर्षी बाप्पा पावले असल्याने हे संकट दूर झाल्याचं नागराध्यक्ष अतुल तराळे यांनी सांगितलं. पण, प्रकल्प ओसंडून वाहिल्यानंतर पाण्याचा अपव्यय होणार नाही, याचीही काळजी घेण्याची गरज आहे. त्यामुळे पाण्याचे योग्य नियोजन करू असेही ते म्हणाले.

यंदा कधी नव्हे असा पाण्याचा दुष्काळ वर्धेकरांना जून महिन्यात अनुभवायला मिळाला. पाण्याची पातळी खाली गेल्याने बोअर कोरडे ठाक पडले होते. पण पावसाने तूट असलेली सरासरी भरून काढत तब्बल सरासरी 720.91 मिमी पाऊस झाला आहे. एकूण 920.71 मिमी पाऊस हा पडत असतो.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे UNCUT भाषण
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे UNCUT भाषण.
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मराठी भाषेचे कौतुक, म्हणाले "मी बोलण्याचा
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मराठी भाषेचे कौतुक, म्हणाले
'ऑपरेशन टायगर'चा सपाटा, शिंदेंच्या शिलेदाराकडून ठाकरे गटाला मोठ खिंडार
'ऑपरेशन टायगर'चा सपाटा, शिंदेंच्या शिलेदाराकडून ठाकरे गटाला मोठ खिंडार.
'मेरी कुर्सी छिनी गई', मुनगंटीवार म्हणाले, 'पंतप्रधानांची खुर्ची मी..'
'मेरी कुर्सी छिनी गई', मुनगंटीवार म्हणाले, 'पंतप्रधानांची खुर्ची मी..'.
दहावीचा पेपर फुटला, परीक्षा केंद्रावर कॉपी पुरवण्यासाठी धक्काबुक्की
दहावीचा पेपर फुटला, परीक्षा केंद्रावर कॉपी पुरवण्यासाठी धक्काबुक्की.
अण्णा हजारे मैदानात, महायुतीतील दोन मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
अण्णा हजारे मैदानात, महायुतीतील दोन मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी.
कॉपीमुक्त अभियानाचा पहिल्याच दिवशी फज्जा, दहावीचा पहिलाच पेपर फुटला
कॉपीमुक्त अभियानाचा पहिल्याच दिवशी फज्जा, दहावीचा पहिलाच पेपर फुटला.
'मला हलक्यात घेऊ नका, जनता त्यांना..', एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर पलटवार
'मला हलक्यात घेऊ नका, जनता त्यांना..', एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर पलटवार.
धंगेकरांना धक्का, नव्या टीममधून डावललं; एकनाथ शिंदेंची भेट घेणं भोवलं?
धंगेकरांना धक्का, नव्या टीममधून डावललं; एकनाथ शिंदेंची भेट घेणं भोवलं?.
जरांगे देशमुख कुटुंबाच्या भेटीला, बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना थेट फोन
जरांगे देशमुख कुटुंबाच्या भेटीला, बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना थेट फोन.