कोरोनामुळे 10 महिन्यांपासून कुटुंबीयांची गाठभेट नाही, मग व्हिडीओ कॉल आहे ना!, वर्ध्यातल्या तुरुंगाला मायेचा ओलावा

कैद्याला माणुसकीने वागवायचं नाही, असा जणू देशातला अलिखित नियम पण याला अपवाद ठरलंय वर्ध्याचं कारागृह (Wardha jail)... | Wardha jail Unique project For prisoners

कोरोनामुळे 10 महिन्यांपासून कुटुंबीयांची गाठभेट नाही, मग व्हिडीओ कॉल आहे ना!, वर्ध्यातल्या तुरुंगाला मायेचा ओलावा
Wardha Jail prisoners
Follow us
| Updated on: Feb 09, 2021 | 10:12 AM

वर्धा : कैद्याला माणुसकीने वागवायचं नाही, असा जणू देशातला अलिखित नियम पण याला अपवाद ठरलंय वर्ध्याचं कारागृह (Wardha jail)… कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गतवर्षीच्या मार्च महिन्यापासून देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आले होते. तब्बल 10 महिने सर्व वाहतूक ठप्प होती. याचा फटका कारागृहातील कैद्यांनाही बसला. कैद्यांना नातेवाइकांना भेटण्यास रोख लावण्यात आली. मात्र,शासनाने शासकीय खर्चातून कारागृह प्रशासनाला मोबाइल मंजूर केले आहेत. (Wardha jail Unique project For prisoners)

कारागृहातील मोबाइलवरुन कारागृहातील बंदीवान आपल्या नातेवाइकांशी संवाद साधतात. एखाद्या कैद्याने नातेवाइकाशी भेटण्याची इच्छा दर्शविली असता त्याला व्हिडीओ कॉलिंगद्वारे नातेवाइकांना पाहण्याची संधी दिली जात आहे. एकंदरीत, कोरोनाकाळातही बंदिवानांना कारागृह प्रशासनाकडून मोठा आधार मिळत आहे.

कोरोनामुळे बंदिवानांच्या नातेवाइकांची भेटगाठ बंद करण्यात याव्या, अशा सूचना शासनाने दिल्या होत्या. मात्र, त्याला पर्याय म्हणून शासनाने शासकीय खर्चातून मोबाइल दिला. त्या मोबाइलद्वारे ऑनलाइन तसेच व्हिडीओ कॉलिंगद्वारे बंदिवानांना त्यांच्या नातलगांसोबत संवाद साधण्याची शासनाने सवलत दिली.

ज्या बंदीला आपल्या नातेवाइकांशी बोलायचे आहे, त्या बंदीचे वकील ऑनलाइन अर्ज करून नातेवाइकाशी संवाद साधण्याची परवानगी घेत आहेत. एकंदरीत वर्धा जिल्हा कारागृहदेखील बंदिवानांची चांगली देखभाल करीत असून त्यांना लागणाऱ्या आवश्यक सुविधा पुरवत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शासन आणि कारागृह प्रशासनाने बंदिवानांना दिलासा दिला आहे.

(Wardha jail Unique project For prisoners)

हे ही वाचा :

राजकारणाचा ‘नगरी पॅटर्न’, राम शिंदेंना विखेंचा झटका, पवारांसोबत आतून युती, ‘खास’ माणसासाठी पक्ष टांगणीला?

नोकऱ्या भरपूर, मग कौशल्य कोणती हवीत? ही माहिती वाचा, निर्णय घ्या!

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.