वर्धा: येथील हिंगणघाटमधील निवासी शाळेतील कोरोनाबाधित विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांची संख्या 100 वर पोहोचली आहे. 100 रुग्णांमध्ये 94 विद्यार्थ्यांसह 6 शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. रॅपिड अँटीजन टेस्ट मध्ये निगेटिव्ह आलेल्या 23 लोकांचा आरटीपीसीआर अहवाल पॉजिटिव्ह आल्यानं चिंता वाढली आहे. (Wardha School corona positive cases number increased to hundred)
हिंगणघाट शहराजवळील सातेफळ येथील निवासी शाळेतील कोरोनाबधितांचा आकडा 100 वर पोहोचला आहे. शाळेतील मोठ्या संख्येत विद्यार्थी पॉजिटीव्ह येत असल्याने शहरात खळबळ माजली आहे. अँटिजन टेस्ट मध्ये निगेटिव्ह आलेल्या 23 लोकांचा आज आरटीपीसीआर चाचणीत अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
1 फेब्रुवारीला अनलॉक प्रक्रियेदरम्यान निवासी शाळा उघडण्यात आलीय.या दरम्यान सर्व शिक्षकांची कोरोना चाचणी सुद्धा करण्यात आली. सातेफळ येथील निवासी शाळा सुद्धा एक फेब्रुवारीला सुरू झालीय. शाळेत विदर्भाच्या पाच जिल्ह्यातील विद्यार्थी शिकतात .एकूण 292 विद्यार्थी येथे शिकतात. 6 फेब्रुवारीला एका विद्यार्थ्यांची प्रकृती अस्वस्थ होती. त्याला खासगी रुग्णालयात दाखविण्यात आले.दरम्यान त्याचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला.
काही विद्यार्थ्यांमध्ये सौम्य लक्षण आढळल्याने त्यांची चाचणी 9 फेब्रुवारीला करण्यात आलीय. त्यांचाही अहवाल पॉझिटिव्ह आला. यादरम्यान सर्वांची कोरोना चाचणी करण्यात आल्यावर 77 लोकांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. यात एका शिक्षकेतर कर्मचाऱ्याचा समावेश होता.अँटीजेन टेस्ट मध्ये निगेटिव्ह आलेल्या सर्वांना विलगीकरणात ठेवत त्यांचीही आरटीपीसीआर टेस्ट करण्यात येत आहे. यात आज 23 आणखी रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत.
आता पर्यंत आढळलेल्या कोरोनाबाधितांमध्ये 94 विद्यार्थी आणि 6 शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा समावेश आहे, अशी माहिती उपप्राचार्य लकी खिलोसिया यांनी दिली. पॉझिटिव्ह असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना शाळेच्या वसतिगृहात विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.मोठ्या प्रमाणात विद्यार्थी पॉझिटिव्ह येत असल्याने शिक्षण क्षेत्रात खळबळ माजली आहे.
विजय वडेट्टीवारांच्या विरोधात सोमवारी भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचा ‘शंखनाद’!https://t.co/sf2WXY1QXW#vijaywadettiwar | #bjp | #congress | #Maharashtra
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 14, 2021
संबंधित बातम्या:
माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह, संपर्कात आलेल्यांनी तपासणी करुन घ्या : चंद्रकांत खैरे
नवनिर्वाचित आमदार अभिजित वंजारी कोरोना पॉझिटिव्ह, संदीप जोशींनाही कोरोना
(Wardha School corona positive cases number increased to hundred)