वर्ध्यात सामाजिक संस्था अन्न-धान्य घेऊन घरो-घरी पोहोचल्या, मात्र विद्यार्थी पोषण आहारापासून वंचित असल्याची ओरड

लॉकडाऊनच्या काळात शाळांत शिल्लक असलेले पोषण आहाराचे तांदूळ आणि डाळी, कडधान्य वितरित करण्याचे आदेश शासनाकडून देण्यात आले होते.

वर्ध्यात सामाजिक संस्था अन्न-धान्य घेऊन घरो-घरी पोहोचल्या, मात्र विद्यार्थी पोषण आहारापासून वंचित असल्याची ओरड
Follow us
| Updated on: Apr 10, 2020 | 5:05 PM

वर्धा : लॉकडाऊनच्या काळात ग्रामीण भागातील नागरिकांना धान्याची (Wardha School Nutritious Food) कमतरता भासू नये, याकरिता शाळांत शिल्लक असलेले पोषण आहाराचे तांदूळ आणि डाळी, कडधान्य वितरित करण्याचे आदेश शासनाकडून देण्यात आले होते. विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनाकरिता शासनाकडून मोठ्या प्रमाणात तांदूळ आणि कडधान्य पुरविण्यात येते. मार्च महिन्याचा शालेय पोषण आहार विद्यार्थ्यांना वितरित करण्याचा निर्णय शासनाने घेतला. पण हा आहार लॉकडाऊनमध्ये गर्दी न (Wardha School Nutritious Food) करता वाटायचा होता, वाटपाच्या काळात कुठे गर्दी पाहायला मिळाली तर कुठे तो विद्यार्थ्यांना मिळालाच नसल्याचा प्रकार समोर आला आहे.

शिक्षक तो आहार प्रत्येक विद्यार्थ्यांच्या घरी स्वतः पोहचवू शकले असते. जेव्हा विविध सामाजिक संस्था आणि संघटना गरजूपर्यंत धान्य घेऊन पोहचवत आहेत. तेथे आमचा शिक्षक का मागे रहावा? असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे.

सरकारी आदेशानुसार, जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जिल्हा परिषद आणि खासगी शाळांतून तब्बल 331 क्विंटल तांदूळ वाटप करण्यात आल्याचा अहवाल जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून आयुक्तांना पाठविण्यात आला आहे.

जिल्ह्यातील आठही पंचायत समितीत ग्रामीण भागात एकूण 1 हजार 106 शाळा आहेत. या शाळांत 69 हजार 297 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. पण हा अहवाल किती खरा आणि किती खोटा याची पाळताळणी करण्याचे आवाहन आता अधिकाऱ्यांसमोर आहे.

कोरोनाच्या संसर्गाची साखळी तोडण्याकरिता शासनाने लॉकडाऊन (Wardha School Nutritious Food) लागू केले. या काळात या शाळांना सुट्टी देण्यात आली. यामुळे मोठ्या प्रमाणात शाळेत पोषण आहाराचे तांदूळ तसेच पडून ते खराब होण्याची शक्यता निर्माण झाली होती. लॉकडाऊनच्या काळात ग्रामीण भागातील सर्वच कामे ठप्प झाली. त्यातही हाताला काम नसल्याने अनेकांच्या दोन वेळेच्या जेवणाची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे.

ही शक्यता ओळखून शिल्लक असलेला तांदूळ विद्यार्थ्यांना देण्याचा निर्णय झाला. या निर्णयानुसार, जिल्ह्यातील एक शाळा वगळता इतर शाळांतून 3 लाख 31 हजार 428 किलो तांदूळ वितरित करण्यात आले. तर याच शाळांतून 8 हजार 206 किलो कडधान्य आणि डाळींचे वितरण करण्यात आल्याचा अहवाल शासनाला पाठविण्यात आला आहे. या अहवालानुसार, सर्वच शाळांनी शिल्लक धान्याचे वितरण केले असे दिसते. वास्तवात तसे नसल्याची चर्चा जोरात असून शिक्षणाधिकाऱ्यांनी याची चौकशी केल्यास तांदळाचा मोठा घोळ पुढे येण्याची शक्यता आहे.

शासनाने ग्रामीण भागातील सर्वच शाळांत शिल्लक असलेला तांदूळ वितरित करण्याच्या सूचना केल्या होत्या. यानुसार जिल्हा परिषदेच्या शाळांतून शिल्लक धान्याचे वितरण झाले. परंतु, अपवाद वगळता बऱ्याच खासगी शाळांमध्ये हा वाटप कागदावरच झाल्याची चर्चा जोरात आहे. यात वर्धा शहरालगत असलेल्या ग्रामीण भागातील शाळांचा आकडा मोठा असल्याची चर्चा शिक्षण विभागातच आहे. कागदावरील आकड्यांच्या जुळवाजुवित शिक्षक पटाईत आहेत. त्यामुळे कागदावरच हा वाटप निपटविण्यात आल्याची (Wardha School Nutritious Food) चर्चा जोर धरु लागली आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.