मान्सूनपूर्व वादळातच होत्याचं नव्हतं झालं, घरं गेलं आणि गोठाही गेला, वर्ध्यात अनेक ठिकाणी प्रचंड नुकसान

अशोक घोडाम यांच्या घराचे छत कोसळले होते, यावेळी घरात बांधलेल्या शेळ्या छताखाली दबल्या गेल्या आहेत. त्यामुळे शेळ्या जखमी झाल्या आहेत. तर बाबाराव देवतळे यांच्या घराचे छत सिमेंटच्या पत्र्याचे होते ते जुन्या कौलारू घरावर कोसळल्याने घर पूर्णतः जमीनदोस्त होऊन त्यांचे मोठे नुकसान झाले.

मान्सूनपूर्व वादळातच होत्याचं नव्हतं झालं, घरं गेलं आणि गोठाही गेला, वर्ध्यात अनेक ठिकाणी प्रचंड नुकसान
वर्ध्यातील समुद्रपूर तालुक्याच्या पिंपळगाव, धोंडगावात मान्सूनपूर्व पावसामुळे नुकसानImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 26, 2022 | 6:18 PM

वर्धाः समुद्रपूर तालुक्यातील (Samudrapur) पिंपळगाव आणि धोंडगाव येथे मान्सूनपूर्व (Pre-monsoon) पावसासह वादळाने प्रचंड नुकसान केले आहे. वादळाच्या तडाख्याने शेतकऱ्यांच्या 17 गोठ्यांचे नुकसान झाले असून 10 घरांचे (10 houses collapsed) छत उडाल्याने शेतकऱ्यांचा संसार उघड्यावर पडला आहे आला. यात शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले. घरांची पडझड या मान्सूनपूर्व पावसातच (Rain) झाल्याने आता शेतकऱ्यांनी राहायचे कुठे आणि पोटाला खायचे काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. मान्सूनपूर्व पावसाने जनावरांच्या गोठ्यांचे नुकसान तर झाले आहेच पण त्याच बरोबर घराचे छत उडून गेल्याने घरातली ठेवलेले अन्नधान्य सगळे भिझून गेले आहे.

पिंपळगाव आणि धोंडगावात वादळासह पावसाने जोरदार हजेरी लावली. पिंपळगाव येथील हनुमान मंदिरालगत शिवदास सडमाके यांच्या घरावर वडाच्या झाडाची फांदी कोसळली.

जीवनोपयोगी साहित्याची नासडी

यावेळी घरातील सदस्य थोडक्यात बचावले आहेत. मात्र, घराच्या छताचे नुकसान झाले आहे. घराचे छत कौलारू असल्याने आणि ते पावसात कोसळल्याने जीवनोपयोगी साहित्याची नासडी झाली.

शेळ्या छताखाली दबल्या

अशोक घोडाम यांच्या घराचे छत कोसळले होते, यावेळी घरात बांधलेल्या शेळ्या छताखाली दबल्या गेल्या आहेत. त्यामुळे शेळ्या जखमी झाल्या आहेत. तर बाबाराव देवतळे यांच्या घराचे छत सिमेंटच्या पत्र्याचे होते ते जुन्या कौलारू घरावर कोसळल्याने घर पूर्णतः जमीनदोस्त होऊन त्यांचे मोठे नुकसान झाले. सुरेश किन्नके, हनुमान धोटे यांच्या घराच्या भिंती वादळ आल्याने कोसळल्या आहेत. आनंद कुटे आणि भारताबाई गुरनुले यांच्या घराची टिनाची छते उडून गेल्याने त्यांचेही प्रचंड नुकसान झाले आहे.

तातडीने भरपाई देण्याची मागणी

झोपडपट्टी परिसरातील रहिवासी भीमराव तेलंग, केशव भगत, गणेश घुमडे, मधुकर कुटे, रमेश कुटे, आनंद कुटे, दीपक भगत, प्रमोद धोटे, महादेव कुटे, उमेश कोरेकर तसेच धोंडगाव येथील विजय मुनेश्वर, कवडू थुटे आदींसह नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसानीचा पंचनामा करून तातडीने भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.