Wardha Rain : वर्ध्यात शेतावर गेलेले 15 मजूर नाल्याच्या पुरात अडकले, प्रशासनाने लाईफ सेव्हिंग जॅकेटच्या मदतीने सुरक्षित काढले बाहेर

रात्री साडेआठवाजेपर्यंत सर्वांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आले. यातील एका महिलेचा पाय घसरल्याने ती घाबरल्याने तिची प्रकृती खालावली. तिला सामान्य रुग्णालयात उपचारार्थ पाठविण्यात आले.

Wardha Rain : वर्ध्यात शेतावर गेलेले 15 मजूर नाल्याच्या पुरात अडकले, प्रशासनाने लाईफ सेव्हिंग जॅकेटच्या मदतीने सुरक्षित काढले बाहेर
लाईफ सेव्हिंग जॅकेटच्या मदतीने सुरक्षित काढले बाहेरImage Credit source: t v 9
Follow us
| Updated on: Jul 09, 2022 | 10:00 PM

वर्धा : वर्ध्यासह लगतच्या परिसरात झालेल्या धुव्वादार पावसाने चांगलाच कहर केला. वर्धा ते पुलगाव मार्गावरील सालोड नजीकच्या नाल्याला आलेल्या पुरात शेतातील सुमारे 13 महिला मजूर (Labor) आणि २ पुरुष बांधावरच अडकून पडले. मात्र, पोलीस आणि महसूल प्रशासनातील कर्मचारी तसेच आरसीबी पथकातील कर्मचाऱ्यांनी रोप व लाईफ सेव्हिंग जॅकीटच्या (Life Saving Jackets) सहाय्याने अडकलेल्यांचे सुरक्षित रेस्क्यू केले. रात्री साडेआठ वाडतापर्यंत रेस्क्यू ऑपरेशन सुरु होते. मजूर अडकल्याची माहिती मिळताच त्यांना सुखरुप बाहेर काढण्यासाठी प्रशासनाने अलर्ट मोडवर येवून रेस्क्यू ऑपरेशन (Rescue Operations) राबविले. धोत्रा परिसरातून गेलेल्या नाल्याला अचानक पूर आल्यामुळे शेतशिवारात या पाण्याचे वेढा दिला. त्यामुळे शेतात कामाकरिता गेलेल्या 13 महिला व दोन पुरुष असे 15 मजूर अडकून पडले. दुपारच्या सुमारास झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतातील महिला मजूर नाल्याला आलेल्या पुरात अडकून पडले होते. यावेळी परिसरातील नागरिकांनी बचावासाठी मोठी गर्दी केली होती. मात्र, लगेच सावंगी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक मल्हारी ताळीकोटे हे पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले आणि वाहतूक सुरळीत केली.

wardha rain 1

वर्ध्यात शेतावर गेलेले 15 मजूर नाल्याच्या पुरात अडकले

रात्री उशिरापर्यंत सुरू होते रेस्क्यू ऑपरेशन

माहिती प्रशासनाला मिळताच उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे, उपविभागीय पोलीस अधिकारी पीयूष जगताप, तहसीलदार रमेश कोळपे, मंडळ अधिकारी शैलेंद्र देशमुख, पोलीस निरीक्षक धनाजी जळक, पोलीस उपनिरीक्षक मल्हारी ताळीकोटे, वाहतूक पोलीस निरीक्षक रवींद्र रेवतकर यांच्यासह महसूल व पोलीस प्रशासनाचे कर्मचारी आणि लाईफ स्विमिंग गार्डस घटनास्थळी दाखल झाले. उपविभागीय अधिकारी बगळे, तहसीलदार कोळपे व उपविभागीय पोलीस अधिकारी जगताप यांनी स्वत: पुरात उतरुन रेस्क्यू करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य वाढविले. रात्री साडेआठवाजेपर्यंत सर्वांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आले. यातील एका महिलेचा पाय घसरल्याने ती घाबरल्याने तिची प्रकृती खालावली. तिला सामान्य रुग्णालयात उपचारार्थ पाठविण्यात आले.

यवतमाळात चारशे हेक्टर जमीन पाण्याखाली

यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. वारा रोडवरील पिके पाण्याखाली आली. दुपारी दोन वाजता पासून साडेपाच वाजेपर्यंत मुसळधार पाऊस सुरू होता. राळेगाव, वारा, आष्टा, मेंगापूर कळमनेर, गुजरी यासह नाल्याच्या काठा बाजूला असलेल्या शेतींना मोठा फटका बसला. अंदाजे 300 ते चारशे हेक्टर जमीन पाण्याखाली आली. सोयाबीन, कपाशी, तूर इतर पिकांना मोठा फटका बसला. आधी पाण्याअभावी शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले होते. आता अती पाण्यामुळे पिके धोक्यात आली. शेतकऱ्यांकडून तातडीने सर्वेक्षण करण्याची मागणी करण्यात आली.

हे सुद्धा वाचा

बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.