Wardha Flood : वर्ध्यातील पुरात 5 दुचाकी 2 सायकली वाहून गेल्या, वाहने खोल खड्ड्यात जाऊन अडकली, शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली

सर्व मजूर रविवारपासून वाहनांचा शोध घेत होती. खड्ड्यातील गाळत फसलेल्या दोन दुचाकी व एक सायकल जेसीबीच्या सहाय्याने काढण्यात आली. तसेच इतर तीन दुचाकी व एका सायकलचा शोध सुरु आहे.

Wardha Flood : वर्ध्यातील पुरात 5 दुचाकी 2 सायकली वाहून गेल्या, वाहने खोल खड्ड्यात जाऊन अडकली, शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली
वर्ध्यातील पुरात 5 दुचाकी 2 सायकली वाहून गेल्या
Follow us
| Updated on: Jul 11, 2022 | 9:43 PM

वर्धा : मागील एका आठवड्यापासून जिल्ह्यात पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत. शनिवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातून गेलेल्या समृद्धी महामार्गाजवळून वाहणाऱ्या पाण्यात 5 दुचाकी वाहने आणि 2 सायकली पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्या. ही वाहने खोल खड्ड्यात जाऊन अडकल्याने त्यावर महामार्गाचा गाळ पडल्याने वाहने गाळात दबली. ही वाहने जेसीबीच्या मदतीने दोन दुचाकी अन् एक सायकल काढण्यात आली. इतर वाहने अजूनही मिळाली नसल्याची माहिती आहे. वर्धा तालुक्यातील शेकापूर (Shekapur) आणि मांडवा (Mandwa) या दोन गावादरम्यान समृद्धी महामार्ग जातो. या महामार्गाच्या पुलाजवळ शनिवारी दुपारच्या सुमारास काम करणाऱ्या मजुरांनी पाच दुचाकी वाहने उभी करून ठेवली होती. त्याच ठिकाणी इतर दोन मजुरांच्या सायकल उभ्या होत्या. पुलाजवळ वाहने ठेवून हे सर्व समृद्धीच्या कामावर पायदळ गेले होते.

पुलाशेजारील वाहने वाहत गेली

दुपारी आलेल्या मुसळधार पावसामुळे समृद्धी मार्गावर पडणाऱ्या पावसाचे पाणी उंचावरून खाली वेगात वाहत आले. पाण्यासोबत समृद्धी मार्गाच्या कडेला असलेली माती दगड देखील खाली आले. पाण्याच्या प्रवाहात पुलाशेजारी उभी असलेली वाहने चक्क वाहत गेली. रस्त्यापासून काही दूर अंतरावर असलेल्या खोल भागात महामार्गाचे पाणी जाऊन साचले. त्या पाण्यात वाहत गेलेली वाहने खड्ड्यात जाऊन पडली. त्या वाहनांवर महामार्गाच्या पाण्यासोबत वाहत आलेली माती व दगड पडल्याने सर्व वाहने खड्ड्यात फसली. मजूर परत आले तेव्हा त्यांना त्यांची वाहने दिसून आली नाही.

शेतकऱ्यांची पिके खरडून निघाली

सर्व मजूर रविवारपासून वाहनांचा शोध घेत होती. खड्ड्यातील गाळत फसलेल्या दोन दुचाकी व एक सायकल जेसीबीच्या सहाय्याने काढण्यात आली. तसेच इतर तीन दुचाकी व एका सायकलचा शोध सुरु आहे. एवढंच नव्हे तर सतत येत असलेल्या पावसामुळे या परिसरातील अनेक शेतकऱ्यांची शेती पाण्याखाली आली आहे. काही शेतकऱ्यांची पिके अक्षरशः खरडून निघाली आहेत.

हे सुद्धा वाचा

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.