वर्धा : जेवण वाढण्यास उशीर का झाला यावरून संतापलेल्या बापाने चक्क मुलीच्या डोक्यात सेंट्रींगच्या पाटीने प्रहार करत तिची हत्या केली. ही घटना हमदापूर येथे घडली. या घटनेने गावात एकच खळबळ उडाली. या प्रकरणात दहेगाव पोलिसांनी (Dahegaon Police) आरोपी वडिलाला अटक केली. मृतदेह वर्धेच्या शासकीय रुग्णालयात (Government Hospital) शवविच्छेदन करण्यासाठी पाठविण्यात आलं आहे. मृतक 17 वर्षीय मुलगी आणि तिचे वडील विलास ठाकरे जेवण करत असताना जेवण वाढण्यास उशीर का झाला या कारणातून दोघांमध्ये वाद झाला. या वादातून या निर्दयी बापाने मुलीचीच हत्या केली. या घटनेमुळं हमदापूर (Hamdapur) परिसर हादरून गेला.
यावरून संतापलेल्या विलास ठाकरे याने घरात पडत पडून असलेल्या सेंट्रींगच्या पाटीने मुलीच्या डोक्यावर जबर प्रहार केला. वाद सोडविण्यास मध्यस्ती दिलेली तिची आई आशा ठाकरे तिने वाचवण्याचा मोठा प्रयत्न केला. मात्र ती सुद्धा मुलीला वाचवू शकले नाही. आशा ठाकरे हिने याची माहिती वर्धा येथील सिंदी मेघे परिसरातील रहिवासी तिचा भाऊ प्रमोद राम महाडोळे याला दिली. यावरून मुलीच्या मामाने तातडीने घटनास्थळ गाठले.
घटनेची माहिती गावात पसरताच एकच खळबळ उडाली होती. दहेगाव पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी वर्धा शासकीय रुग्णालयात पाठविला आणि आरोपी वडिलाला अटक केली. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी पीयूष जगताप यांच्या मार्गदर्शनात दहेगाव पोलीस करीत आहेत. अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी पीयूष जगताप यांनी दिली.
रागाचा भरात वडिलाने मुलीच्या डोक्यावर पाटी मारली. यात जखमी होत मुलगी रक्ताच्या थारोळ्यात पडली. अश्यातच राग तर शांत झाला. पण त्यावेळी पाश्चातापाशिवाय काहीच शिल्लक नव्हते. विलास ठाकरे यांनी 112 नंबरवर डायल करून पोलिसांना माहिती दिली. पोलीस घटनास्थळी दाखल होताच पोलिसांना मुलगी रक्ताच्या थारोळ्यात पडून दिसली. घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंकी, उपविभागीय पोलीस अधिकारी पीयूष जगताप यांनी भेट दिलीय.