Wardha Crime : संतापजनक घटना; दोन सख्ख्या बहिणींसह अन्य एकीचे लैंगिक शोषण, आरोपीला पोलीस कोठडी

आरोपी केशव वानखेडे हा लोखंडी पिपे विक्रीचे काम करतो. विविध गावांत जाऊन तो लोखंडी पिपे विकायचा. अशाताच तो गिरड पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या एका गावात दाखल झाला. गावातील रस्त्याकडेला तो पिपे विकायचा. यावेळी दोन सहा वर्षाच्या दोन सख्ख्या बहिणी त्याच्या नजरेस पडल्या.

Wardha Crime : संतापजनक घटना; दोन सख्ख्या बहिणींसह अन्य एकीचे लैंगिक शोषण, आरोपीला पोलीस कोठडी
crimeImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Feb 20, 2022 | 3:24 PM

वर्धा : दोन सख्ख्या अल्पवयीन बहिणींसह आणखी एका चिमुरडीवर लैंगिक अत्याचार (Sexually Assaulting) केल्याची संतापजनक घटना गिरड पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या एका गावात उघडकीस आली. तीन अल्पवयीन मुलीं (Minor Girls)च्या लैंगिक शोषणाच्या घटनेने वर्धा जिल्ह्याला हादरा बसला आहे. दोन्ही बहिणींनी ही संतापजनक घटना त्यांच्या आई वडिलांना सांगितली असता हा सर्व प्रकार उजेडात आला. गिरड पोलिसांनी आरोपी नराधमास अटक करत त्याच्याविरुद्ध 376 (अ), (ब) तसेच पॉस्कोच्या 4, 6, 8, 10 कलमान्वये गुन्हा दाखल केला. केशव बावसू वानखेडे (56) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून तो चंद्रपूर येथील रहिवासी आहे. (Accused of sexually assaulting another, including two sisters in wardha, remanded in police custody)

गावात पिपे विक्रीचे काम करत होता आरोपी

आरोपी केशव वानखेडे हा लोखंडी पिपे विक्रीचे काम करतो. विविध गावांत जाऊन तो लोखंडी पिपे विकायचा. अशाताच तो गिरड पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या एका गावात दाखल झाला. गावातील रस्त्याकडेला तो पिपे विकायचा. यावेळी दोन सहा वर्षाच्या दोन सख्ख्या बहिणी त्याच्या नजरेस पडल्या. त्याने अल्पवयीन मुलींच्या अज्ञानाचा फायदा घेत रस्त्याकडेला असलेल्या एका ओसाड पडीक जागेवर असलेल्या बाथरुममध्ये नेत रात्रीच्या काळोखात दोन्ही सख्ख्या बहिणींचे लैंगिक शोषण केले. तो नराधम ऐवढ्यावरच थांबला नाही तर त्याने आणखी एक सात वर्षीय कळी देखील कुस्करली.

पीडितांच्या आई-वडिलांच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल

आरोपी नराधम केशव वानखेडे याने तीन अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण केल्याच्या घटनेने वर्धा जिल्ह्याला चांगलाच हादरा बसला. पीडित बालिकांच्या आईवडिलांनी थेट गिरड पोलीस ठाणे गाठून याबाबतची तक्रार दाखल केली. यांनतर त्याने एका अल्पवयीन चिमुकलीचा सुद्धा बलात्कार केल्याचं उघड झालं. पोलिसांनी याप्रकरणी आरोपी केशव बावसू वानखेडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. (Accused of sexually assaulting another, including two sisters in wardha, remanded in police custody)

इतर बातम्या

VIDEO | गुजराती गायिकेवर नोटांची उधळण, विरारमधील धार्मिक कार्यक्रमात प्रकार

माय तू वैरीण निघालीस.. प्रियकराच्या मदतीनं आईनंच केला मुलाचा खून, औरंगाबादमधील वैजापूरची घटना

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.