वर्ध्यात तीन वाहनांचा विचित्र अपघात, दोघांचा मृत्यू, तिघे जखमी, अपघातात लहान मुलाचा समावेश
वर्धा जिल्ह्यातील सेलसुरा शिवारात तीन वाहनांचा विचित्र अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला तर तिघे गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातात लहान मुलाचाही (child) समावेश आहे. अचानक रस्ता ओलांडताना हा अपघात झाला. यावेळी रानडुकराला फॉर्च्युनर कारनं धडक देत ती पलटी झाली. तर मागून येणाऱ्या एका कारनं देखील रानडुकरापासून वाचण्यासाठी प्रयत्न करत असताना दुचाकील धडक देत पलटली. या तीन वाहनांच्या विचित्र अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे.
वर्धा : जिल्ह्यातील सेलसुरा शिवारात तीन वाहनांचा विचित्र अपघात (accident) झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला तर तिघे गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातात लहान मुलाचाही (child) समावेश आहे. अचानक रस्ता ओलांडताना हा अपघात झाला. यावेळी रानडुकराला फॉर्च्युनर कारनं (Fortuner car)धडक देत ती पलटी झाली. तर मागून येणाऱ्या एका कारनं देखील रानडुकरापासून वाचण्यासाठी प्रयत्न करत असताना दुचाकील धडक देत पलटली. या तीन वाहनांच्या विचित्र अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातात तिघे गंभीर जखमी असून त्यांना सावंगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तर दोन रानडुकरांचाही या अपघाता मृत्यू झाला आहे. ही अपघाताची घटना कळताच घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी पियूष जगताप दाखल झाले होते. या तिन वाहनांच्या विचित्र अपघातामुळे परिसरात भीतीच वातावरण पसरलं आहे.
सेलसुरामध्ये यापूर्वीही भीषण अपघात
सेलसुरामध्ये झालेल्या तीन वाहनांच्या विचित्र अपघातानंतर परिसरात भीती पसरली आहे. कारण, यापूर्वी देखील याच भागाच भीषण अपघात झाला होता. त्या अपघातामध्ये सावंगी येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या सात विद्यार्थ्यांना आपला जीव गमवावा लागला होता. या भीषण अपघाताच नाव काढलं तरी आजही अंगावर काटा येतो, असं स्थानिक सांगतात.
सेलसुरात वारंवार अपघात
सेलसुरामध्ये झालेल्या तीन वाहनांच्या भीषण अपघातानंतर तरी लक्ष द्यायला हवं. प्राण्यांच्या कळपामुळे अपघात झाल्यानं दोघांना जीव गमवावा लागलाय. या घटनेत तिघे गंभीर जखमी असून यामध्ये लहान मुलाचाही समावेश आहे. दरम्यान, ही अपघाताची माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी पियूष जगताप घटनास्थळी दाखल झाले होते. जखमींवर सावंगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
इतर बातम्या