वर्धा : जुन्या वैमनस्यातून दारुविक्रेत्याची धारदार शस्त्राने सपासप वार करीत क्रूररित्या हत्या केल्याची खळबळजनक घटना शनिवारी मध्यरात्री सुमारास वर्धा शहरातील गोंडप्लॉट परिसरात घडली. या घटनेने परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणी शहर पोलिसांनी एकास अटक केली असून इतर चार आरोपींचा शोध पोलीस घेत आहे. मनोज मुकुंद धानोरकर (32) रा. केळकरवाडी असे मृतकाचे नाव आहे.
मृत मनोज धानोरकर याने घरापासून अवघ्या काही अंतरावर भाड्याने खोली घेतली होती. त्या खोलीतून तो पोलिसांपासून लपून अवैध दारुविक्रीचा व्यवसाय करीत होता. शनिवारी रात्रीच्या सुमारास मनोजच्या पत्नीने त्याला फोन करुन जेवण करण्यास येण्यासाठी सांगितले. त्यावेळी मनोजचा कुणाशी तरी वाद सुरु असल्याने त्याचा आवाज मनोजच्या पत्नीला फोनवर ऐकू आला. मनोजच्या पत्नीने तत्काळ घटनास्थळाकडे धाव घेतली असता मनोज रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडल असल्याचे दिसून आले. याबाबतची माहिती शहर पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मनोजला जिल्हा सामान्य रुग्णालयात नेले. तेथून त्याला सेवाग्राम येथील रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषीत केले.
मनोजची पत्नी कोमल धानोरकर हिने शहर पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी याप्रकरणी आकाश जयस्वाल याला अटक करुन पाच आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. मृतक मनोज धानोरकर आणि आरोपी आकाश जयस्वाल यांच्यात जुना वाद होता. ऑक्टोबर 2020 मध्ये मृतक मनोजने आकाश जयस्वाल याच्यावर जीवघेणा हल्ला केला होता. याचा वचपा काढण्यासाठी आकाश जयस्वाल याने मनोजची हत्या केल्याची माहिती आहे.
मृतक मनोज हा मध्यरात्रीच्या सुमारास दारु अड्ड्यावर असतानाच आरोपी आकाश जयस्वाल आणि त्याच्या मित्रांनी मनोजवर हल्ला चढविला. मनोजला लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत त्याच्या हनुवटी, मान, पाठ, आदी ठिकाणी सुमारे 15 ते 20 वेळा सपासप वार करुन मनोजचा कोथळाच बाहेर काढला. हा थरार नागरिकांनी डोळ्याने अनुभवला असून या घटनेने शहरात चांगलीच खळबळ माजली. मृतक मनोज धानोरकर हा गुंडगिरी प्रवृत्तीचा होता. त्याच्यावर शहर ठाण्यात जीवे मारण्याचा हल्ला, जबर मारहाण आदीसह विविध गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती शहर पोलिसांनी दिली. तो भाड्याने घेतलेल्या खोलीतून दारुविक्री करायचा. त्याच खोलीत शनिवारी मध्यरात्री त्याचा सहा जणांनी ‘गेम’ केला. आरोपी आकाश जयस्वाल हा देखील दारुविक्रेता असल्याचे सुत्रांनी कळते. (Brutal murder of drug dealer Manoj by attack from an old dispute)
इतर बातम्या
कुटुंबातील सदस्यांकडून आईची हत्या, अखेर नातवाच्या चिकाटीमुळे खूनाचा गुन्हा दाखल
अमेझॉन आणि फ्युचर ग्रुपच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना ईडीचे समन्स, आवश्यक कागदपत्रांसह हजर राहण्याचे आदेश