Wardha Crime | ट्रक चालकासह क्लीनरने लॅपटॉप पळविले, 5 कोटी 43 लाखांची अफरातफर; वडनेर पोलिसात गुन्हा दाखल

चालक आणि क्लिनर यांनी कंपनीचा विश्वासघात केला. वर्धा जिल्ह्याच्या दरोडा टोलनाका परिसरात वाहन उभे करुन 3 हजार 824 लॅपटॉप पैकी 5 कोटी 43 लाख 2 हजार 518 रुपये किंमतीचे 1 हजार 418 लॅपटॉपची परस्पररित्या विक्री केली. याप्रकरणी अशफाक मुस्तफा खान रा. कळमना जि. नागपूर यांनी वडनेर पोलिसात तक्रार दाखल केली.

Wardha Crime | ट्रक चालकासह क्लीनरने लॅपटॉप पळविले, 5 कोटी 43 लाखांची अफरातफर; वडनेर पोलिसात गुन्हा दाखल
ट्रक चालकासह क्लीनरने लॅपटॉप पळविलेImage Credit source: t v 9
Follow us
| Updated on: May 25, 2022 | 12:42 PM

वर्धा : ब्लू डॉट कंपनीच्या चेन्नई वेअर हाऊसमधून गुडगाव (Gurgaon) येथे लॅपटॉप पोहचविण्यासाठी निघाले. ट्रॅकमधील लॅपटॉप ट्रक चालकासह क्लीनरने (Drivers & Cleaners) परस्पर विकले. ही धक्कादायक घटना वर्धेच्या दरोडा टोल नाका (Daroda Toll Naka) परिसरात घडलीय. ट्रक चालक आणि क्लिनरने तब्बल 5 कोटी 43 लाख 2 हजार 518 रुपये किंमतीचे 1 हजार 418 लॅपटॉपची परस्पर विल्हेवाट लावून अफरातफर केलीय. प्रकरणी वडनेर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी चालक आणि क्लिनरविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मोमीन महमूद खान रा. हमतगाम गुडगाव, रॉबीन नबाब खान रा. धुलावड तावडू गुडगाव रा. हरियाणा यांनी 16 मे 2022 रोजी ब्लू डॉट कंपनीच्या चेन्नई वेअर हाऊसमधून गुडगाव येथे लॅपटॉप पोहचविण्यासाठी जाणार होते.

वडनेर पोलिसांत तक्रार

मोमीन व रॉबीन यांना कंपनीच्या व्यवस्थापकाने विश्वासाने 3 हजार 824 लॅपटॉप सुपूर्द केले. मात्र, चालक आणि क्लिनर यांनी कंपनीचा विश्वासघात केला. वर्धा जिल्ह्याच्या दरोडा टोलनाका परिसरात वाहन उभे करुन 3 हजार 824 लॅपटॉप पैकी 5 कोटी 43 लाख 2 हजार 518 रुपये किंमतीचे 1 हजार 418 लॅपटॉपची परस्पररित्या विक्री केली. याप्रकरणी अशफाक मुस्तफा खान रा. कळमना जि. नागपूर यांनी वडनेर पोलिसात तक्रार दाखल केली.

मालाच्या रिकव्हरीचे मोठे आव्हान

वडनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तांत्रिक पद्धतीने तपास सुरु केला आहे. आरोपीच्या शोधात पथक रवाना करण्यात आले आहे. एका पोलीस उपनिरीक्षकसह तीन कर्मचारी दिल्ली येथील गुडगाव येथे रवाना झाले आहे. अफरातफर झालेल्या मालाची रिकव्हरी करण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे आहे.

हे सुद्धा वाचा

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.