Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Meteor Shower or Satellite ? : वर्धेतही सापडले सिलिंडरच्या आकाराचे अवशेष, पोकळ असलेली वस्तू प्लास्टिकसारखी

वर्धा जिल्ह्यातही सिलिंडरच्या आकाराचे अवशेष सापडले आहेत. पोकळ असलेली वस्तू प्लास्टिकसारखी आहे. समुद्रपूर तालुक्याच्या वाघेडा ढोक परिसरात हे साहित्य सापडले. हे अवशेष पोलिसांनी जप्त केले.

Meteor Shower or Satellite ? : वर्धेतही सापडले सिलिंडरच्या आकाराचे अवशेष, पोकळ असलेली वस्तू प्लास्टिकसारखी
समुद्रपूर तालुक्यात सापडलेला हाच तो सिलिंडरच्या आकाराचा गोळा Image Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Apr 03, 2022 | 1:36 PM

वर्धा : शनिवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास आकाशातून सॅटेलाईट सदृश्य साहित्य जमिनीवर पडत असल्याचं नागरिकांना पहावयास मिळालं. या घटनेनंतर वेगवेगळ्या चर्चा होऊ लागल्या. नागरिकांमध्ये घटनेनंतर भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आज सकाळच्या सुमारास वर्धा जिल्ह्याच्या समुद्रपूर तालुक्यातील वाघेडा ढोक (Wagheda Dhok in Samudrapur taluka) शिवारातील शेतात सॅटेलाईटचे अवशेष पडून असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी जात हे साहित्य जप्त करीत तपासाला सुरुवात केली आहे. वाघेडा ढोक शिवारातील नितीन सोरटे (Nitin Sorte) यांच्या शेतात सकाळी त्यांना एक सिलिंडरच्या आकाराची वस्तू शेतकऱ्याच्या नजरेस पडली. शेतकऱ्याने तातडीने ही माहिती समुद्रपूर पोलिसांनी (Samudrapur Police) दिलीय. पोलिसांनी घटनास्थळी येत साहित्य जप्त केले आहे.

चार किलो वजनाचा गोळा

सिलिंडरच्या आकाराचे हे साहित्य असून, त्याच वजन जवळपास तीन ते चार किलो आहे. त्याची लांबी दोन ते अडीच फूट दरम्यान आहे. हा साहित्य आतून पोकळ असून प्लास्टिकसारख्या वस्तूचा असल्याचं निदर्शनास येत आहे. यावर काळ्या धाग्यासारख्या वास्तूचे आवरण असल्याची माहिती समुद्रपूरचे पोलीस उपनिरीक्षक राम खोत यांनी दिली.

समुद्रपूर ठाण्यात ठेवली वस्तू

हे साहित्य समुद्रपूर पोलीस स्टेशनला आणण्यात आले आहे. महसूल विभागाला सुद्धा याची माहिती देण्यात आली आहे. वरिष्ठच्या मार्गदर्शनात आणि सूचनेनुसार हे वस्तू काय आहे याचा शोध घेतला जाणार आहे, अशी माहिती राम खोत यांनी दिली.

पवनपारमध्येही सापडला गोळा

चंद्रपूर जिल्ह्यातील पवनपारमध्ये अवकाशातून पडलेल्या वस्तूचा भाग सापडला. सुमारे साडेपाच किलो वजनाचा हा धातूचा गोळा आहे. पवनपारच्या जंगलात हा गोळा सापडला. तहसील प्रशासनाने गोळा ताब्यात घेतला. यासंदर्भात वरिष्ठांना माहिती दिली. लाडबोरी येथे कोसळलेल्या वस्तूचा अभ्यासकांनी आढावा घेतला.

Meteor Shower or Satellite ? चंद्रपुरातील पवनपारमध्ये सापडला साडेपाच किलोचा गोळा; प्रशासन करणार तपास

Nagpur | Meteor Shower or Satellite ? : 10 फूट व्यासाची चक्राकार वस्तू पडली, नेमकं काय याचा अभ्यास सुरू, विजय वडेट्टीवार यांची माहिती

Video : Sanjay Raut on Raj Thackeray | अक्कलदाढ एवढी उशिरा का येते?; संजय राऊतांची राज ठाकरेंवर खोचट टीका

सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम.
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले.
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार.
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते..
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते...
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर.
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी.
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले.
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर.
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त.
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?.