काँग्रेसचा एक तरी नेता विकासाबद्दल बोलतो का?, नीतेश राणे यांचा हल्लाबोल

पहिल्या रांगेत बसलेला दिसेल खाकी पॅन्ट घालून माझी गॅरंटी. दुसरा अजेंडाच नाहीय. बोलायचा नुसता बोलतो अशी टीका राहुल गांधी यांच्यावर नितेश राणे यांनी केली.

काँग्रेसचा एक तरी नेता विकासाबद्दल बोलतो का?, नीतेश राणे यांचा हल्लाबोल
नितेश राणे
Follow us
| Updated on: Jan 11, 2023 | 11:40 PM

वर्धा : आमदार नीतेश राणे राहुल गांधी यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, तुम्ही सांगा राहुल गांधी (Rahul Gandhi) विकासा संदर्भात बोलतायेत का? काँग्रेसचा (Congress) एक नेता विकासा संदर्भात बोलतो का. राहुल गांधी यांची कोणतेही पत्रकार परिषद बघा भारत जोडो यात्रेच्या संदर्भात. फक्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका करायची. हिंदू धर्मावर टीका करायची. फक्त आमच्या साधू संतांवर टीका करायची. वीर सावरकरांवर टीका करायची. बाकी काहीच नाही.

मला मतदान का करायचं ते काहीच नाही. हिंदू समाज, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि सावरकरांच्या पलीकडे काहीच नाही. मी तर सांगतो एकदा त्याची दाढी काढा. आमच्या रेशीमबागकडे पाठवा. मी सांगतो पुढच्या दसऱ्या मेळाव्यात पहिल्या रांगेत बसलेला दिसेल संघाच्या.

पहिल्या रांगेत बसलेला दिसेल खाकी पॅन्ट घालून माझी गॅरंटी. दुसरा अजेंडाच नाहीय. बोलायचा नुसता बोलतो अशी टीका राहुल गांधी यांच्यावर नितेश राणे यांनी केली.

खासदार अमोल कोल्हे यांच्यावर टीका करताना नितेश राणे म्हणाले, कुठला तो अमोल कोल्हे नावाचा ॲक्टर. पैसे घेऊन शिवाजी महाराजांचे रोल करतो. तो काही फुकट करीत नाही. नावासाठी खासदार झालाय.

२०२४ मध्य  आपटून टाकू. एवढं काही मोठा विषय नाही. दाढी काढली तर कोणी ओळखणार पण नाही. तो सिरीयल पुरताच आहे, असा घणाघातही नीतेश राणे यांनी केली.

तो पेपरात लिहून ठेवतो आणि आमचे अजितदादा वाचून दाखवतात. काय वाचताय? वर्षानुवर्षे जी पदवी संभाजी महाराजांना लावली ती लगेच पुसून काढायची आहे त्या येड्या अमोल कोल्हेमुळे. कुठे भेटू दे मग मी पण दाखवतो, असं नीतेश राणे म्हणाले.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.