Wardha | कर्जबाजारी झाल्यानं नवरा-बायको दोघांनीही विष घेतलं!, उपचारादरम्यान नवरा दगावला, पण पत्नी वाचली

वर्ध्यात कर्जबाजारीपणाला कंटाळून पती पत्नीने विष प्राशन केले. पतीचा उपचारदरम्यान एका महिन्याने मृत्यू झाला, तर पत्नीची प्रकृती आता बरी आहे. आर्थिक मदतीची मागणी करण्यात आली.

Wardha | कर्जबाजारी झाल्यानं नवरा-बायको दोघांनीही विष घेतलं!, उपचारादरम्यान नवरा दगावला, पण पत्नी वाचली
सेलू तालुक्यातील मृतकाची पत्नी व दोन मुली.
Follow us
| Updated on: Feb 10, 2022 | 1:42 PM

वर्धा : जिल्ह्याच्या सेलू तालुक्यातील पिंपळगाव येथील शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला (Due to debt) कंटाळला. शेवटी त्याने विष प्राशन (took poison) करून आत्महत्येचा प्रयत्न केला. यात पतीचा उपचारदरम्यान एक महिन्याने मृत्यू झाला. तर पत्नीला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. पतीचा मृत्यू झाल्याने परिवार उघड्यावर आलंय. त्यामुळं आर्थिक मदतीची मागणी केली जातं आहे. अर्चना राजेंद्र चरडे यांनी आणि यांचे पती राजेंद्र चरडे यांनी 9 जानेवारीला संध्याकाळी राहत्या घरी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. दोघांनी विष घेतल्याची माहिती मिळताच त्यांना सेवाग्राम येथील रुग्णालयात (At the hospital at Sevagram) दाखल करण्यात आले. रुग्णालयात पती-पत्नी दोघांवर उपचार करण्यात आले. यात काही दिवसांत पत्नीला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. मात्र घटनेच्या एका महिन्यानंतरया पती राजेंद्र चरडे यांची प्राणज्योत मावळली.

दोन मुलींना कसं सांभाळणार?

राजेंद्रकडे केवळ दोन एकर शेती आहे. दोन लहान मुली असल्याची माहिती मृतक शेतकऱ्याची पत्नी अर्चना राजेंद्र चरडे यांनी दिली. राजेंद्र यांच्यावर सेवाग्राम येथील सेंट्रल बँकेचे 70 हजार रुपयांचे कर्ज होते. सोबतच त्यांनी इतर लोकांकडून कर्ज घेतल्याची माहिती आहे. तर पत्नी हिच्या नावाने सुद्धा उमेदच्या गटातून कर्ज काढलेले आहे. शेतीतून होणारे उत्पन्न आणि आर्थिक परिस्थितीला कंटाळून राजेंद्रने आत्महत्या केल्याची माहिती मृतकाचा भाऊ नरेश चरडे यांनी दिली.

सरकारी योजना कागदावरचं

सरकारकडून शेतकऱ्यांसाठी विविध योजना आणल्या जातात. मात्र या योजनाचा शेतकऱ्यांना प्रत्यक्ष लाभ मिळताना दिसत नाही. आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याला तातडीने मदत करण्याची गरज व्यक्त केली जातं आहे. शेतकरी आत्महत्या होतात. पण, सरकारी निकष पूर्ण करणं बरेचदा कठीण जातं. कागदपत्रांच्या अभावी काही शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळत नसल्याचं चित्र आहे. हे प्रकरण गंभीर आहे. त्यामुळं आर्थिक मदतीची मागणी नागरिकांनी केली आहे.

Nagpur | नितीन गडकरींच्या घरासमोर भाजप-काँग्रेसचे कार्यकर्ते आमने-सामने, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं काय?

अंकिता पिसुड्डे जळीतकांड : द्वितीय पुण्यस्मरण करून आई-वडील न्यायालयात, आज न्यायाची अपेक्षा

Video – Nagpur NMC | नगरसेवकांचा भूमिपूजनाचा सपाटा, नागपुरात नागरिकांचा विरोध, विक्की कुकरेजा यांच्याविरोधात नागरिक संतप्त

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.