वर्धा : अल्पवयीन मुलीचा गर्भपात केल्याप्रकरणी पोलिसांच्या रडारवर आलेल्या कदम रुग्णालयात आज पुन्हा खोदकाम करण्यात आले. रुग्णालय परिसरात असलेल्या विहिरीत सुमारे पाच तास खोदकाम सुरु होते. विहिरीत खोदकामात काय सापडले याबाबत अधिकाऱ्यांनी कोणतीही माहिती दिली नाही. मात्र ब्लड सँपलसह काही साहित्य नेल्याची माहिती मिळते. याबाबत वर्धा आणि नागपूर येथील फॉरेन्सिक टीमने रुग्णालयाची पूर्ण पाहणी सुद्धा केली आहे.
याआधी रुग्णालय परिसरातील गॅस चेंबरमध्ये 11 कवट्या आणि 54 हाडे सापडली होती. घटनास्थळी पोलीस, आरोग्य प्रशासनाचे अधिकारी उपस्थित आहेत. विहिरीत खोदकामाला सुरुवात केल्यानंतर मोठ्या प्रमाणात दुर्गंधी सुटली आहे. गेल्या चार तासापासून अधिकाऱ्यांच्या समक्ष मलबा बाहेर काढला जातोय. रुग्णालयात कुणालाही प्रवेश नाही.
आर्वी शहरात समोर आलेल्या अवैध गर्भपात प्रकरणात पीसीपीएनडीटी समितीच्या राज्य सदस्या डॉ. आशा मिरगे यांनी आर्वी येथे भेट दिली आहे. दरम्यान या प्रकरणातील तथ्य पडताळून पाहण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. मिळालेल्या कवट्या आणि हाडे एकूणच रुग्णालयाच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित करणारे असल्याचे मत आशा मिरगे यांनी मांडले आहे.
अधिकृत गर्भपात केंद्राची परवानगी 12 आठवड्याची आहे. ज्या कवठ्या मिळाल्या त्या 14 आठवड्याच्या आहेत, त्यामुळे डॉक्टर गुन्हेगार आहे. कायद्यानुसार गुन्हेगार ठरत आहे. अल्पवयीन मुलगी 22 ते 23 आठवड्याची गर्भवती असल्याचे समोर येत आहे. याशिवाय अल्ट्रासाऊडची जी परवानगी आहे ती जानेवारी 2021 मध्ये रद्द झाली आहे. मुदत संपली असताना देखील अजूनही नियमानुसार दुसरे कोणतेही प्रमाणपत्र रुग्णालयात लावलेले मला दिसले नाही. तिथल्या नर्सेसला विचारले त्यांनी देखील दाखविलेले नाही, असे पीसीपीएनडीटी समितीच्या सदस्या डॉ. आशा मिरगे यांनी सांगितले.
सामाजात लैंगिक शिक्षण हा भाग अत्यंत महत्त्वाचा आहे. यासाठी पालकांची देखील आणि शासन आणि केंद्र शासनाच्या जबाबदारी आहे. शैक्षणिक धोरणासह प्रत्यक्ष पाठ्य पुस्तकात लैंगिक शिक्षणाची गरज असल्याचेही आशा मिरगे यांनी म्हटले आहे.
आर्वीतील एक अल्पवयीन मुलीसोबत शेजारी राहणाऱ्या अल्पवयीन मुलाने जबरदस्ती शरीरसंबंध प्रस्थापित केले होते. यातून सदर मुलगी गरोदर राहिली होती. मुलीच्या पोटात दुखू लागल्याने मुलीला स्थानिक डॉक्टरकडे नेले असता मुलगी गरोदर असल्याचे समोर आले. त्यानंतर समाजात बदनाम होण्याच्या भीतीने आरोपी मुलाच्या आई-वडिलांच्या म्हणण्यानुसार डॉ. रेखा कदम यांच्या कदम नर्सिंग होममध्ये 30 हजार रुपयात मुलीचा गर्भपात करण्यात आला. त्यानंतर पोलिसांना या अनधिकृत गर्भपाताची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी अल्पवयीन आरोपी, त्याचे आई-वडिल आणि डॉ. रेखा कदम यांना ताब्यात घेतले. यानंतर नर्सिंग होममध्ये याआधी अशा प्रकारे गर्भपात झाले का याचा तपास करताना पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाली. ज्या माहितीच्या आधारे पोलिसांनी रुग्णालय परिसरात खोदकाम सुरु केले. (Excavation resumes at Kadam Hospital, Arvi, Wardha)
इतर बातम्या
MP Crime : मध्य प्रदेशात नात्याला काळिमा; सैनिकाच्या पत्नीवर दिराकडून 18 वर्षे बलात्कार