Wardha: समाजात बदनामीच्या भीतीने मुलीच्या प्रियकराची पित्याने केली हत्या, वर्ध्यातील खळबळजनक घटना

मयत अमोलचे येसगाव (मुरगाव) येथील एका युवतीसोबत प्रेम संबंध होते. याची माहिती मुलीच्या वडिलांना होती. आपल्या मुलीशी असलेले प्रेमसंबंध जर समाजात माहिती पडले, तर आपली बदनामी होईल, या भीतीने मुलीच्या पित्याने अमोल याच्या डोक्यावर काठीने जबर मारहाण केली.

Wardha: समाजात बदनामीच्या भीतीने मुलीच्या प्रियकराची पित्याने केली हत्या, वर्ध्यातील खळबळजनक घटना
भिवंडीत झोपड्यावर ट्रक कोसळून तीन बहिणींचा मृत्यू
Follow us
| Updated on: Jan 10, 2022 | 10:45 PM

वर्धा : समाजात बदनामी होईल, या भीतीने वडिलांनी चक्क मुलीच्या प्रियकराच्या डोक्यावर काठीने जबर प्रहार करून त्याची हत्या केल्याची घटना पुलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या येसगाव येथे घडली. याप्रकरणी पुलगाव पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. अमोल बाळकृष्ण ताल्हण असे मृत युवकाचे नाव आहे.

मुलीचे प्रेमसंबंध समाजात कळल्यास बदनामीच्या भीतीने हत्या

मयत अमोलचे येसगाव (मुरगाव) येथील एका युवतीसोबत प्रेम संबंध होते. याची माहिती मुलीच्या वडिलांना होती. आपल्या मुलीशी असलेले प्रेमसंबंध जर समाजात माहिती पडले, तर आपली बदनामी होईल, या भीतीने मुलीच्या पित्याने अमोल याच्या डोक्यावर काठीने जबर मारहाण केली. जखमी अवस्थेत अमोल याला सेवाग्राम येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र तेथे त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी पुलगाव पोलिसांनी गुन्हा दाखल करीत आरोपी पित्याला अटक केली आहे.

मयत तरुणाच्या पत्नीच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल

मयत अमोलच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून हत्येच्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंकी यांनी पुलगाव येथे भेट देत घटनास्थळाची पाहणी केली. पुढील तपास ठाणेदार शैलेश शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

प्रेम प्रकरणातून गोंदियातही युवकाची हत्या

प्रेम प्रकरणातून मुलीच्या कुटुंबीयांनी काठीने मारहाण करीत एका युवकाची हत्या केल्याची घटना काल गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यातील निंबा येथे घडली. संदीप मनोहर धमगाये (28) असे मयत तरुणाचे नाव असून तो सालेकसा येथी रहिवासी आहे. संदिपचे निंबा गावातील एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. मात्र मुलीच्या घरच्यांचा या प्रेम संबंधाला विरोध होता. याच रागातून मुलीच्या कुटुंबातील चार लोकांनी संदिपला रस्त्यात गाठून काठीने हातापायावर आणि पाठीवर बेदम मारहाण केली. या मारहाणीत संदिप गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी सालेकसा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. (Father kills daughter’s boyfriend for defaming society in wardha)

इतर बातम्या

Kerala Crime : केरळमध्ये पत्नी बदलण्याचे मोठे रॅकेट उद्धवस्त, 7 जणांना अटक, राज्यातील अनेक उच्चभ्रू लोकांचा समावेश

Mumbai Crime : अभिनेत्रीचे न्यूड फोटो काढून ब्लॅकमेल करणाऱ्या कास्टिंग डायरेक्टरला अटक

मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.