Wardha : अवैध गर्भपात प्रकरणात आरोग्य संचालकांनी केली अभ्यासगटाची स्थापना, समितीला दहा दिवसात अहवाल सादर करण्याच्या सूचना

कदम रुग्णालच्या प्रकरणानंतर आरोग्य विभागाच्या कार्याप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातं आहे. आता या प्रकरणात आरोग्य विभागाच्या संचालकाने अभ्यासगटाची स्थापना करून सविस्तर अहवाल मागवला आहे. आता या अभ्यासगटाच्या तपासात काय पुढे येत हे पाहणे महत्वाचे आहे.

Wardha : अवैध गर्भपात प्रकरणात आरोग्य संचालकांनी केली अभ्यासगटाची स्थापना, समितीला दहा दिवसात अहवाल सादर करण्याच्या सूचना
आरोग्य विभागाच्या अतिरिक्त संचालकांकडून आर्वीच्या उपजिल्हा रुग्णालयासह कदम हॉस्पिटलमध्ये पाहणी
Follow us
| Updated on: Jan 17, 2022 | 10:02 PM

वर्धा : आर्वी येथील गर्भपात प्रकरणाची आरोग्य संचालकांनी दखल घेतली आहे. या प्रकरणी आरोग्य विभागाच्या अतिरिक्त संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी सहा सदस्य असलेल्या अभ्यासगटाची स्थापना केली आहे. या अभ्यासगटाला दहा दिवसात प्रकरणाचा संपूर्ण अभ्यास करून अहवाल सादर करण्याचे सांगण्यात आले आहे. या अभ्यासगटात नागपूर येथील प्रादेशिक मनोरुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. पुरुषोत्तम मडावी, सहाय्यक संचालक डॉ. दिगंबर कानगुले, राज्य पीसीपीएनडीटीच्या अशासकीय सदस्य डॉ. आशा मिरगे, युएनएफपीएच्या कार्यक्रम अधिकारी अनुजा गुलाटी,युएनएफपीए सल्लागार डॉ. आसाराम खाडे, युएनएफपीएच्या सल्लागार ऍड. वर्षा देशपांडे यांचा समावेश आहे. ही समिती मंगळवारी आर्वीला येणार असल्याची माहिती आहे.

हा अभ्यासगट आर्वी येथील प्रकरणासंदर्भात काय चौकशी करणार?

1) प्रत्यक्ष घटनास्थळी, उपजिल्हा रुग्णालय आर्वी येथे व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, जिल्हा रुग्णालय, वर्धा येथे भेट देणार आहे.

2) गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व निदान तंत्रे (लिंग निवडीस प्रतिबंध) कायदा 1994 सुधारित 2003 या कायद्याचा उल्लंघन झाले आहे का याबाबत दस्तावेजाचा सविस्तर व सखोल अभ्यास करणार

3) वैद्यकीय गर्भपात कायदा 1971 सुधारित 2021 चे उल्लंघन झाले आहे का याबाबत दस्तावेजाचा सविस्तर व सखोल अभ्यास करणार.

4) गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व निदान तंत्रे (लिंग निवडीस प्रतिबंध) कायदा 1994 सुधारित 2003 आणि वैद्यकीय गर्भपात कायदा 1971 सुधारित 2021 च्या अंमलबजावणीबाबत काही त्रुटी आहेत का याबाबत दस्तावेजाचा सविस्तर व सखोल अभ्यास करणार.

5) सदर अभ्यासादरम्यान निदर्शनास आलेल्या त्रुटीच्या अनुषंगाने उपाययोजना सुचविणे व अभ्यासाच्या अनुषंगाने सविस्तर अहवाल 10 दिवसांच्या आत मा. राज्य समुचित प्राधिकारी, पीसीपीएनडीटी तथा अतिरिक्त संचालक, आरोग्य सेवा, कुटुंब कल्याण, माताबाल संगोपन व शालेय आरोग्य, पुणे यांना सादर करणार.

कदम रुग्णालच्या प्रकरणानंतर आरोग्य विभागाच्या कार्याप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातं आहे. आता या प्रकरणात आरोग्य विभागाच्या संचालकाने अभ्यासगटाची स्थापना करून सविस्तर अहवाल मागवला आहे. आता या अभ्यासगटाच्या तपासात काय पुढे येत हे पाहणे महत्वाचे आहे. (In the case of illegal abortion, the director of health formed a study group)

इतर बातम्या

Pen Crime : पेणमध्ये स्टेट बँकेचे एटीएम चोरट्यांनी फोडले, 56 लाखाची रक्कम लंपास

Yavatmal Crime : यवतमाळमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार, मुलगी 5 महिन्यांची गर्भवती, आरोपी तरुणाला अटक

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.