वर्धा : महात्मा गांधींविरोधात रायपूर येथे आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या कालीचरण महाराजावर वर्धेत सुद्धा गुन्हा दाखल आहे. 12 जानेवारीला कालिचरणला पोलिसांनी वर्धा जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यावेळी पोलिसांनी पोलीस कोठडी मागण्यात आली होती. मात्र कालीचरण महाराजांना न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यांच्या जमानती अर्ज दाखल करण्यात आला होता. आज तपास अधिकाऱ्यांनी जबाब दाखल केला आहे. जामीन अर्जावर 20 जानेवारीला सुनावणी होणार आहे.
न्यायालयाने 25 जानेवारीपर्यंत कालीचरण महाराजला न्यायालयीन कोठडी सुनावली होती. यानंतर वर्धा पोलिसांनी कालीचरण यांना रायपूर येथील सेंट्रल जेलमध्ये सुपूर्द केले आहे. न्यायालयीन कोठडी सुनावल्यावर आरोपीच्या वकिलाने जामीन अर्ज दाखल केला होता. यावर आज सुनावणी ठेवण्यात आली होती. यावेळी पोलिसांनी न्यायालयात आपला जवाब दाखल केला असून पुढील सुनावणी 20 जानेवारीला होणार आहे.
वर्धा जिल्हा हा महात्मा गांधीजींची कर्मभूमी राहिली आहे. त्यामुळे कालीचरण महाराज विरोधात सर्वात पहिली तक्रार वर्ध्यात झाल्याने गुन्हा दाखल सुद्धा वर्धा जिल्ह्यात करण्यात आला होता. 26 डिसेंबरला कालीचरण महाराजने रायपूरच्या धर्मपरिषदेत वादग्रस्त वक्तव्य केले होते. यानतंर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत असताना पहिली तक्रार महाराष्ट्र काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाध्यक्ष मनोज चांदूरकर यांनी 28 डिसेंबरला शहर पोलीस स्टेशनला दिली होती. या प्रकरणी गुन्हा दाखल करत कालीचरण महाराजला 12 जानेवारी रोजी न्यायालयात आणण्यात आले. न्यायाल्याने कालीचरण महाराजला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. यानंतर महाराजच्या वकिलांनी जामीन अर्ज दाखल केला होता. यावर आता 20 जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे. (Kalicharan Maharaj’s bail application will be heard on January 20)
इतर बातम्या
Solapur Crime: उजनी धरणात होडीतून फिरण्यासाठी गेलेल्या मुंबईच्या पाहुण्यासह मच्छिमाराचा बुडून मृत्यू
Maval Crime: मावळमध्ये एक हजार रुपयांसाठी दुकानदारावर पिस्तुल रोखले, घटना सीसीटीव्हीत कैद