Wardha Crime | जमिनीच्या खरेदी-विक्रीवरून वाद, बेसबॉलच्या दंड्याने जीवघेणा हल्ला, हिंगणघाटच्या भाजप शहराध्यक्षास ठोकल्या बेड्या

हिंगणघाट येथे जमिनीच्या खरेदी-विक्रीच्या 80 लाख रुपयांच्या वादातून एका व्यक्तीस लाठ्याकाठ्यांनी जबर मारहाण करण्यात आली. बेसबॉलच्या दंड्याने जीवघेणा हल्ला करण्यात आला. याप्रकरणी भाजपा शहराध्यक्षसह दोघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. सहा आरोपींविरुद्ध हिंगणघाट ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Wardha Crime | जमिनीच्या खरेदी-विक्रीवरून वाद, बेसबॉलच्या दंड्याने जीवघेणा हल्ला, हिंगणघाटच्या भाजप शहराध्यक्षास ठोकल्या बेड्या
हिंगणघाट येथे वादातून जीवघेणा हल्ला करण्यात आला. Image Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Mar 20, 2022 | 1:32 PM

वर्धा : लेआऊटच्या व्यवसायात जुने सहकारी असलेल्या व्यक्तीकडून जीवघेणा हल्ला करण्यात आला. ही घटना हिंगणघाट येथील वसंत लॉनसमोर (Vasant Lawn at Hinganghat) घडली. याप्रकरणी हिंगणघाट पोलिसांनी (Hinganghat Police) हिंगणघाट भाजप शहर अध्यक्षसह (BJP city president) दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. अशी माहिती हिंगणघाट पोलिसांनी दिली. भारत येनुरकर असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. तर हिंगणघाट पोलिसांनी आशिष गुलाब पर्बत, प्रदीप उर्फ सोनू जसवंत आर्य आणि ताज उर्फ ताजू सय्यद मुश्ताक अली यांना अटक केली आहे. जखमी भारत येनुरकर याचा लेआऊट खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. त्याच्यासोबत या व्यवसायात हरीष शेंडे, विक्की शाहू, प्रवीण घुरडे हे 2013 ते 2021 पर्यंत पार्टनर म्हणून काम करायचे. मात्र, 2017 मध्ये पैशाच्या कारणातून वाद होऊन आपसी मतभेद निर्माण झाले.

फोन करून लॉनबाहेर बोलाविले

जखमी भारत येनुरकर हे त्यांच्यापासून वेगळे निघाले. स्वत: प्लॉट खरेदी विक्रीचे काम करू लागले. त्यांच्यात 80 लाख रुपये किमतीच्या जागेवरून आपसी वाद काही दिवसांपूर्वीपासून सुरू होता, अशीही माहिती पोलिसांनी दिली. भारत येनुरकर आणि त्याचे नातेवाईक शहालंगडी रस्त्यावर असलेल्या वसंत लॉन परिसरात जेवण करीत होते. भारतच्या मोबाईलवर आरोपी हरीश शेंडे याचा फोन आला. त्याला लॉनबाहेर बोलाविले. भारत लॉन बाहेर गेला. त्यावेळी दोन महागड्या कार लॉनसमोर येऊन थांबल्या.

अशी घडली घटना

कारमधून हरीष शेंडे, विक्की शाहू, प्रवीण घुरडे, आशिष पर्बत, सोनू आर्य आणि ताजू सय्यद अली हे उतरले. आरोपींची भारतसोबत शाब्दिक चकमक झाली. तेवढ्यातच सातही आरोपींनी लाथाबुक्क्यांनी तसेच डोक्यावर बेसबॉलच्या दंड्याने मारहाण करीत भारत येनुरकर यास गंभीर जखमी केले. जीवघेणा हल्ला चढविला आणि तेथून पलायन केले. रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडून असलेल्या भारतला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याचा पुतण्या अक्षय अशोक कामडी आणि त्याच्या काही मित्रांनी तत्काळ हिंगणघाट येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. याप्रकरणी त्याने हिंगणघाट पोलिसात तक्रार दिली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तिघांना अटक केल्याची माहिती दिली.

Nagpur Crime | पारडीत रात्री फुटपाथवर झोपण्यावर मजुरांचा वाद, गट्टूने डोक्यावर वार करत एकाची हत्या

विदर्भातील रस्त्यांसाठी 831 कोटींची कामे मंजूर, केंद्रीय मंत्री Nitin Gadkari यांची घोषणा

Nashik | उत्तर महाराष्ट्रात 3 दिवस उष्णतेची लाट; विदर्भाचीही होणार लाही लाही…!

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.