Video Wardha Fire | वर्ध्यातील गादी कारखान्याला भीषण आग, लाखो रुपयांचे नुकसान; काटोलमधील आगीत वृद्ध ठार

| Updated on: Apr 25, 2022 | 4:11 PM

वर्धा शहरातील मध्यभागात असलेल्या महादेवपुरा परिसरातील शीव गादी भंडार दुकानाला अचानक आग लागली. या घटनेमध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले. तर, नागपूर जिल्ह्यातील काटोलमध्ये लागलेल्या आगीत एका ज्येष्ठ व्यक्तीचा मृत्यू झालाय.

Video Wardha Fire | वर्ध्यातील गादी कारखान्याला भीषण आग, लाखो रुपयांचे नुकसान; काटोलमधील आगीत वृद्ध ठार
वर्धा येथे अशाप्रकारे आग लागली.
Image Credit source: tv 9
Follow us on

वर्धा : महादेवपुरा येथील महादेव मंदिराजवळ (Mahadev Temple) शीव गादी भंडारमध्ये (Shiv Gaadi Bhandar) नेहमीप्रमाणे कामकाज सुरू होते. दरम्यान, दुपारी 12 वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. काही वेळातच आग पूर्ण दुकानात पसरली. आग पसरू लागल्याने हाती येईल ते साहित्य बाहेर काढत बचावाचा प्रयत्न करण्यात आला. पण, आगीने पूर्ण दुकानच कवेत घेतले. आगीमध्ये तळमजला आाfण पहिल्या माळ्यावरील साहित्य तसेच यंत्रसामुग्री जळून खाक झाली. आगीमुळे परिसरात एकच धावपळ झाली. आगीमुळे धुराचे उंच लोळ निघत होते. आगीची माहिती मिळताच वर्धा नगरपालिकेच्या अग्निशमन दलाने (Fire Brigade) घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले. बर्‍याच वेळापर्यंत आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न करण्यता आले. दरम्यान आगीमध्ये मोठ्या प्रमाणात साहित्य जळाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले.

शेजारच्या लग्नाला विलंब

आग लागलेल्या दुकानाच्या शेजारी महादेव मंदिर परिसरात लग्नाचे आयोजन होते. येथे मोई येथील वर आणि वर्ध्यातील वधूचा विवाह सोहळा दुपारी 12 वाजून 11 मिनिटांनी आयोजित होता. दरम्यान, शेजारीच असलेल्या दुकानात आगीची घटना घडल्याने लग्नालाही विलंब झाला. वरपक्षाकडील मंडळी वराला घेऊन दुकानातील आग नियंत्रणात येईस्तोवर बाहेरच थांबली होती. त्यामुळे लग्नालाही विलंब झाला. आगीच्या घटनेमुळे लग्नस्थळी आलेल्या वर्‍हाड्यांनाही त्रास सहन करावा लागला.

पाहा व्हिडीओ

काटोलमध्ये वर्कशॉपसह वृद्ध जळाले

नागपूर जिल्ह्यातील काटोलमध्ये फर्निचरच्या वर्कशॉपमध्ये आग लागून एका वृद्ध व्यक्तीचा होरपळून मृत्यू झाला. काटोलमधील संचेती ले-आऊटमध्ये पहाटे 3 वाजताच्या सुमारास सलीम फर्नीचरमध्ये इलेक्ट्रिक शॉक सर्किटमुळे आग लागली. या भीषण आगीत 88 वर्षीय नुर महम्मद बोधर यांचा मृत्यू झाला आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या तीन गाड्यांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. मात्र वर्कशॉपमध्ये मोठ्या प्रमाणावर तयार फर्निचर तसेच लाकूड असल्याने 2 तास आगीवर नियंत्रण मिळवणे कठीण झाले होते. या आगीत वर्कशॉपची मालकी असलेल्या बोधर कुटुंबातील वृद्ध नूर मोहम्मद यांचा होरपळून मृत्यू झाला आहे.

Amruta Fadnavis | अमृता फडणवीस यांचा राज्य सरकारवर हल्लाबोल; शिव्या देणाऱ्यांना मान-सन्मान, तर देवाचं नाव घेणाऱ्यांना…

Devendra Fadnavis | विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचं केंद्रीय गृहसचिवांना पत्र; पत्रातील 10 महत्त्वाचे मुद्दे

समृद्धी महामार्ग संदर्भातली मोठी बातमी! 2 मे रोजीचा उद्घाटन सोहळा पुढे ढकलला